Rajani Bhembre Passed Away Dainik Gomantak
गोवा

Rajani Bhembre Passed Away : ज्येष्ठ कोकणी लेखिका रजनी भेंब्रे यांचं निधन

रजनी भेंब्रे याचं कोकणी कथालेखिका आणि बालसाहित्यकार म्हणून मोठं नाव होतं. निवृत्तीनंतर रजनी भेंब्रे यांनी कोकणी भाषेच्या सेवेसाठी आपलं आयुष्य खर्ची घातलं होतं.

गोमन्तक डिजिटल टीम

Rajani Bhembre Passed Away : ज्येष्ठ साहित्यिक आणि सामाजिक कार्यकर्त्या रजनी भेंब्रे यांचं निधन झालं आहे. त्यांनी कोकणी भाषेतील साहित्यासाठी भरीव योगदान दिलं आहे. त्यांचं पार्थिव अंत्यदर्शनासाठी सावर्डे येथे ठेवलं जाणार आहे. अंत्यदर्शनानंतर त्यांच्या पार्थिवावर जांबावलीत अंत्यसंस्कार केले जातील.

रजनी भेंब्रे याचं कोकणी कथालेखिका आणि बालसाहित्यकार म्हणून मोठं नाव होतं. दक्षिण गोव्यातील कुडचडे गावात राहणाऱ्या भेंब्रे यांनी 34 वर्ष शालेय शिक्षिकेची नोकरी केल्यानंतर स्वेच्छानिवृत्ती घेतली होती. निवृत्तीनंतर रजनी भेंब्रे यांनी कोकणी भाषेच्या सेवेसाठी आपलं आयुष्य खर्ची घातलं होतं.

रजनी भेंब्रे यांना मिळालेले पुरस्कार

  • कोकणी भाषा मंडळाचा घुस्मट कथा संग्रहाला साहित्य पुरस्कार

  • समाज कल्याण खात्याकडून गोवा राज्यात दिला जाणारा यशादमिनी पुरस्कार

  • कला आणि संस्कृती खात्याकडून दिला जाणारा कला गौरव पुरस्कार

  • बाल साहित्य कोकणी कला साहित्य केंद्राकडून दिला जाणारा रामनाथ मथा पुरस्कार

20 व्या अखिल भारतीय कोकणी साहित्य संमेलनात बाल साहित्यावर शोध निबंधही त्यांनी सादर केला होता. लिखाणासोबतच त्यांना अभिनयाचीही आवड होती. कोकणीच्या भाषिक, साहित्यिक, सांस्कृतिक वृद्धीसाठी रजनी भेंब्रे यांनी भरीव योगदान दिलं होतं. महिला सबलीकरणासाठी आकाशवाणी पणजी आणि पणजी दूरदर्शनवर विविध कार्यकमही त्यांनी सादर केले होते.

लहान मुलांमधीस सुप्त कलागुणांना वाव मिळावा, त्यांना योग्य दिशा मिळावी म्हणून रजनी भेंब्रे यांनी नाटकुलीही लिहिली होती. आकाशवाणी आणि दूरदर्शनवर 200 हून अधिक कार्यक्रमांचं सादरीकरण त्यांनी केलं होतं. कोकणी भाषा मंडळाच्या शणै गोंयबाब कथामालेच्या आयोजनात निमंत्रक म्हणून त्यांनी क्रियाशील सहभाग घेतला होता. साहित्य अकादमीच्या सल्लागार समितीच्या सदस्यपदीही त्यांनी काम केलं आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Yemen Saudi Arabia Missile Attack: यमनचा सौदीवर मोठा हल्ला! हवाई अड्डे उद्ध्वस्त, रिफायनरीतून आगीचे लोट; कोट्यवधींचे नुकसान

Talha Saeed Anti India Speech: ''दिल्ली कुणाची होती विसरलात का?" हाफिज सईदच्या लेकानं भारताविरोधात ओकली गरळ; तल्हा सईदच्या रॅलीनं वादंग VIDEO

Goa Ashtami Fair: 'अष्टमी'च्या फेरीने मांडवी किनारा गजबजला! कार्यालये सुटताच गर्दीला उधाण; कपड्यांच्या खरेदीला सर्वाधिक पसंती

India Defence Deal: चीन-पाकिस्तानचा थरकाप उडणार! भारतीय सैन्याची ताकद अनेक पटींनी वाढणार; 1.10 लाख कोटींच्या संरक्षण कराराला मोदी सरकारची मंजुरी

Collared Kingfisher Research: गोव्याच्या किनारी परिसंस्थेसाठी 'कॉलर्ड किंगफिशर'चा अभ्यास! MFG- GBCNचा संयुक्त संशोधन प्रकल्प; पक्ष्याबाबत मिळविणार माहिती

SCROLL FOR NEXT