Goa News

 

Dainik Gomantak

गोवा

‘त्या’ आमदाराला विधानसभेतून बडतर्फ करा: बीना नाईक

लैंगिक सुखासाठी पुण्यातील एका मराठी अभिनेत्रीला आठ महिने गोव्यातील एक आमदार ब्लॅकमेल करीत असल्याने या आमदाराला विधानसभेतून बडतर्फ केले पाहिजे, अशी प्रतिक्रिया महिला काँग्रेसच्या प्रदेश अध्यक्ष बीना नाईक यांनी व्यक्त केली.

दैनिक गोमन्तक

मडगाव: लैंगिक सुखासाठी पुण्यातील एका मराठी अभिनेत्रीला आठ महिने गोव्यातील एक आमदार ब्लॅकमेल करीत असल्याच्या वृत्ताने गोव्यातील राजकिय वर्तुळ ढवळून निघाले. अशा वृत्तीच्या आमदाराला त्या पदावर राहण्याचा नैतिक अधिकार नाही. या प्रकरणाची सखोल चौकशी करून या आरोपात तथ्य सापडल्यास या आमदाराला विधानसभेतून बडतर्फ केले पाहिजे, अशी प्रतिक्रिया महिला काँग्रेसच्या प्रदेश अध्यक्ष बीना नाईक यांनी व्यक्त केली.

नाईक (GPCC Mahila President Beena Naik) म्हणाल्या, आधी उपमुख्यमंत्र्यांच्या मोबाईल फोनवरून मध्यरात्री पॉर्न क्लिप व्हायरल होते, त्यानंतर एका मंत्र्यांचे सेक्स स्केण्डल उघडकीस येते आणि आता एक आमदार एका अभिनेत्रीची लैंगिक सतावणूक (Sexual Harassment) करत असल्याचे वृत्त प्रसिद्ध झाले आहे. हे पाहता या सरकारात जे कोण आहेत त्यांच्यात नीतिमत्ता शिल्लक आहे की नाही असा प्रश्न विचारावासा वाटतो असे त्या म्हणाल्या.

सध्या हा आमदार कोण याबद्दल वेगवेगळे अंदाज व्यक्त केले जात आहेत. व्यवसायाने मॉडेल असलेल्या पर्यावरण चळवळीतील कार्यकर्त्या शमिता शर्मा हिने काल ट्विट करून हा बॉम्ब टाकला होता. वास्तविक आता पर्यंत त्या पीडित अभिनेत्रीने गोव्यातील पोलीसांशी (Goa Police) संपर्क साधून ''त्या'' आमदाराविरुद्ध तक्रार नोंदविण्याची गरज होती असा सूर ऐकू येत आहे.

गोवा फॉरवर्डच्या (Goa Forward Party) महिला आघाडीच्या अध्यक्ष अश्मा सय्यद यांनीही तशीच प्रतिक्रिया व्यक्त केली. त्या म्हणाल्या, त्या पीडित अभिनेत्रीने आतापर्यंत पुढे येऊन तक्रार करण्याची गरज आहे. तसे झाले तर या प्रकरणाचा सोक्षमोक्ष लागू शकतो. या सरकारातील मंत्री आणि आमदाराबद्दल बोलताना, या हे सरकारच स्केण्डल करणाऱ्यांचे आहे. नोकऱ्यांचे स्केण्डल, सेक्स स्केण्डल ही यादी वाढत जाणारी आहे.

चौकशी झालीच पाहिजे

''बायलांचो एकवट'' या संघटनेच्या अध्यक्ष आवदा व्हिएगस यांनी असे प्रकार गोव्यासाठी लांच्छनास्पद असल्याचे नमूद करून या प्रकरणाची सखोल चौकशी झालीच पाहिजे असे सांगितले. हा आरोप सत्य की असत्य हे लोकांना कळले पाहिजे कारण गोव्याची प्रतिमा तत्यामुळे खराब होत आहे हे ध्यानात ठेवले पाहिजे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Karthik Aaryan In Goa: 'रुह बाबा'नं पुन्हा जिंकलं चाहत्यांचं मन; गोव्यात एन्जॉय करतानाचे फोटो केले शेअर!

Winter Care Tips: हिवाळ्यात त्वचेची घ्या विशेष काळजी; 'हे' घरगुती उपाय नक्की ट्राय करा!

Margao Police: हुल्लडबाजांना चाप; मडगाव पोलिसांनी जप्त केल्या मॉडिफाईड बुलेट

South Goa Beach: दक्षिण गोव्यातील समुद्र किनाऱ्यांची धूप वृध्दी सुरुच; राष्ट्रीय अभ्यासातून खुलासा!

Shruti Prabhugaonkar: गोमंतकीयांना कोट्यवधी रुपयांना गंडवणाऱ्या श्रुतीला अवघ्या १० दिवसात जामीन

SCROLL FOR NEXT