Lifesavers Rescue Dainik Gomantak
गोवा

Drishti Lifesavers Rescue : दृष्टी जीवरक्षकांची उल्लेखनीय कामगिरी! चार जणांना वाचवण्यात यश

गोव्यातील समुद्रकिनारी जाणाऱ्यांची सुरक्षा करण्यासाठी दृष्टी लाइफसेव्हर्स किनाऱ्यावर तैनात आहेत.

गोमन्तक डिजिटल टीम

सध्या गोव्यात पर्यटन हंगाम सुरु झालाय. इथल्या समुद्रकिनाऱ्यांचा आनंद लुटण्यासाठी देश विदेशीचे पर्यटक गोव्यात दाखल होत आहेत. आलेल्या पर्यटकांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने सरकारने समुद्री सुरक्षारक्षक तैनात केले आहेत.

मागील काही दिवसांत या सुरक्षा रक्षकांनी स्वतःचा जीव धोक्यात घालून अनेकांचे प्राण वाचवल्याच्या बऱ्याच घटना घडल्या आहेत. (Drishti Lifesavers Rescue)

गोव्यातील समुद्रकिनारी जाणाऱ्यांची सुरक्षा करण्यासाठी दृष्टी लाइफसेव्हर्स किनाऱ्यावर तैनात आहेत. या लाइफसेव्हर्सनी काणकोण येथील पाळोळे समुद्रात कयाकिंग करताना कोलकाता येथील व्यक्तीचा जीव वाचवला आहे.

तर कळंगुट समुद्रकिनाऱ्यावर तैनात असलेल्या दृष्टी लाइफसेव्हर्सनी हैदराबादमधील दोन व्यक्तींना जीव धोक्यात घालून वाचवले.

दरम्यान तेथील जीवरक्षकांनी त्या दोघांनाही समुद्रात न जाण्याचे आवाहन केले होते असे असून देखील ते अतिउत्सही पर्यटक समुद्रात गेले आणि मोठ्या लाटेच्या तडाख्यात सापडले.

कळंगुट समुद्रकिनाऱ्यावर तैनात असलेले दृष्टीचे जीवनरक्षक सिद्धेश आणि सुजन यांना या घटनेची माहिती मिळताच त्यांनी रेस्क्यू ट्यूब आणि सर्फबोर्डच्या साहाय्याने या दोघांना सुखरूप किना-यावर आणले.

हणजूण समुद्रकिनारी देखील अशीच एक घटना घडली असून यात दिल्लीतील एका 38 वर्षीय व्यक्तीला खोल समुद्रातून वाचवण्यात यश आलं आहे. हि व्यक्ती आपल्या अन्य साथीदारांसोबत खोल समुद्रात बोटिंग करीत होती.

समुद्रातील एका मोठी लाट त्यांना धडकल्यावर त्या लाटेमुळे ते एकमेकांपासून दूर खेचले गेले. परिणामी त्या व्यक्तीला परत किनाऱ्यावर आणण्यासाठी बचावकार्य करण्यात आले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Sporting Club Goa: दीपांकुर शर्मा यांच्या खांद्यावर मोठी जबाबदारी; आय-लीग 2 मध्ये दमदार कामगिरीचे लक्ष्य

Goa Research: त्वचेच्या उपचारात 3D तंत्रज्ञानाची नवी झेप! स्वस्त आणि सुरक्षित जलजेल विकसित

Colvale Central Jail: कोलवाळ कारागृहात वाईननिर्मितीचा आरोप; प्रशासनाचा स्पष्ट इन्कार, 'सुरक्षा कडक केल्याने नाराजांचे षड्‌यंत्र'

Illegal Hill Cutting Case: 4 वर्षांच्या लढ्याला अखेर यश! हडफडेची बेकायदा कापलेली टेकडी पूर्ववत; हायकोर्टानं प्रकरण काढलं निकाली

Toxic Movie Release: 'टॉक्सिक'चा धमाका! रॉकस्टार यशची रुपेरी पडद्यावर धमाकेदार एन्ट्री; थिएटर्सबाहेर चाहत्यांची तोबा गर्दी VIDEO

SCROLL FOR NEXT