Fish Market Goa Dainik Gomantak
गोवा

मासळी मार्केटमधील विक्रेत्यांचे तात्पुरत्या शेडमध्ये स्थलांतर

कित्येक वर्षे खितपत पडलेला नवीन मासळी मार्केटचा प्रश्न आता सुटणार असून, मासळी विक्रेत्यांनी तात्पुरत्या शेडमध्ये मासळी विक्री सुरू केली आहे.

दैनिक गोमन्तक

वास्को : कित्येक वर्षे खितपत पडलेला नवीन मासळी मार्केटचा प्रश्न आता सुटणार असून, मासळी विक्रेत्यांनी तात्पुरत्या शेडमध्ये मासळी विक्री सुरू केली आहे. त्यामुळे आता मासळी मार्केट प्रकल्पाला चालना मिळणार आहे. जुने मासळी मार्केट पाडण्याचे काम शुक्रवारपासून सुरू झाले आहे. लवकरच नवीन मासळी मार्केटच्या पायाभरणीचे काम सुरू होणार आहे.

काल मासळी विक्रेत्यांनी तात्पुरत्या शेडमध्ये प्रार्थनासभेचे आयोजन करून त्यांच्या धर्मगुरूंकडून धार्मिक विधी करून घेतले. आज सकाळी या तात्पुरत्या शेडमध्ये मासळी विक्री करण्यास सुरुवात करण्यात आली. मासळी विक्रेत्यांबरोबर जुन्या मासळी मार्केटबाहेर फळभाजी विक्री करणाऱ्या विक्रेत्यांचेही नवीन शेडबाहेर स्थलांतर करण्यात आले. यावेळी विक्रेत्यांमध्ये उत्साह दिसून आला. नवीन शेडमध्ये मासळी खरेदी करण्यासाठी लोकांनीही गर्दी केलेली दिसून आली. त्यामुळे मुख्य रस्त्यावर वाहनांची मोठ्या प्रमाणात वर्दळ होती.

माजी आमदार कार्लुस आल्मेदा यांनी पूर्वीच्या पालिका मंडळाने हा प्रकल्प उभा राहण्यासाठी योगदान दिले आहे. त्यामुळे आपण संपूर्ण श्रेय घेऊ शकत नाही. एकत्रित प्रयत्नाने हा प्रकल्प साकारणार असल्याचे वास्कोचे आमदार कृष्णा साळकर यांनी सांगितले. जुन्या मासळी मार्केटचे छप्पर काढून झाले असून, दोन दिवसांत संपूर्ण मार्केट पाडण्याचे काम सुरू होणार आहे. त्यानंतर लगेच नवीन मासळी बाजार संकुलाच्या पायाभरणीचे काम सुरू होणार असल्याचे साळकर यांनी सांगितले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Live News: सत्तारीतील भुईपाल येथे अपहरणाचा प्रयत्न

Goa Politics: '60 वर्षे गोव्यावर ठराविक कुटुंबांचीच पकड! फॅमिलीराज संपवणे गरजेचे'; केजरीवालांनी घेतले भाजप, काँग्रेसवर तोंडसुख

Goa Politics: खरी कुजबुज; तरीही केजरीवालांचे ‘एकला चलो’ का?

Goa: RSSच्या विजयादशमीला मोन्‍सेरात उपस्‍थित! 100 वर्षे पूर्ण झाल्याबद्दल केले अभिनंदन; उत्पल पर्रीकरांची गणवेशात उपस्‍थिती

Bhuipal: रात्री येत होता घरी, जबरदस्ती गाडीत बसवण्याचा केला प्रयत्न; 12 वर्षीय मुलाच्या प्रसंगावधानामुळे अपहरणाचा डाव फसला

SCROLL FOR NEXT