सिंधुदुर्ग-गोव्याचे ऋणानुबंध आणखी भक्कम : प्रवीण आर्लेकर

झोळंबे-म्हापसा मार्गावर कदंब बस सेवा सुरू
Pravin Arlekar
Pravin Arlekar Dainik Gomantak
Published on
Updated on

साळ : गोवा आणि सिंधुदुर्गचे ऋणानुबंधाचे नाते असून, ते आणखी घट्ट होईल. राज्य सरकारकडून जनतेला गोव्यात नोकरी व अन्य सुविधांसाठी सकारात्मक प्रयत्न करण्यात येतील, अशी ग्वाही आमदार प्रवीण आर्लेकर यांनी दिली.

कदंब परिवहन महामंडळातर्फे झोळंबे ते म्हापसा या मार्गावर नव्यानेच कदंब बस सेवा सुरू करण्यात आली आहे. या सेवेचे उद्‌घाटन आर्लेकर यांच्या हस्ते 9 रोजी झाले. यावेळी हसापूरचे सरपंच संतोष मळीक, तुळशीदास गवस, कदंब सेवेसाठी प्रयत्न करणारे जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष एकनाथ नाडकर्णी, माजी सभापती प्रमोद कामत, बांदा सरपंच अक्रम खान, नगरसेवक संतोष नानचे, कदंब परिवहन महामंडळाचे अधिकारी व ग्रामस्थ उपस्थित होते.

Pravin Arlekar
Goa Rain Update : हवामान विभागाकडून ऑरेंज अलर्ट जारी; मुसळधार पावसाची शक्यता

उद्‌घाटनानंतर बसचे सिंधुदुर्गातील कळणे येथे आगमन झाल्यानंतर तिचे स्वागत करण्यात आले. गोवा सरकारने दिलेल्या सहकार्याबद्दल कळणे येथे ज्येष्ठ ग्रामस्थ विश्वास देसाई यांच्याकडून आमदार प्रमोद आर्लेकर यांचा सत्कार करण्यात आला. या सेवेचा कळणे दशक्रोशीतील गावातून गोव्यात कामाला जाणाऱ्यांना फायदा होणार असल्याने ग्रामस्थांनी समाधान व्यक्त केले.

यावेळी कळणेचे माजी सरपंच आनंद देसाई, सुनिता भिसे, ग्रामपंचायत सदस्य अजित देसाई, भाजप माजी तालुकाध्यक्ष सुधीर दळवी, सूर्या गवस, शक्ती प्रमुख प्रवीण गावकर, शैलेश गावकर आदी उपस्थित होते. यावेळी नाडकर्णी व प्रमोद कामत यांनी मुख्यमंत्री प्रमोद सावंत, आमदार जीत आरोलकर व आर्लेकर यांचे आभार मानले.

तळकट येथे भाजपचे प्रभारी शक्ती केंद्र प्रमुख सुरेश सावंत भोसले, माजी सरपंच रमाकांत गवस, रमेश भिसे, आपा देसाई, नीळकंठ सावंत, अंकुश वेटे, विठ्ठल नाईक, बाबा देसाई, मनोहर झेंडे, आनंद राऊळ, भरत सावंत, अभय तेंडुलकर, शिवाजी सावंत, सुरेश देसाई, लवू साळगावकर, विकी मळीक, विशाल राणे, प्रभाकर गवस, उमेश सावंत, सूर्या शिरोडकर, अमर सावंत, चंद्रिका नांगरे, संगीता राणे, राजश्री गवस आदींची उपस्थिती होती. जोडणे येथे शिवसेना तालुकाप्रमुख गणेश प्रसाद, गोवत सरपंच व ग्रामस्थांनी स्वागत केले. यावेळी शिवसेना उपविभाग प्रमुख मिलिंद नाईक, अरुण देसाई आदींनी कदंब चालक व वाहक यांना पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले.

असे असेल वेळापत्रक

ही बस झोळंबे येथून सकाळी 7.30 वाजता म्हापसा येथे येण्यासाठी सुटणार आहे. ती झोळंबे, तळकट, कोलझर, कळणे, हसापूर, चांदेल, नागझर, कुळण, म्हापसा तसेच सायंकाळी म्हापशाहून 6.30 वाजता झोळंबेला निघणार आहे. हीच बस मधल्या वेळेत म्हापसा ते हळर्ण व्हाया चिकुला वजरीमार्गे दुपारी 1.40 व सायंकाळी 4.20 वाजता धावणार असून, हळर्णहून म्हापशाला दुपारी 3 वाजता व 5.30 वाजता सुटणार आहे. तसेच ती पेडणेहून दुपारी 11.45 वाजता सुटून वारखंड, नागझर, चांदेल, हळर्ण, तर्मास, वजरी ते म्हापसा अशा मार्गावर धावणार असल्याचे कदंबचे अधिकारी सुहेश सावंत यांनी कळवले आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com