Passport Dainik Gomantak
गोवा

Relief to Goans With Portuguese Passports: गोमंतकीयांना केंद्राचा मोठा दिलासा! पासपोर्ट रद्द केल्‍याचा दाखला ओसीआय कार्डसाठी पुरेसा

Overseas Citizenship India Cards: केंद्राने यापूर्वी जारी केलेल्या एका परिपत्रकानुसार, भारतीय नागरिकाने दुसऱ्या देशात आपण नागरिकत्व घेण्यासाठी अर्ज केल्यास त्याचे भारतीय नागरिकत्व रद्द होत होते.

गोमन्तक डिजिटल टीम

Ministry of External Affairs: ‘ओसीआय’चा प्रलंबित प्रश्‍‍न अखेर मार्गी लागला आहे. कुठल्याही भारतीयाचा पासपोर्ट रद्द केल्याचा दाखला ‘ओसीआय’ कार्ड मिळविण्यास पुरेसा ठरणार आहे. तमाम गोवेकरांना केंद्र सरकारकडून हा दिलासा मानला जात आहे.

केंद्राने यापूर्वी जारी केलेल्या एका परिपत्रकानुसार, भारतीय नागरिकाने दुसऱ्या देशात आपण नागरिकत्व घेण्यासाठी अर्ज केल्यास त्याचे भारतीय नागरिकत्व रद्द होत होते. परंतु, त्यामुळे संबंधिताला ‘ओसीआय’ दर्जा मिळविण्यासाठी अडचणी येत होत्या. मात्र, आता नव्या आदेशानुसार भारतीय पासपोर्ट रद्द झाल्यास तोच दाखला ‘ओसीआय’ कार्ड मिळविण्यासाठी वैध ठरणार आहे. यापूर्वी ‘ओसीआय’संबंधी असाच आदेश ४ एप्रिल रोजी जारी करण्‍यात आला होता. तथापि, ३० एप्रिलला तो मागे घेतला गेला आणि शुद्धिपत्रक काढण्यात आले होते. त्‍यावरून विरोधकांनी सरकारवर मोठी टीका केली होती. परंतु आता नव्‍या आदेशाद्वारे प्रश्‍‍नावर पडदा टाकण्‍यात आला आहे.

दरम्‍यान, कुणी अवैध मार्गाने पोर्तुगीज पासपोर्ट मिळविल्‍याचे सिद्ध झाल्यास ते या सुविधेस अपात्र ठरतील, असे आदेशात म्हटले आहे. यासंबंधी राजकीय विश्लेषक क्लिओफात आल्मेदा कुतिन्हो यांना विचारले असता, या आदेशात नवीन असे काही नाही. जुन्या पद्धतीप्रमाणेच ही नवी व्यवस्था आहे. मात्र, यामुळे असंख्‍य गोमंतकीयांना दिलासा मिळेल, असे ते म्हणाले.

ओसीआय कार्ड म्‍हणजे?

‘ओसीआय’ कार्ड म्‍हणजे दुहेरी नागरिकत्वाचा दर्जा नसून, एक निवासी परवाना आहे, ज्‍याद्वारे भारतीय वंशाचे लोक भारतात अनिश्चित काळासाठी राहू शकतात. ओसीआय अंतर्गत तुम्ही मतदान करू शकत नाही. सार्वजनिक पद धारण करू शकत नाही किंवा शेतजमीन खरेदी करू शकत नाही. परंतु व्‍यावसायिक हेतूने वा रहिवासासाठी सशर्त मालमत्ता खरेदी करता येते.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Yemen Saudi Arabia Missile Attack: यमनचा सौदीवर मोठा हल्ला! हवाई अड्डे उद्ध्वस्त, रिफायनरीतून आगीचे लोट; कोट्यवधींचे नुकसान

Talha Saeed Anti India Speech: ''दिल्ली कुणाची होती विसरलात का?" हाफिज सईदच्या लेकानं भारताविरोधात ओकली गरळ; तल्हा सईदच्या रॅलीनं वादंग VIDEO

Goa Ashtami Fair: 'अष्टमी'च्या फेरीने मांडवी किनारा गजबजला! कार्यालये सुटताच गर्दीला उधाण; कपड्यांच्या खरेदीला सर्वाधिक पसंती

India Defence Deal: चीन-पाकिस्तानचा थरकाप उडणार! भारतीय सैन्याची ताकद अनेक पटींनी वाढणार; 1.10 लाख कोटींच्या संरक्षण कराराला मोदी सरकारची मंजुरी

Collared Kingfisher Research: गोव्याच्या किनारी परिसंस्थेसाठी 'कॉलर्ड किंगफिशर'चा अभ्यास! MFG- GBCNचा संयुक्त संशोधन प्रकल्प; पक्ष्याबाबत मिळविणार माहिती

SCROLL FOR NEXT