Goa Marathi Film Festival  Dainik Gomantak
गोवा

Marathi Film Festival: गोवा मराठी चित्रपट महोत्सवासाठी पास नोंदणी सुरू

ऑनलाइन, ऑफलाईन पास मिळण्याची व्यवस्था

गोमन्तक डिजिटल टीम

पणजी: कोरोनामुळे मागील दोन वर्षे खोळंबलेला गोवा मराठी चित्रपट महोत्सव (Goa Marathi Film Festival) 05 ऑगस्टपासून पणजीत सुरू होणार आहे. या चित्रपटासाठी ऑनलाइन पास नोंदणी सुरू झाली आहे. तसेच, ऑफलाईन पास मिळण्याची देखील काही ठिकाणी सोय करण्यात आली आहे. महोत्सवात 22 मराठी चित्रपटांची पर्वणी रसिकांना मिळणार आहे. यावेळी ज्येष्ठ चित्रपट अभिनेते अशोक सराफ (Ashok Saraf) यांचा मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत (CM Pramod Sawant) यांच्या हस्ते कृतज्ञता पुरस्कार देऊन सन्मान करण्यात येईल.

अशा पद्धतीने मिळवता येईल पास

प्रेक्षक ऑनलाईन तसेच ऑफलाइन पद्धतीने पास मिळवू शकतात. 'गोवा' या अॅप किंवा वेबसाइटवर तसेच www.bookmyshow.com वर ऑनलाइन नोंदणी करू शकतात. प्रत्यक्ष पास नोंदणीसाठी पणजी विन्सन ग्राफिक्स, 309 , गेरा इम्पेरियम 2 रिट्झ पाटो बिल्डिंग, पाटो, वास्को- विन्सन ग्राफिक्स, हॉटेल अनंता श्रमजवळ, मडगाव-माया बुक स्टोअर, विट्रोज मॅन्शन, इसिडोर बाप्टिस्टा रोड, मडगाव, फोंडा - मोहक डिझायनर्स, नूतन मेडिकल स्टोअरजवळ, फोंडा येथे नोंदणी करता येईल.

महोत्सावाला अभिनेत्री सोनाली कुलकर्णी, सुबोध भावे, नेहा पेंडसे, सई ताम्हणकर, अमेय वाघ, किशोर कदम, मृण्मयी गोडबोले, संजय जाधव, सुहरुद गोडबोले, सचिन कुंडलकर, आदित्य सरपोतदार, अनंत महादेवन, प्रसाद ओक, गजेंद्र अहिरे अशा अनेक मराठीतील प्रसिद्ध कलाकारांची उपस्थिती असेल.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Russian Oil Imports: "अमेरिकेच्या दबावाखाली झुकणार नाही" रशियन तेलाच्या खरेदीवर भारताचे ठाम उत्तर

रस्ते झाले मस्त, मरण झाले स्वस्त! वाढत्या अपघातांना जबाबदार कोण?

PM Kisan 20th Installment: पंतप्रधान किसान सन्मान निधीचा 20 वा हप्ता शेतकऱ्यांच्या खात्यात जमा; असा तपासा बॅलन्स

न्‍यायालयांत 60,354 प्रकरणे प्रलंबित, राज्यात 15,392 प्रकरणांवर पाच वर्षांहून अधिक काळ निर्णय नाही

Goa News Live Update: गोव्यात आतापर्यंत पीएम किसान योजनेद्वारे शेतकऱ्यांना २४ कोटी मिळाले; CM सावंत

SCROLL FOR NEXT