Goa Tourism Dainik Gomantak
गोवा

Covid-19: कर्नाटकातून येणाऱ्या पर्यटकांची गोव्यात मनमानी

पोळे चेकपोस्टवर वैद्यकीय कागदपत्रे दाखवण्यास नकार दिल्याने तणाव

दैनिक गोमन्तक

Covid-19: वाढत्या कोरोना रुग्णसंख्येमुळे गोव्यात सरकारतर्फे काही महत्वाची पावले उचलण्यात आली आहेत. या पार्श्वभूमीवर बाहेरून राज्यात येणाऱ्यांना लसीचे दोन डोस असणे आणि आरटी-पीसीआर चाचणीचा (RTPCR Test) अहवाल असणे अनिवार्य आहे. (Goa Tourism Latest News Updates)

काल पोळे तपासणी नाक्यावर काँग्रेस (Congress) कार्यकर्त्यांनी कर्नाटकमधून येणारी वाहने अडवली होती. त्यामुळे काहीकाळ तणाव पाहायला मिळाला. कर्नाटकमधून येणाऱ्या काहींनी आरटी-पीसीआर अहवाल आणि इतर संबंधित वैद्यकीय कागदपत्रे देण्यास नकार दिल्याने काँग्रेस कार्यकर्त्यांनी गोवा सरकारला खडे बोल सुनावले.

जनार्दन भंडारी यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेस कार्यकर्त्यांनी चेकपोस्टवरील सरकारी कर्मचाऱ्यांना जाब विचारला. जर आपण कागदपत्रांशिवाय बाहेरच्यांना राज्यात प्रवेश दिला, आणि आपल्या लोकांना त्रास झाल्यास त्याला जबाबदार कोण? असा प्रश्न त्यांनी यावेळी उपस्थित केला. गोवा सरकार (Goa Government) गोव्यातील जनतेच्या जीवाशी खेळ करत असल्याचे सुद्धा त्यांनी यावेळी म्हंटले. त्यामुळे चेकपोस्टवर राज्यात प्रवेश करणाऱ्या सर्वांचीच तपासणी करून मगच त्यांना राज्यात प्रवेश दिला जावा, अशी मागणी काँग्रेसतर्फे करण्यात आली.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Yemen Saudi Arabia Missile Attack: यमनचा सौदीवर मोठा हल्ला! हवाई अड्डे उद्ध्वस्त, रिफायनरीतून आगीचे लोट; कोट्यवधींचे नुकसान

Talha Saeed Anti India Speech: ''दिल्ली कुणाची होती विसरलात का?" हाफिज सईदच्या लेकानं भारताविरोधात ओकली गरळ; तल्हा सईदच्या रॅलीनं वादंग VIDEO

Goa Ashtami Fair: 'अष्टमी'च्या फेरीने मांडवी किनारा गजबजला! कार्यालये सुटताच गर्दीला उधाण; कपड्यांच्या खरेदीला सर्वाधिक पसंती

India Defence Deal: चीन-पाकिस्तानचा थरकाप उडणार! भारतीय सैन्याची ताकद अनेक पटींनी वाढणार; 1.10 लाख कोटींच्या संरक्षण कराराला मोदी सरकारची मंजुरी

Collared Kingfisher Research: गोव्याच्या किनारी परिसंस्थेसाठी 'कॉलर्ड किंगफिशर'चा अभ्यास! MFG- GBCNचा संयुक्त संशोधन प्रकल्प; पक्ष्याबाबत मिळविणार माहिती

SCROLL FOR NEXT