Trinamool Congress: गोव्यासाठी तृणमूल काँग्रेसतर्फे आणखी एक योजना जाहीर

तृणमूल काँग्रेसने गोव्यासाठी ‘माझे घर, मालकी हक्क’ ही गृहनिर्माण हक्क योजना जाहीर केली आहे.
Trinamool Congress scheme
Trinamool Congress schemeDainik Gomantak

Trinamool Congress: गेल्या काही दिवसांपासून तृणमूल काँग्रेसने मतदारांना आकर्षित करण्यासाठी योजनांचा सपाटा लावला आहे. गोव्यासाठी ‘माझे घर, मालकी हक्क’ ही गृहनिर्माण हक्क योजना जाहीर केली आहे, ज्याचे उद्दिष्ट गोमंतकीयांचे गृहनिर्माण हक्क सुरक्षित करणे आहे. या पक्षाचे युतीचे सरकार राज्यात आल्यापासून 250 दिवसांच्या आत ही योजना लागू करणार असल्याचा दावा करण्यात आला आहे. (Trinamool Congress has announced 'Mhaje Ghar Maalki Hakk' Scheme in Goa)

1976 पासून गोव्यात असणाऱ्या कुटुंबांना त्याचा फायदा होणार आहे. या योजनेंतर्गत तृणमूल काँग्रेस (TMC)मगो (MGP) युतीचे सरकारतर्फे ही मदत पुरविली जाणार आहे. ताब्यातील जमिनींचे शीर्षक व मालकी हक्क तसेच बेघर कुटुंबियांना 50 हजार अनुदानित घरे मदत दिली जाणार आहे. तृणमूल काँग्रेस व मगो युती गोवा दमण व दीव कृषी भाडेकरार कायदा 1964 व गोवा दमण व दीव मुंडकार यासारखे लोकाभिमुख कायदे कार्यान्वित करणार असल्याची माहिती दिली.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
dainikgomantak.esakal.com