Redighat Valpoi Accident Dainik Gomantak
गोवा

Redighat Accident: चालकाचा ताबा सुटला, दुचाकी गेली 100 मीटर फरफटत; पहा Video

Redighat Valpoi Accident: रेडीघाट परिसरात त्याचा दुचाकीवरील ताबा सुटला आणि तो रस्त्यावर पडला. त्याची दुचाकी सुमारे १०० मीटर अंतरावर जाऊन रस्त्याकडेला पडली.

गोमन्तक डिजिटल टीम

वाळपई: रेडीघाट-वाळपई येथे शनिवारी संध्याकाळी झालेल्या स्वयंअपघातात स्पर्श सिंग राजपूत (२५, रा. वाळपई, मूळ रांची) हा युवक गंभीर जखमी झाला असून वाळपई इस्पितळात प्राथमिक उपचार करून पुढील उपचारांसाठी त्याला गोमेकॉत हलविले. स्पर्शच्या एका पायाला गंभीर दुखापत होऊन मोठ्या प्रमाणात रक्तस्त्राव झाला असून दोन्ही पायांना फ्रॅक्चर झाल्याची माहिती मिळाली.

सविस्तर वृत्त असे की, स्पर्श सिंग राजपूत हा बँक ऑफ इंडियाच्या होंडा शाखेत नोकरीला असून वाळपईत भाड्याने राहतो. संध्याकाळी पाच वाजल्यानंतर काम संपवून तो होंडाहून वाळपईकडे २४४-बीएच-६८५६ या क्रमांकाच्या दुचाकीने येत होता.

रेडीघाट परिसरात त्याचा दुचाकीवरील ताबा सुटला आणि तो रस्त्यावर पडला. त्याची दुचाकी सुमारे १०० मीटर अंतरावर जाऊन रस्त्याकडेला पडली. या अपघातात तो गंभीर जखमी झाला. या मार्गावर नेहमीच वाहनांची वर्दळ असते.

मात्र, या अपघातावेळी तेथे अन्य कोणतेही वाहन नसल्याने मोठी जीवितहानी टळली. स्पर्श हा भरवेगाने येत होता तसेच अनेक वाहनांना ओव्हरटेक करत येत होता, अशी माहिती स्थानिकांनी दिली. याप्रकरणी वाळपई पोलिसांनी पंचनामा करून तपास सुरू केला आहे.

अपघातांचे सत्र सुरूच

या भागात दररोज अपघातांचे सत्र सुरूच असून शनिवारी सकाळी मोटारसायकल आणि वेगनार कार यांच्यात झालेल्या अपघातात मोटारसायकलस्वार जखमी झाला. दुचाकीस्वाराने कारला मागून धडक दिल्याने तो रस्त्यावर कोसळला. त्यात त्याला बरीच दुखापत झाला. त्याच्यावर साखळी आरोग्य केंद्रात उपचार करून घरी पाठविले. या अपघातात कारचे मोठे नुकसान झाले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Israel Air Strike: इस्रायलचं 'ऑपरेशन तेहरान'! महाभयंकर हवाई हल्ल्यात इस्लामिक जिहादच्या नेत्यांसह इराणच्या सर्वोच्च सुरक्षा प्रमुखाला केलं टार्गेट

VIDEO: रोहितचा 'आसमानी' षटकार अन् स्वतःच मारली 'कॅच इट'ची हाक! हिटमॅनचा 'तो' व्हायरल व्हिडिओ पाहिलात का? सोशल मीडियावर घालतोय धूमाकूळ

Goa Unseasonal Rain: गुढीपाडव्याला वरुणराजा लावणार हजेरी! गोव्यात 18, 19 मार्चला 'यलो अलर्ट'; विजांच्या कडकडासह बरसणार सरी

Konkan Railway: 'कोकण रेल्वे' मार्गावर मान्सूनपूर्व तपासणी! मडगाव-ठोकूर, मडगाव-रोहा मार्गावर सुरक्षा व्यवस्थेचा आढावा

8th Pay Commission: सरकारी कर्मचाऱ्यांची लॉटरी! पगारात होणार 35 टक्क्यांची बंपर वाढ?8व्या वेतन आयोगाबाबत अर्थ मंत्रालयाने मागवल्या सूचना

SCROLL FOR NEXT