Goa Accident: मुळगावात दुचाकींची समोरासमोर धडक, दोन तरुणांचा मृत्यू; अपघाताची पोलिसांकडून चौकशी सुरु

Mulgao Accident News: मुळगाव परिसरात झालेल्या एका अत्यंत भीषण अपघातात दोन दुचाकीस्वारांना आपला जीव गमवावा लागला.
Mulgao Accident News
Goa AccidentDainik Gomantak
Published on
Updated on

मुळगाव: गोव्यात रस्ते अपघातांचे प्रमाण दिवसेंदिवस वाढत असताना मुळगाव परिसरात झालेल्या एका अत्यंत भीषण अपघातात दोन दुचाकीस्वारांना आपला जीव गमवावा लागला. दोन दुचाकींची समोरासमोर जोरदार धडक होऊन हा अपघात झाला, ज्यामुळे परिसरात मोठी हळहळ व्यक्त होत आहे.

समोरासमोर जोरदार धडक

मुळगाव येथे दोन दुचाकीस्वार भरधाव वेगाने येत असताना त्यांची समोरासमोर धडक झाली. धडक इतकी जोरदार होती की, दोन्ही दुचाकीस्वार रस्त्यावर कोसळले आणि त्यांना गंभीर स्वरुपाच्या दुखापती झाल्या. यात त्यांचा जागीच मृत्यू झाला. ओंकार फडते आणि तेजस कवठणकर अशी अपघातात (Accident) मृत्यूमुखी पडलेल्या तरुणांची नावे आहेत. हे दोघेही बार्देश तालुक्यातील रेवोडा येथील रहिवासी होते.

Mulgao Accident News
Goa Accident: उसगाव-फोंडा मार्गावर चिरेवाहू ट्रक उलटला! चालक जखमी; काही वेळ वाहतूक कोंडी

अपघाताची माहिती मिळताच स्थानिक पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली. पोलिसांनी पंचनामा करुन मृतदेह ताब्यात घेतले आणि पोस्टमार्टमसाठी पाठवले. या अपघातामागील नेमके कारण काय होते यासंबंधी पोलीस कसून तपास करत आहेत.

Mulgao Accident News
Goa Accident: 'रेंट अ कॅब' थार कारची दुचाकीला धडक; भाऊ-बहीण गंभीर जखमी, कारचालक फरार

परिसरात शोककळा

अपघातात जीव गमावलेले ओंकार फडते आणि तेजस कवठणकर हे दोघेही तरुण होते. त्यांच्या अकाली मृत्यूमुळे त्यांच्या कुटुंबियांवर दु:खाचा डोंगर कोसळला आहे, तर रेवोडा आणि मुळगाव परिसरात शोककळा पसरली आहे. गोव्यात वारंवार घडणाऱ्या अशा गंभीर रस्ते अपघातांच्या पार्श्वभूमीवर वाहतूक नियमांचे पालन करण्याच्या गरजेवर पुन्हा एकदा बोट ठेवले गेले आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News in Marathi - Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com