Bicholim Accident
Bicholim AccidentDainik Gomantak

Bicholim Accident: डिचोलीत ट्रकची मोटारसायकलला धडक; अपघातात मोटारसायकल चालक जखमी, इस्पितळात उपचार सुरू

Goa Accident: डिचोलीतील बगलमार्गावरील व्हाळशी जंक्शनवर ट्रकची मोटारसायकलला धडक बसल्याने मोटारचालक गंभीर जखमी झाला.
Published on

डिचोली: डिचोलीतील बगलमार्गावरील व्हाळशी जंक्शनवर ट्रकची मोटारसायकलला धडक बसल्याने मोटारचालक गंभीर जखमी झाला. हा अपघात रविवारी दुपारी घडला. जखमी मोटारसायकल चालक म्हापसा परिसरातील असून, त्याच्यावर इस्पितळात उपचार चालू आहेत. अशी माहिती मिळाली आहे.

यासंबंधीची माहिती अशी की, एमएच-०४ के-एफ-६९९५ या क्रमांकाचा मालवाहू ट्रक बगलमार्गावरून म्हापसाच्या दिशेने जात होता. ट्रक व्हाळशी जंक्शनवर पोचताच मुख्य रस्त्यावरुन डिचोलीच्या दिशेने जाणाऱ्या जीए-०३-क्यू-६३९१ या क्रमांकाच्या मोटारसायकलला ट्रकची धडक बसली. त्यात मोटारसायकल चालक गंभीर जखमी झाला.

Bicholim Accident
Goa Politics: विरोधकांच्‍या युतीचे भिजत घोंगडे कायम! काँग्रेसची होणार बैठक; मनोज परब, वीरेश बोरकर यांच्‍या दिल्ली दौऱ्यावरून प्रश्‍‍नचिन्‍ह

लागलीच जखमी चालकाला उपचारार्थ डिचोलीच्या सामाजिक आरोग्य केंद्रात नेण्यात आले. डिचोली पोलिसांना या अपघाताची माहिती मिळताच त्यांनी घटनास्थळी जाऊन पंचनामा केला. पोलिसांनी ट्रक चालकाला ताब्यात घेतले. पोलिस पुढील तपास करीत आहेत.

गेल्यावर्षी जून महिन्यात वाठादेव-व्हाळशी चौपदरी बगलमार्गाचे लोकार्पण करण्यात आले असून, या बगलमार्गावर खास करुन व्हाळशी जंक्शनवर अपघातांचे सत्र चालूच आहे. आतापर्यंत या व्हाळशी जंक्शनवर मिळून बगलमार्गावर पंधराहून अधिक अपघात घडले आहेत.

Bicholim Accident
Goa Accident: उसगाव-फोंडा मार्गावर चिरेवाहू ट्रक उलटला! चालक जखमी; काही वेळ वाहतूक कोंडी

जवळपासच्या लोकांना होणारा मनस्ताप आणि तक्रारीची दखल घेवून बांधकाम खात्याकडून बगलमार्गाच्या जंक्शनवरील रंब्लर्स अलीकडेच काढण्यात आले आहेत. मात्र अद्याप ''गतीरोधक'' बसविलेले नाहीत. अपघातांवर नियंत्रण येण्यासाठी बगलमार्गावर ''गतीरोधक'' बसवावेत, अशी मागणी रोहिदास गाड आदी स्थानिकांनी केली आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa News in Marathi - Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com