पणजी: आंध्र प्रदेशचे माजी मुख्यमंत्री वाय. एस. राजशेखर रेड्डी (Y. S. Rajasekhara Reddy) यांचे बंधू वाय. एस. विवेकानंद रेड्डी (Y. S. Vivekananda Reddy) यांच्या हत्येमधील मुख्य साक्षीदार असलेल्या सुनील यादव याला काल केंद्रीय अन्वेषण ब्युरोने (CBI) गोव्यातून (Goa) ताब्यात घेतले. वाय. एस. विवेकानंद रेड्डी यांची मार्च 2019 मध्ये आंध्र प्रदेश येथील त्यांच्या निवासस्थानी हत्या करण्यात आली होती. (Reddy murder case Leading witness arrested in Goa)
गेल्या अनेक आठवड्यांपासून सीबीआयमार्फत तपास सुरू असलेला सुनील यादव आपल्या कुटुंबासह आंध्र प्रदेशमधून बेपत्ता झाला होता. तो गोव्यात वास्तव्यास असल्याची माहिती मिळताच सीबीआयच्या पथकाने त्याला गोव्यातून शोधून काढले व काल रात्री त्याला आणि त्याच्या कुटुंबातील इतर सदस्यांना ताब्यात घेतले. त्यांना गोवा येथील न्यायालयात हजर केल्यानंतर सीबीआय अधिकाऱ्यांनी सुनील यादव आणि त्यांच्या कुटुंबियांना ट्रांझिट वॉरंटवर कडपा येथे हलवले.
सीबीआयच्या अधिकाऱ्यांनी यापूर्वी कुमार यांच्या विवेकानंद रेड्डीशी असलेल्या संबंधांबाबत चौकशी केली होती. विवेकानंदांच्या घराचा चौकीदार रंगैया यांनी दंडाधिकारी न्यायालयात आपले बयान नोंदवल्यानंतर लगेचच सीबीआयने आपला तपास गतीने सुरू केला आणि अनेक संशयितांची पुन्हा चौकशी सुरू केली.
सुनीलने अलीकडेच उच्च न्यायालयात याचिका दाखल केली असून त्यात म्हटले आहे की सीबीआय त्याच्यावर थर्ड डिग्रीचा वापर करत आहे आणि त्याच्या कुटुंबातील सदस्यांना त्रास देत आहे. त्यांनी सीबीआयला अटक न करण्याचे निर्देश देण्याचे न्यायालयाकडे आदेश मागितले आणि नंतर ते त्यांच्या पुलिवेन्दुला निवासस्थानातून बेपत्ता झाले. सीबीआयने पुलिवेंदुला आणि अनंतपूरमध्ये त्याचा शोध सुरू केला होता; आणि शेवटी त्याला गोव्यात शोधण्यात आले आणि त्यानंतर त्याला अटक करण्यात आली.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.