Margao: मूळ भूमिपुत्र हरवत चाललेला मतदारसंघ

Margao शहराची व्‍याप्‍ती वाढल्याने लोकसंख्येतही वाढ. पाणी आणि वीज यंत्रणेवर देखील ताण
Margao city in Goa
Margao city in GoaDainik Gomantak
Published on
Updated on

मडगावला (Margao) अगदी जवळ असलेला नावेली (Naveli) मतदारसंघ. हा मतदारसंघ एकेकाळी अस्सल मूळ गोमंतकीय (एसटी) निवासींचे स्थान, अशी ओळख मिरवीत होता. कालांतराने नावेलीचा शहरी विस्‍तार झाला. मडगावला हा मतदारसंघ जवळ असल्याने मडगावचेच उपनगर म्हणून या मतदारसंघाची वाढ होऊ लागली. व्यवसायानिमित्त बाहेरचे लोक येऊन या भागात स्थायिक होऊ लागले. त्यामुळे आता हा मतदारसंघ मूळ भूमिपुत्रांनाच (Bhumiputra) गमावून तर बसणार नाही ना, अशी भीती आता स्थानिक लोकांमध्ये वाढू लागली आहे.

नावेली हा गाव मडगावला जवळ असल्याने या भागात मोठ्या प्रमाणात बांधकामे उभी झाली. बांधकामे उभी होणे म्हणजे त्यासाठी मजूर हे आलेच. त्यातच मडगावात रेल्वे जंक्शनचा विस्तार झाल्याने येथे कामाला येणाऱ्या लोकांची संख्या वाढली. त्यांना मडगावात राहायला जागा शिल्लक नव्हती. त्यामुळे त्यांनी नावेलीत आसरा घेतला. नावेलीच्या मूळ निवासींची टक्केवारी कमी होण्यामागे हेच मुख्य कारण. त्यामुळे येथील राजकीय समीकरणेही बदलली आहेत.

Margao city in Goa
Goa: मुख्यमंत्र्यांच्याच मतदारसंघात पिडितेचा वर्षभर अमानुष छळ

परप्रांतीयांच्या संख्येत वाढ

एकेकाळी जो मतदारसंघ आपल्या मूळ निवासी मतदारांसाठी प्रसिद्ध होता त्याच मतदारसंघात परप्रांतीय मजुरांची संख्या वाढू लागली आहे. परिणामी, या मतदारसंघातील गुन्हेगारीही वाढू लागली आहे. रुमडामळ पंचायत क्षेत्रात, तर मूळ निवासी केवळ औषधापुरते शिल्लक राहिले आहेत, असे म्हणायची वेळ आली आहे. शांतीनगर भागातही तेच होत आहे. दवर्ली-दिकरपाल पंचायत सोडल्यास इतर सर्व ठिकाणी हेच चित्र दिसत आहे. याचा परिणाम स्थानिक पारंपरिक व्यवसायावर झालेला दिसत असून एकेकाळी ज्या मतदारसंघाकडे कृषिप्रधान म्हणून पाहिले जात होते, ती ओळखच बदलली आहे.

नावेली मधून सिद्धार्थ कारापूरकर म्हणतात, "मूळ निवासी आता परप्रांतीयांची संख्या वाढल्याने कमी होत आहेत. हे मूळ निवासी या गर्दीत हरवून जाऊ नये, यासाठी त्याच्याकडे खास लक्ष देण्याची गरज आहे. त्यांच्या पारंपरिक व्यवसायांना आधुनिकतेची जोड देऊन ते आपला व्यवसाय सोडून दुसरीकडे जाणार नाही याकडे लक्ष दिले पाहिजे." सावियो कुतिन्हो यांच्या मते, "मतदारसंघ सध्या आधुनिक होत आहे. त्यामुळे पूर्वीची संस्कृती काही प्रमाणात लुप्त होत आहे, ही गोष्ट खरी आहे. वाढलेल्या बांधकामांमुळे येथील साधनसुविधांवर ताण येऊ लागला आहे."

सिद्धेश भगत,म्हणतात, "मतदारसंघात लोक वाढत आहेत. त्या तुलनेत येथे साधनसुविधा वाढलेल्या नाहीत. त्या वाढणे आवश्यक आहेत. स्थानिकांना रोजगाराच्या संधीही मिळाल्या पाहिजेत."

Margao city in Goa
Goa: महिलांच्या संरक्षणात गोवा सरकार अपयशी

समतोल राखण्याची गरज

नावेलीतही स्थानिक रोजगार संधीसाठी दुसरीकडे जाऊ लागल्याने मतदारसंघातील समतोल बिघडण्याची शक्यता आहे. त्यावर उपाय म्हणजे स्थानिकांना अधिक प्रमाणात रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देणे हाच आहे. नावेलीत कित्येक ठिकाणी तळी आहेत. ज्यांचा वापर पूर्वी मासेमारीसाठी केला जायचा. पण, आता तिथे सांडपाणी सोडल्याने हे जलाशय दूषित झाले आहेत. ते साफ करून या तळ्यांचा वापर पर्यटन आणि मासळी उत्पादनासाठी केल्यास रोजगाराच्या संधी निर्माण होऊ शकतात.

साधनसुविधांवर ताण

वाढत्या लोकसंख्येमुळे आता साधनसुविधांवरही ताण येऊ लागला. एकेकाळी ज्या मतदारसंघाला सर्व सोयींनी युक्त म्हणून ओळखले जायचे, त्याच मतदारसंघात पाणी आणि विजेची समस्या ही आता डोकेदुखी बनली आहे. या मतदारसंघातील शिक्षणाच्या सुविधा उच्च स्तरावरच्या आहेत, रस्त्यांचे जाळेही उत्तम आहे. येथे एकही वाडा असा नाही जिथे रस्ता पोहोचलेला नाही. यामुळेच लोकवस्‍ती वाढली व सुविधांवर ताण पडला.

आमचा जाहीरनामा

∙ वीज, पाणीपुरवठा सुधारण्याची गरज

∙ प्रदूषित सायपे तळ्याचे शुद्धीकरण करून पर्यटनाच्या दृष्टीने विकास करणे

∙ रस्त्यांची दुरुस्ती तातडीने हाती घ्यावी

∙ पारंपरिक व्यवसायांना उर्जितावस्था आणण्यासाठी उपक्रम हाती घ्यावेत

∙ गुन्हेगारीवर नियंत्रण आणण्यासाठी नावेलीत स्वतंत्र पोलिस स्टेशन हवे

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com