Dainik Gomantak  Goa Public Service Commission
गोवा

Goa Public Service Commission: सरकारी तंत्रनिकेतन प्राचार्य पदासाठी केलेली शिफारस रद्द

Goa Public Service Commission: गोवा लोकसेवा आयोगाला खंडपीठाचा दणका

दैनिक गोमन्तक

Goa Public Service Commission: गोवा सरकारी तंत्रनिकेतनच्या प्राचार्य पदासाठी समर्थ भगीरथ बोरकर यांची गोवा लोकसेवा आयोगाने केलेली निवड व शिफारस मुंबई उच्च न्यायालयाच्या गोवा खंडपीठाने रद्दबातल ठरवत आयोगाला दणका दिला आहे.

याचिकादार प्रमोदिनी एस. नाईक ऊर्फ प्रमोदिनी गावकर या प्रतीक्षा यादीत एकमेव उमेदवार असल्याने त्यांची शिफारस आयोगाने करावी,सरकारने तीन महिन्यांत त्यावर निर्णय घ्यावा, असे निर्देश देत ही याचिका निकालात काढली.

गोवा सरकारी तंत्रनिकेतन प्राचार्य पदासाठी आवश्‍यक पात्रता समर्थ बोरकर यांच्याकडे अर्ज सादर करण्याच्या शेवटच्या दिवशी नसल्याने आयोगाने त्यांची निवड व शिफारस सरकारला करण्याची गरज नव्हती. आयोगाने त्यांची शिफारस केली तरी त्यांची नियुक्ती केली नाही.

परीक्षेत याचिकादाराला गुण कमी असल्याने समर्थ यांची शिफारस केली होती. प्राचार्यपदी नियुक्ती नसल्याने सरकार अजूनही याचिकादाराचा या पदासाठी विचार करू शकते, असे निरीक्षण न्यायालयाने नोंदले आहे. याचिकादारातर्फे ॲड. डिसा यांनी तर सरकारतर्फे एजी.देविदास पांगम यांनी बाजू मांडली.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

IND vs WI 3rd T20I: दुसऱ्या सामन्यातील पराभवानंतर टीम इंडियात मोठा बदल? नमन धीरऐवजी 'या' खेळाडूला मिळू शकते संधी

कामात दिरंगाई केल्यास थेट बडतर्फी! CM सावंत यांचा सरकारी अधिकाऱ्यांना इशारा

Viral Video: सामसूम रस्ता, किर्र अंधार अन् सायकलवरून बाप-लेकीचा प्रवास; अचानक मागून कारची एन्ट्री झाली अन् चालकाने... पाहा व्हिडिओ

Money Laundering Case: 3 कोटींच्या मनी लाँडरिंग प्रकरणात पाच आरोपींवर आरोप निश्चित; 'ईडी'ची कारवाई

Under 19 Cricket: आफ्रिद राजाक्कनावरची नाबाद 82 धावांची खेळी व्यर्थ; गोव्याचा सलग दुसरा पराभव, जम्मू-काश्मीरने 69 धावांनी नमविले

SCROLL FOR NEXT