Digambar Kamat Dainik Gomantak
गोवा

Digambar Kamat : ...म्हणून दिगंबर कामतांनी घनःश्यामांचे पंख छाटले

मडगाव परिसरात चर्चा; घनःश्याम म्हणतात, विधानसभेवर डोळा नव्हताच

गोमन्तक डिजिटल टीम

Digambar Kamat : मडगाव पालिकेचा नगराध्यक्ष कुणीही बनला तरी हरकत नाही, पण घनःश्याम शिरोडकर नगराध्यक्ष होऊ नये असा एकच मुद्दा घेऊन दिगंबर कामत यांनी नगरपालिका कायद्यातही वटहुकूम आणून बदल घडवून आणला. दिगंबर कामत हे शिरोडकर यांना आपला भविष्यातील विधानसभा निवडणुकीतील प्रतिस्पर्धी समजत आहेत का? अशी चर्चा सध्या चालू आहे.

शिरोडकर नगराध्यक्ष बनले तर पुढे विधानसभा निवडणुकीत ते गोवा फॉरवर्डचे उमेदवार बनून आपल्याला आव्हान देतील या भीतीनेच कामत यांनी त्यांचे पंख आताच छाटले अशी चर्चा रंगू लागली आहे.

वास्तविक यावेळची पालिका निवडणूक शिरोडकर यांनी कामत यांच्या गटातूनच लढविली होती. मात्र, त्यांना नगराध्यक्ष न केल्याने त्यांनी कामत यांची साथ सोडली होती. त्यानंतर झालेल्या विधानसभेच्या निवडणुकीत शिरोडकर यांनी आपल्याला कामत यांच्या विरोधात भाजपची उमेदवारी मिळू शकते का याची चाचपणी केली होती.

यासंबंधी शिरोडकर यांना विचारले असता, नगराध्यक्ष निवडणूक लढविताना पुढे कधी तरी आपण विधानसभा निवडणूक लढवणार असे मी कधी ध्यानातही आणले नव्हते. मडगावात जी काही कामे करायची आहेत ती नगराध्यक्ष बनून मार्गी लावू हेच ध्यानात ठेवले होते, असे सांगितले. दरम्यान, दिगंबर कामत यांची प्रतिक्रिया जाणून घेण्यासाठी त्यांना फोन लावला, पण ते गोव्याबाहेर असल्याने त्यांचा संपर्क होऊ शकला नाही.

सरदेसाईंच्या वक्तव्यानंतर हालचालींना वेग

याच पार्श्वभूमीवर मडगाव पालिकेतील नवीन घडामोडीकडे पाहिले जात आहे. शिरोडकर हे मडगावचे नगराध्यक्ष म्हणून निवडून आल्यावर विजय सरदेसाई यांनी आम्ही आता मडगाव मतदारसंघातही मुसंडी मारू असे सूचक उद्‌गार काढले होते आणि त्यानंतर पालिका राजकारणात वेगवान हालचालींना वेग आला होता.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Dawood Ibrahim Property: दाऊद इब्राहिमला मोठा धक्का! रत्नागिरीतील वडिलोपार्जित जमिनीचा लिलाव; गुन्हेगारी साम्राज्यातील मालमत्तेवर सरकारची टाच

Israeli Soldier Iranian Girl Love Story: दुश्मनी विसरुन बांधली प्रेमाची गाठ! इस्रायली फौजी अन् इराणी सुंदरीची 'लव्हस्टोरी'; युद्धाच्या रणधुमाळीत उरकला साखरपुडा

VIDEO: सर जडेजाच्या फिरकीचा खेळ खल्लास! वैभव सूर्यवंशीनं केली चौकार-षटकारांची बरसात; बॅटिंगचा थरार पाहून तुम्हीही व्हाल थक्क

Horoscope 20 March 2026: 'या' राशींवर होणार धनाचा वर्षाव! सुख-सुविधा आणि प्रेमाचा योग, वाचा काय सांगते तुमचे आजचे भविष्य?

CM Pramod Sawant: मुख्यमंत्री सावंत यांच्यावर पुण्यात 'अँजिओप्लास्टी' शस्त्रक्रिया यशस्वी, प्रकृती स्थिर असल्याची डॉक्टरांची माहिती

SCROLL FOR NEXT