Panaji  Dainik Gomantak
गोवा

Panaji News : ग्रंथपालांच्या स्वभावावर वाचनसंस्कृती अवलंबून : शैलेंद्र झिंगडे

Panaji News : पणजीतील मध्यवर्ती वाचनालयात झालेल्या ग्रंथपाल कार्यशाळेचे समारोप

गोमन्तक डिजिटल टीम

Panaji News :

पणजी, आपल्याला वाचन संस्कृती वाढवायची असेल तर वाचनालयात येणाऱ्या वाचकांसोबत, विद्यार्थ्यांसोबत आपुलकीने बोलून त्यांची रुची कोणत्या विषयात आहे हे समजून त्यांना त्याप्रकारची पुस्तके देणे गरजेचे आहे.

ग्रंथपालांच्या स्वभावावर वाचनसंस्कृती अवलंबून असल्याचे प्रतिपादन शिक्षण संचालक शैलेंद्र झिंगडे यांनी केले.

कृष्णदास शामा मध्यवर्ती वाचनालय आणि राजाराम मोहन रॉय फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने माध्यमिक आणि उच्च माध्यमिक विद्यालयातील ग्रंथपालांसाठी आयोजित कार्यशाळेच्या समारोप सत्रात ते बोलत होते.

यावेळी कला आणि संस्कृती संचालक सगुण वेळीप, ग्रंथपाल डॉ. सुशांत तांडेल, शिक्षण संचालनालयाचे पॉल फर्नांडिस, संयोजक नविता दिवाडकर आदी उपस्थित होते.

झिंगडे पुढे म्हणाले की, प्रथम बुकशी सामंजस्य करार करून शाळांना पुस्तके दिली आहेत. प्रास्ताविक डॉ. सुशांत तांडेल यांनी केले. आभार नविता दिवाडकर यांनी मांडले.

ग्रंथपालांचे योगदान महत्त्वाचे : वेळीप

आपल्या सभोवताली काय घडत आहे ? वाचनासंदर्भात नवीन कोणती पुस्तके आली आहेत याची माहिती ग्रंथपालांनी वाचकांना देणे अपेक्षित असते. सुसंस्कृत पिढी घडवत असतो त्यामुळे ग्रंथपालांचे योगदान महत्त्वाचे असते, असे कला आणि संस्कृती संचालक सगुण वेळीप यांनी सांगितले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Android युजर्ससाठी खूशखबर! WhatsApp चा लूक पूर्णपणे बदलणार; आता तुमच्या फोनमध्येही दिसणार iPhone सारखा स्टायलिश 'फ्लोटिंग बार'!

Goa Postmen: गोव्यातील पोस्टमन 'आऊटसाईडर', 15 वर्षांपासून रोजंदारीवर; कायमस्वरूपी नोकरीसाठी आमदार आमोणकरांना साकडे

Pakistan Minister Video: ''अशी परत जाऊ नकोस''! पाकिस्तानी मंत्र्याचा महिला पत्रकाराची खिल्ली उडवणारा व्हिडिओ व्हायरल; यूजर्सनी घेतलं फैलावर

VIDEO: 'मुंबईचा राजा रोहित शर्मा...' मैदानात चाहत्यांची जोरदार घोषणाबाजी; हिटमॅनची 'ती' खास रिअ‍ॅक्शन कॅमेऱ्यात कैद, व्हिडिओ व्हायरल!

आखाड्यात अनियमित पाणीपुरवठ्याने नागरिक त्रस्त, महिलांची पाण्यासाठी धावपळ; विहिरींचे पाणीही पिण्यायोग्य नसल्यानं नाराजी

SCROLL FOR NEXT