Siddhi Naik Case

 

Dainik Gomantak 

गोवा

Siddhi Naik Case: ‘त्‍या’ मंत्र्यालाही मंत्रिमंडळातून हाकला

सिद्धी नाईक मृत्यू प्रकरणाची (Siddhi Naik Case) जबाबदारी स्‍वीकारून स्थानिक मंत्र्याने स्वत:हून राजीनामा द्यावा किंवा मुख्यमंत्र्यांनी त्‍यांना मंत्रिमंडळातून काढून टाकावे, अशी मागणी कळंगुटचे माजी आमदार आग्नेल फर्नांडिस यांनी केली.

दैनिक गोमन्तक

Siddhi Naik Case: कळंगुट समुद्रकिनाऱ्यावर अर्धनग्न अवस्‍थेत सापडलेल्‍या सिद्धी नाईक मृत्यू प्रकरणाची (Siddhi Naik Case) नि:पक्षपातीपणे सखोल चौकशी झाली पाहिजे. तसेच याची जबाबदारी स्‍वीकारून स्थानिक मंत्र्याने स्वत:हून राजीनामा द्यावा किंवा मुख्यमंत्र्यांनी (CM Pramod Sawant) त्‍यांना मंत्रिमंडळातून काढून टाकावे, अशी मागणी कळंगुटचे माजी आमदार आग्नेल फर्नांडिस (Agnel Fernandes) यांनी केली.

उत्तर गोवा जिल्हा काँग्रेसचे अध्यक्ष विजय भिके, कळंगुट गटाध्यक्ष बेनेडिक्ट डिसोझा व पक्षाचे नेते मेघश्याम राऊत यांच्या उपस्थितीत म्हापसा येथे उत्तर गोवा काँग्रेस कार्यालयात आयोजित केलेल्या पत्रकार परिषदेत फर्नांडिस बोलत होते. या मृत्यू प्रकरणी विविध शासकीय यंत्रणांच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांची एकंदर भूमिका संशयास्पद आहे. त्यामुळे उत्तर गोवा पोलिस उपधीक्षक, जिल्हाधिकारी इत्यादींच्या विरोधात गुन्हे नोंदवणे आवश्यक आहे, असे फर्नांडिस म्‍हणाले.

सर्व बाजूंनी टीका झाल्यानंतर सुमारे चार महिन्यांनंतर हे प्रकरण खून म्हणून नोंदवण्यात येते हे खूपच आश्चर्यकारक आहे. आता सर्व काही पुरावे लपलेले आहेत. तसेच सीसीटीव्ही कॅमेरा फुटेजही उपलब्ध नाही. अशा परिस्थितीत पोलिस चौकशी कशी होणार हा प्रश्न आहे. या प्रकरणातील गुन्हेगारांची पाठराखण करणाऱ्या कळंगुटमधील एका मातब्बर राजकारण्याकडे बोट दाखवले जात आहे, असा दावाही फर्नांडिस यांनी केला. या एकंदर प्रकरणाच्या चौकशीबाबत राजकीय हस्तक्षेप होतोय असा आरोप जेव्हा सिद्धी नाईक यांचे वडीलच ठासून करताहेत तेव्हा त्या अनुषंगाने पोलिस चौकशी करणे आवश्यक होते. परंतु पोलिसांनी त्याकडे दुर्लक्षच केले, असा आरोपही त्‍यांनी केला.

कळंगुटमधील राजकारण्‍याचे अनेक कारनामे

कळंगुट येथील बागा डेक प्रकरणातही तो स्थानिक राजकारणी गुंतलेला आहे असा घणाघाती आरोप करून फर्नांडिस म्हणाले, सेक्‍स स्‍कँडलमध्‍ये गुंतलेले माजी मंत्री मिलिंद नाईक यांच्याविरोधात तक्रारी दाखल झाल्यानंतरही सरकारने त्यांच्यावर कारवाई करण्यास टाळाटाळ केली होती. परंतु त्या मंत्र्याचे उघडेनागडे फोटो सर्वत्र प्रसिद्ध झाले तेव्हाच सरकारला जाग आली. सिद्धी नाईक मृत्यू प्रकरण व कळंगुटमधील हाणामारीच्या प्रकरणातही मुख्यमंत्री पुराव्यांची वाट बघत आहेत का, असा सवाल फर्नांडिस यांनी केला.

सिद्धी नाईक मृत्‍युप्रकरणी सर्व बाजूंनी टीका झाल्यानंतर सुमारे चार महिन्यांनंतर हे प्रकरण खून म्हणून नोंदवण्यात येते हे खूपच आश्चर्यकारक आहे. आता सर्व काही पुरावे लपलेले आहेत. सीसीटीव्ही फुटेजही उपलब्ध नाहीत. अशा परिस्थितीत पोलिस चौकशी कशी होणार हा प्रश्नच आहे. या प्रकरणातील गुन्हेगारांची पाठराखण करतोय म्‍हणून कळंगुटमधील एका मातब्बर राजकारण्याकडे बोट दाखवले जात आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Viral News Fact Check: मुबलक जांभळे म्हणजे 'दुष्काळाची चाहूल'? सोशल मीडियावर मेसेज होतोय व्हायरल, तज्ज्ञांनी दिलं स्पष्टीकरण

Egg Price Hike: 'ब्रॉयलर' अंडी खाऊ लागली भाव; 90 रुपये डझनने विक्री, 5 महिन्यांनंतर दरवाढ; उकाड्याचा परिणाम

Shreyanka Patil: हवेत चित्त्यासारखी झेप अन् चेंडूवर पकड... श्रेयंकाच्या 'सुपरमॅन' कॅचनं सोशल मीडियावर लावली आग Watch Video

Football Ground Inauguration: माडेल येथे महात्मा गांधी फुटबॉल मैदानाचे उद्‍घाटन, आमदार विजय सरदेसाई यांची उपस्थिती

US Iran Peace Deal: "द डील इज कम्प्लीट!" अमेरिका आणि इराण यांच्यात ऐतिहासिक शांतता करार; 19 जून रोजी स्वित्झर्लंडमध्ये होणार अधिकृत स्वाक्षरी

SCROLL FOR NEXT