मालपे येथे तीन वाहनांचा विचित्र अपघात

मागून टिपरच्या धडकेनंतर कार समोरील डिझेलच्या टँकरवर आदळली
Goa Accident of car in Malpe

Goa Accident of car in Malpe

Dainik Gomantak

Published on
Updated on

पेडणे : मालपे येथे तीन वाहनांचा विचित्र अपघात (Goa Accident) झाला आहे. गुरुवारी सकाळी 10 वाजण्याच्या सुमारास मुंबई-गोवा महामार्गावर मालपे येथे उतरणीवर अपघात झाल्याची माहिती मिळाली. अग्निशमन दलाच्या जवानांनी तातडीने घटनास्थळी धाव घेत मदतकार्य केल्याने मोठी जीवितहानी टळली आहे.

<div class="paragraphs"><p>Goa Accident of car in Malpe </p></div>
चिखलीत प्रवासी बस ला आग; सुदैवाने जीवितहानी टळली

पेडण्याजवळ (Pedne) असलेल्या मालपे येथील एका उतरणीवर गुरुवारी सकाळी दहा वाजता अपघात झाला आहे. रेवोडा येथून सातार्ड्याला जाणाऱ्या मारुती गाडीला मालपे उतरणीवर पाठीमागून टिपरने जोरदार धडक (Car Accident) दिली. त्यामुळे पुढून येत असलेल्या टँकरला मारुती गाडीची जोरदार धडक बसली. ही धडक इतकी भीषण होती की कारच्या दर्शनी आणि मागच्या भागाचा अक्षरश: चुराडा झाला आहे.

ज्या टँकरला कारची धडक बसली, तो मुंबईहून (Mumbai) मोपा एअरपोर्टकडे डिझेल घेऊन जात होता. अग्निशमन दलाच्या जवान वेळीच पोहोचल्याने मोठी हानी टळली आहे. अन्यथा डिझेलच्या टँकरमुळे आगही पेटू शकली असती. कारमधील दोघांनाही किरकोळ दुखापत झाली आहे. दोन्ही जखमींवर रुग्णालयात उपचार सुरु आहेत.

<div class="paragraphs"><p>Goa Accident of car in Malpe </p></div>
विहिरीत पडलेल्या 72 वर्षीय वृद्धेला अग्निशमन दलाच्या जवानांची मदत

अग्निशमन दलाच्या जवानांची तत्परता

अपघाताची माहिती मिळताच तातडीने अग्निशमन दलाच्या (Fire Brigade) जवानांनी घटनास्थळी धाव घेतली. अत्याधुनिक यंत्रणेचा वापर करुन दोघांचे प्राण वाचवण्यात यश आले. दोन्ही जखमींना अग्निशामक दलाच्या जवानांनी 108 रुग्णवाहिकेमध्ये घालून तुये आरोग्य केंद्रात पाठवले. दोघांची प्रकृती सध्या स्थिर आहे. मारुती गाडीतील श्याम मसूरकर यांच्या पायाला आणि कंबरेला दुखापत झाली असून संदीप गोअप यांच्या पायाला आणि डोक्याला दुखापत झाली आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com