Ravi Naik
Ravi Naik Dainik Gomantak
गोवा

रवी नाईक मडकईत की फोंड्यात?

दैनिक गोमन्तक

फोंडा (मिलिंद म्हाडगुत): एखाद्या रहस्यमय चित्रपटाचे गूढ कसे प्रसंगागणिक वाढते, तसे रवी नाईक यांच्या संभाव्य उमेदवारीबद्दल होऊ लागले आहे. रवी (Ravi Naik) कॉंग्रेसमध्ये असताना ते कॉंग्रेसच्या उमेदवारीवर रिंगणात उतरणार की नाही यावर खल होत होता. जूनमध्ये त्यांनी ‘चाय पे चर्चा’ उपक्रम मडकईत सुरू केला. आता ते मडकईत (Marcaim) जाणार, अशी हवा निर्माण झाली. हा उपक्रम बंद केल्यावर ते फोंड्यातच राहणार असा तर्क वर्तविणे सुरू झाले. भाजपमध्ये (BJP) प्रवेश केल्यावर रवींनी परत ‘चाय पे चर्चा’ उपक्रम सुरू केला. त्यामुळे ते मडकईत जाणार, अशी शक्यता व्यक्त केली जात आहे. मागच्या वेळी भाजपच्या सुनील देसाईंना 6400 मते प्राप्त झाली होती. त्यांचा रवींनी 3050 मतांनी पराभव केला होता. यंदा रवींनी भाजपमध्ये प्रवेश केला असला तरी या मतदारसंघाच्या उमेदवारीवर अनेक दावेदार दिसताहेत.

रवींच्या प्रवेशामुळे समीकरणे बदलली असली तरी सुनील देसाई, संदीप खांडेपारकर, विश्वनाथ दळवीसारखे अनेक इच्छुक शर्यतीत आहेत. हल्लीच उमेदवारांची चाचपणी करण्यासाठी फोंड्यात भाजपची बैठक झाली. त्यात चिठ्ठ्या टाकून उमेदवारांची निवड केली. यावेळी फोंड्यात सुनील देसाई यांच्या बाजूने कळस झुकल्याची माहिती प्राप्त झाली.

संदीप खांडेपारकरांचे जर-तर

कुर्टी-खांडेपारचे माजी सरपंच संदीप खांडेपारकर यांनी तर भाजपने उमेदवारी न दिल्यास अपक्ष म्हणून रिंगणात उतरण्याची घोषणा केली आहे. संदीप हे 2007 साली भाजपच्या उमेदवारीवर रिंगणात उतरले होते. त्यावेळी त्यांना सहा हजाराच्या आसपास मते मिळून तिसऱ्या क्रमांकावर होते. पण ते अपक्ष म्हणून उतरल्यास भाजपच्या ‘फोंडा मिशनला’ अडथळा बनू शकतात. पण भाजप त्यांना ‘मॅनेज’ करू शकेल, असे बोलले जात आहे.

ढवळीकरांना चेकमेट शक्य

मडकईत परिस्थिती वेगळी आहे. तिथे सुदिनना टक्कर देणारा दुसरा पर्याय नाही. यासाठी मडकईचे भाजप मंडळ रवींच्या नावाने जप करत आहे. रवी मडकईत आले तर सुदिनना ‘चेकमेट’ करता येईल, अशी आशा ते बाळगताहेत. रवी मडकईचे आमदार असतानाच मुख्यमंत्री झाले होते, याचाही दाखला ते देतात. 1994 साली मडकईतून मगोपशी युती करून भाजपचे श्रीपाद नाईक निवडून आले होते. त्यानंतर हा मतदारसंघ भाजपच्या हाताला लागलेला नाही. रवींना उमेदवारी दिल्यास याची पुनरावृत्ती होऊ शकते असे भाजप मंडळाला वाटते.

पण फोंड्याचे काय?

दुसऱ्या बाजूला मडकईतून कॉंग्रेस पक्षातर्फे माजी आमदार लवू मामलेदार यांनीही उतरण्याची तयारी केली आहे. रवी जर खरेच मडकईतून उतरल्यास लवूंची भूमिका काय असेल, हे बघावे लागेल. मडकईत बहुसंख्याक भंडारी समाज प्रामुख्याने लवूंपेक्षा रवींनाच पाठिंबा देऊ शकतो. या समाजाची तसेच अनुसूचित समाजाची मते व रवींची वैयक्तिक मते यांची ‘गोळाबेरीज’ केल्यास रवी मडकईत ‘चमत्कार’ घडवू शकतील, असे मत राजकीय विश्लेषक व्यक्त करताहेत. पण फोंड्याचे काय हाही प्रश्न निर्माण होत आहे.

...तर भाजपमध्ये ‘गद्दारी’

भाजपला जर फोंडा (Ponda) जिंकायचा असेल तर त्यांना रवींवरच डाव लावावा लागेल, असे मत व्यक्त केले जात आहे. कारण फोंड्यात सुमारे 8 हजार मते अल्पसंख्याकांची आहेत. ही मते प्राप्त करणे भाजपच्या आवाक्याबाहेरचे आहे. पण रवींना उमेदवारी दिल्यास काही मते निश्चित भाजपकडे वळू शकतात. फोंड्यातील कॅथलिक समाजावरही रवींचा प्रभाव आहे. पण रवींना उमेदवारी दिल्यास भाजपमध्ये अंतर्गत ‘गद्दारी’ उफाळू शकते.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa BJP: प्रतापसिंह राणे यांचा श्रीपादना पाठिंबा, मी संघाची विचारधारा स्वीकारली; विश्वजीत राणे

Goa Today's Top News : राणेंचा गौप्यस्फोट, लोकसभा, राजकारण, अपघात; राज्यातील ठळक बातम्या एका क्लिकवर

Workers March Goa: पोटावर लाथ मारणारे सरकार हवे कशाला? फार्मा कंपन्यांवरील एस्मा मागे घ्या; पणजीत कामगारांचा एल्गार

Zero Shadow Day: सावली गोमन्तकीयांची साथ सोडणार; राज्यात अनुभवता येणार झिरो शाडो

Goa News: गोव्यात वेश्याव्यवसायिक 12 महिलांना मिळाला मतदानाचा अधिकार

SCROLL FOR NEXT