Voting: विधानसभा निवडणुकीत ज्येष्ठ नागरिक तसेच दिव्यांगाना ‘डोअर स्टेप’ ची सुविधा उपलब्ध करण्यात आली आहे. 80 वर्षावरील ज्येष्ठ नागरिकांना तसेच दिव्यांगाना घरातून मतदान करण्यासाठी फॉर्म भरण्याच्या प्रक्रियेला त्या-त्या बुथवरील बीएलओमार्फेत काम सुरू करण्यात आले आहे.
राज्यात 14 फेब्रुवारी रोजी होणाऱ्या विधानसभा निवडणुकीसाठी (Goa Assembly Elections 2022) केंद्रीय निवडणूक आयोगाने जारी केलेल्या निर्बंधांचे काटेकोरपणे पालन करणे क्रमप्राप्त असून कोविड बाधितांना, 80 वर्षांवरील ज्येष्ठांना, दिव्यांगांना मतदानाचा हक्क मिळवून देण्यासाठी निवडणूक आयोगातर्फे (Election Commission) विविध उपाययोजना आखण्यात आली आहे. यात कोविड मार्गदर्शक तत्वांचे पालन करून कोविडबाधितांना मतदानाचा हक्क मिळवून देण्यासाठी इस्पितळात उपचार घेणारे किंवा गृह विलगीकरणात असलेल्या बाधितांना डॉक्टराचे प्रमाणपत्र सादर केल्यानंतर पोस्टल बॅलेट च्या माध्यमातून मतदान करण्यास मान्यता दिली जाणार आहे. ज्येष्ठ नागरिक, दिव्यांगाना ‘डोअर स्टेप’ ची सुविधा उपलब्ध करण्यात आली आहे.
दरम्यान, बीएलओमार्फत या प्रक्रियेला सुरुवात झाली असून प्रत्येक बीएलओ आपआपल्या भागात घरोघरी जाऊन ज्येष्ठ तसेच दिव्यांग नागरिकांकडून फॉर्म भरून घेत आहे. ज्याला कोणाला मतदान केंद्रावर जाता येत नाही, तसेच जायची इच्छा नाही, अशा ज्येष्ठांनी तसेच दिव्यांगानी सदर फॉर्म भरून देणे क्रमप्राप्त आहे. त्यानुसार त्यांना घरातून मतदान करण्यासाठी मुभा देण्यात येईल. या प्रक्रियेला मुरगाव तालुक्यातील प्रत्येक बिएलओने सुरुवात केली असून त्यांना याकामी प्रतिसाद मिळत आहे.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.