'त्या' आमदारांच्या चौकशीत अजूनही चालढकल

काँग्रेसने विचारला पोलिसांना जाब : प्रतिकात्मक पुतळ्याचे दहन
Delay in police investigation into milind naik case
Delay in police investigation into milind naik caseDainik Gomantak

पणजी: भाजपचे माजी मंत्री तथा आमदार मिलिंद नाईक यांच्याविरुद्ध दाखल केलेल्या सेक्स स्कँडल प्रकरणीच्या तक्रारीसंदर्भात पोलिसांनी तपासकामात चालढकलपणा केल्याबाबत काँग्रेस कार्यकर्त्यांनी पणजी महिला स्थानकावर जाऊन जाब विचारला. काँग्रेस कार्यालयाजवळ नाईक यांचा निषेध नोंदवत त्यांच्या प्रतिकात्मक पुतळ्याचे दहन केले. गुन्हा नोंदविण्यास होत असलेल्या दिरंगाईबाबत न्यायालयात जाण्याचा इशारा यावेळी काँग्रेस (Goa Congress) नेत्यांनी पोलिस (Goa Police) स्थानकाच्या अधिकाऱ्यांना दिला. (Delay in police investigation into milind naik case)

Delay in police investigation into milind naik case
Goa BJP: भाजपच्या कार्यकर्ता बैठकीत शाब्दिक बाचाबाची

काँग्रेसचे प्रदेश उपाध्यक्ष संकल्प आमोणकर यांनी दाखल केलेल्या तक्रारीनुसार या प्रकरणात कोणताच तपासकाम झालेला नाही. मात्र, या प्रकरणातील पीडितेने दिलेल्या तक्रारीचा तपास सुरू करून आमोणकर यांना जाणूनबुजून चौकशीसाठी बोलावून सतावणूक केली जात असल्याचा आरोप करण्यात आला. यावेळी पोलिस स्थानकावर जाब विचारण्यास गेलेल्यांमध्ये महिला काँग्रेस अध्यक्षा बीना नाईक, युवा काँग्रेस अध्यक्ष वरद म्हार्दोळकर आणि महिला कार्यकर्त्या उपस्थित होत्या. यावेळी पोलिसांना तपासकाम अजून का सुरू केले नाही, असे विचारले असता त्यांनी उत्तर देण्याचे टाळले.

राज्यातील महिला असुरक्षित

डिसेंबरमध्ये संकल्प आमोणकर यांनी आमदार मिलिंद नाईक (MLA Milind Naik) यांच्याविरुद्ध सेक्स स्कँडलप्रकरणी तक्रार केल्यानंतर भाजप सरकारने त्यांना मंत्रिपदावरून हटवले. मात्र, या तक्रारीला एक महिना उलटून गेला तरी त्यांची चौकशी सुरू झाली नसल्याने सरकार पोलिसांवर दबाव आणून आमदारांना पाठीशी घालत असून तक्रारदार आमोणकर यांचीच सतावणूक केली जात आहे. गुन्हेगारांनाच संरक्षण दिले तर राज्यातील महिला सुरक्षित कशा राहू शकतील, असा प्रश्‍न बीना नाईक यांनी केला.

म्हणून आमोणकर यांची सतावणूक

काँग्रेसचे उमेदवार संकल्प आमोणकर (Congress candidate Sankalp Amonkar) यांना मुरगाव मतदारसंघात लोकांचा चांगला प्रतिसाद मिळत आहे. त्यांच्या प्रचारात अडथळा आणण्यासाठी पीडित महिलेच्या तक्रारीसंदर्भात त्यांना बोलावून त्यांचा वेळ वाया घालवण्याचा प्रयत्न सुरू आहे. त्यांना नाहक त्रास दिला जात आहे. पोलिस सरकारच्या तालावर नाचत आहेत. पुढील सरकार काँग्रेसचे आल्यावर ही सतावणूक करणाऱ्या पोलिसांनी भविष्यात कारवाईला सामोरे जाण्यास राहावे, असा इशारा वरद म्हार्दोळकर यांनी दिला.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
dainikgomantak.esakal.com