Ravi Naik Gomantak Digital Team
गोवा

Book Publication : कलेच्या माध्यमातून समाजप्रबोधन ही काळाची गरज

मंत्री रवी नाईक : मिलिंद म्हाडगुत यांचा सत्तरीनिमित्त सत्‍कार सोहळा; पुस्‍तकाचेही उत्‍साहात प्रकाशन

गोमन्तक डिजिटल टीम

Ponda News : आजच्‍या युवकांनी मरगळ झटकून पुढे आले पाहिजे. समाजाला दिशा दाखविण्‍याचे काम शिक्षक व पत्रकारांनी करावे. मिलिंद म्हाडगुत यांनी सर्वच क्षेत्रांत उल्लेखनीय कार्य केले आहे. या कार्यात म्‍हाडगुत यांना त्‍यांची पत्‍नी विद्या म्हाडगुत व मित्रपरिवाराचे मोठे योगदान लाभले आहे.

कलेच्या माध्यमातून समाजप्रबोधन करण्याची गरज आहे, असे आवाहन कृषिमंत्री तथा फोंड्याचे आमदार रवी नाईक यांनी केले. साहित्यिक, लेखक व कलाकार मिलिंद म्हाडगुत यांचा त्‍यांच्‍या सत्तरीनिमित्त येथील भोलानाथ सभागृहात वाढदिन सोहळा आयोजित करण्‍यात आला होता.

त्‍यावेळी मंत्री नाईक बोलत होते. व्यासपीठावर नगराध्यक्ष रितेश नाईक, दै. ‘गोमन्तक’चे संपादक-संचालक राजू नायक, फोंडा नगराध्यक्ष रितेश नाईक, मिलिंद म्हाडगुत, त्यांच्या पत्नी विद्या म्हाडगुत व सत्कार समितीचे अध्यक्ष महादेव खानोलकर आदी मान्यवर उपस्थित होते.

नगराध्यक्ष रितेश नाईक यांनीही मिलिंद म्हाडगुत यांना शुभेच्छा देताना सर्वच क्षेत्रांत उल्लेखनीय कार्य केलेले ते एक उत्तुंग व्यक्तिमत्त्व असल्याचे सांगितले. स्वागत व प्रास्ताविक महादेव खानोलकर यांनी केले. या सोहळ्‍यात म्हाडगुत यांच्‍या ‘कुवाडे’ या पुस्तकाचे रवी नाईक व राजू नायक यांच्या हस्ते प्रकाशन करण्‍यात आले.

रवी नाईक यांच्या हस्ते शाल व श्रीफळ देऊन तर राजू नायक यांच्या हस्ते मानपत्र देऊन म्हाडगुत यांचा सत्कार करण्यात आला. ‘कुवाडे’ चित्रपटातील कलाकारांचा यावेळी गौरव करण्यात आला. नाट्यकलाकार नामदेव शेट व वृषाली बेतकीकर यांनी सुरेख प्रवेश सादर केला. संदीप फडते यांनी गीते सादर केली. नितीन कोलवेकर यांनी सूत्रसंचालन केले तर म्‍हाडगुत यांनी आभार मानले.

मिलिंद म्हाडगुत अष्टपैलू व्यक्तिमत्त्व : नायक

समाजाला योग्य दिशा दाखवण्याबरोबरच सुसंस्कृत युवापिढी घडविण्याचे कार्य शिक्षकांकडून व्हायला हवे. पण दुर्दैवाने अवघ्याच लोकांकडून हे काम होताना दिसते. समाजातील जाणिवा आणि उणिवा या प्रकर्षाने समोर आणताना एक सक्षम समाज घडायला हवा.

मिलिंद म्हाडगुत हे एक अष्टपैलू व्यक्तिमत्त्व. चित्रपटांबद्दल पुरेपूर माहिती असलेलं एक अजब रसायन. पत्रकारितेच्या क्षेत्रात वावरताना राजकारणाचा योग्य मागोवा त्यांनी घेतला. ते आज पुण्या-मुंबईत असते तर निश्चितच एखाद्या बड्या माध्यमसमूहाचे बडे अधिकारी झाले असते, असे सांगून ‘गोमन्तक’चे संपादक-संचालक राजू नायक यांनी म्‍हाडगुत यांना शुभेच्छा दिल्या.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Horoscope: आजचा दिवस 'गोल्डन' ठरणार! मिथुन, कर्कसह 'या' 4 भाग्यवान राशींना करिअरमध्ये मोठे यश, वाचा तुमचे भविष्य

Goa Live News: कदंब बसच्या धडकेत 23 वर्षीय तरुणी ठार, एकजण जखमी; वेर्णा येथे झाला अपघात

Tilak Varma: आशिया कपमध्ये कमाल, आता तिलक वर्मा करणार कॅप्टन्सी! टीमची झाली घोषणा; पाहा संपूर्ण संघ

BJP Rath Yatra Goa: भाजपतर्फे 25 डिसेंबरपर्यंत रथयात्रा, पदयात्रा; मतदारसंघनिहाय मेळावे होणार, स्वदेशीचा नारा करणार बुलंद

PM Surya Ghar Scheme:'पीएम सूर्य घर मुफ्‍त बिजली'च्या जागृतीला चालना, उत्तर गोवा जिल्हा समन्वय समितीच्‍या बैठकीत निर्णय

SCROLL FOR NEXT