Ravi Naik Final Farewell Dainik Gomantak
गोवा

Ravi Naik: गोंयचो पात्रांव अनंतांन विलीन! रवी नाईक यांना 21 बंदुकींच्या सलामीसह अखेरचा निरोप

Ravi Naik Last Rites: मंगळवारी सायंकाळी त्यांचे निधन झाल्यानंतर त्यांना अखेरचा निरोप देण्यासाठी, फोंडा येथील रस्त्यांवर हजारो नागरिकांचा जनसागर लोटला होता

Akshata Chhatre

21 gun salute to Ravi Naik: गोव्याचे माजी मुख्यमंत्री आणि गोव्यातील ज्येष्ठ नेते रवी एस. नाईक यांच्या पार्थिवावर आज, बुधवारी (१५ ऑक्टोबर) त्यांच्या मूळ गावी फोंडा येथे शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले. मंगळवारी सायंकाळी त्यांचे निधन झाल्यानंतर त्यांना अखेरचा निरोप देण्यासाठी, फोंडा येथील रस्त्यांवर हजारो नागरिकांचा जनसागर लोटला होता.

'पात्रांव' या लाडक्या नावाने ओळखल्या जाणाऱ्या या नेत्याच्या निधनाने त्यांचे समर्थक आणि सर्वसामान्य नागरिक भावनाविवश झाले. अनेक समर्थक आणि हितचिंतकांना शोक अनावर झाल्याने त्यांना अश्रू आवरता आले नाहीत.

२१ बंदुकींची सलामी आणि राजकीय सन्मान

रवी नाईक यांना गोवा पोलिसांच्या तुकडीने २१ बंदुकींची सलामी देऊन संपूर्ण शासकीय सन्मानाने अखेरचा निरोप देण्यात आला. हा सन्मान त्यांच्या राजकीय जीवनातील महत्त्वाचे स्थान आणि राज्यासाठी दिलेल्या योगदानाचे प्रतीक होता.

नाईक यांना राष्ट्रीय व्हॉलीबॉलपटू म्हणून ओळखले जात असे. त्यांनी बार मालकापासून मुख्यमंत्रीपदापर्यंतचा प्रवास केला आणि ते १९८४ पासून गोव्याच्या विधानसभेशी जोडले गेले. त्यांच्या निधनामुळे सरकारने तीन दिवसांचा राज्य दुखवटाही जाहीर केला आहे.

'केवळ एका समाजाचे नव्हे, तर संपूर्ण गोव्याचे नेते'

नाईक हे केवळ एका समाजाचे नव्हे, तर संपूर्ण गोव्याचे नेते होते. काँग्रेस आमदार मायकल लोबो यांनी "रवी नाईक साहेब हे केवळ एकाच समाजाचे लीडर नव्हते, ते गोव्यातील सगळ्या समाजांचे फुडारी (प्रमुख नेता) होते," असे सांगत त्यांच्या लोकप्रियतेची कबुली दिली. माजी मुख्यमंत्री दिगंबर कामत यांनी नाईक यांच्या धाडसी स्वभावाची आठवण सांगितली, "भाषेवरून वाद सुरू असताना रवी नाईक पिस्तूल घेऊन बाहेर पडले आणि म्हणाले की, मी पाहतो कोण काय करतो ते." या आठवणींनी त्यांचे जनतेवरील प्रेम आणि निर्भीडपणा अधोरेखित होतो.

राजकीय मतभेद बाजूला ठेवून आदरांजली

रवी नाईक यांनी सार्वजनिक जीवनात दिलेले दशकाहून अधिकचे योगदान आणि फोंडा तसेच राज्यातील लोकांशी असलेले त्यांचे संबंध यामुळे त्यांना सन्मानित करण्यासाठी सर्व राजकीय पक्षांचे नेते आणि नागरिक एकत्र आले होते. राजकीय मतभेद बाजूला ठेवून सर्वानी दिवंगत मंत्री नाईक यांच्या अंतिम यात्रेत सहभाग घेतला. अत्यंत भावूक वातावरणात आणि जनसागराच्या साक्षीने, गोव्याच्या राजकारणातील एका युगाचा अस्त झाला.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

WTC Points Table: भारताच्या 'क्लिन स्वीप'चा पाकिस्तानला फायदा, WTC पॉइंट टेबलमध्ये उलटफेर; दक्षिण आफ्रिकेने मारली बाजी

रस्ते खोदाल तर याद राखा!! PM मोदींच्या दौऱ्यासाठी दक्षिण गोव्यात रस्ते खोदकामावर बंदी; नियमांचे उल्लंघन केल्यास गुन्हा दाखल

Baina Dacoity: 6वा मजला, 6 दिवस, 6 आरोपी! 'गोवा पोलिसांनी करून दाखवलं'; बायणा दरोडा प्रकरणी पीडित कुटुंबाला मोठा दिलासा

संपादकीय: पोलिसांचे मनोबल उंचावण्याची गरज, बेतुल मारहाण ते दरोडेखोरांची दगडफेक; गोव्याच्या कायदा-सुव्यवस्थेचे विषण्ण चित्र!

Goa Zilla Panchayat Election: बोरी आणि शिरोड्यात आता 'महिलाराज'! दोन्हीही जागा महिलांसाठी आरक्षित; विद्यमान जिल्हा पंचायत सदस्यांचा पत्ता होणार कट

SCROLL FOR NEXT