Ravi Naik  Dainik Gomantak
गोवा

Ravi Naik: कृषिमंत्री नाईकांकडून फोंड्यातील मूर्तिकारांना सुखद भेट; मशिनमुळे काम होणार सोपे

Ponda: फोंड्यात झालेल्या एका छोटेखानी कार्यक्रमात कृषिमंत्री रवी नाईक यांनी फोंड्यातील गणेश मूर्तिकारांना ही मशीन उपलब्ध करून दिली

गोमन्तक डिजिटल टीम

फोंडा: गोमंतकीय पारंपरिक कला टिकून रहावी आणि ती पुढील पिढीपर्यंत सुखरूपपणे पोचवण्यासाठी राज्याचे कृषिमंत्री तथा हस्तकला महामंडळाचे अध्यक्ष रवी नाईक यांनी चार गणेश मूर्तिकारांना माती मळण्यासाठी मशिने प्रदान केली. या मशीनमुळे मूर्तिकारांचे काम सोपे होणार असून माती योग्यप्रकारे तयार होऊन मूर्तीही चांगल्या बनवता येतील, अशा प्रतिक्रिया मूर्तिकारांनी व्यक्त केल्या.

फोंड्यात झालेल्या एका छोटेखानी कार्यक्रमात कृषिमंत्री रवी नाईक यांनी फोंड्यातील गणेश मूर्तिकारांना ही मशीन उपलब्ध करून दिली. यावेळी माजी नगराध्यक्ष तथा विद्यमान नगरसेवक रितेश नाईक, नगरसेवक रूपक देसाई आदी उपस्थित होते.

रवी नाईक यांनी गणेश मूर्तिकारांना शुभेच्छा देताना ही अद्ययावत मशीन गणेश मूर्ती बनवण्यासाठी उपयुक्त ठरणार असून कलाकारांचा पैसा आणि वेळ वाचणार आहे.

नगराध्यक्ष रितेश नाईक यांनी मूर्तिकारांना शुभेच्छा देताना या मशीनमुळे गणेशमूर्ती तयार करण्यासाठी लागणारा वेळही वाचेल, असे सांगितले व शुभेच्छा दिल्या.

फोंड्यातील मूर्तिकारांनी मंत्री रवी नाईक तसेच रितेश नाईक यांचे आभार व्यक्त करताना माती मळण्यास मजूर मिळत नसल्याने अनेक समस्यांना सामोरे जावे लागत होते, असे सांगितले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Politics: 'आरजी'चा फुटबॉल वीरेशच्या हाती; राष्ट्रीय अध्यक्ष या नात्याने तडकाफडकी राज्य समित्या बरखास्त

Sanjil Kudchadkar Kidnapping Case: कोंब-मडगाव परिसरातील घटनेमुळे खळबळ; कौटुंबिक वादातून पॅथॉलॉजी लॅबचालकाचे अपहरण

Maharashtra FDA Action: तुकाराम मुंढेंचा बॉलिवूडला दणका! गुटख्याची जाहिरात करणाऱ्या सेलिब्रिटींवर होणार कारवाई; एफडीए ॲक्शन मोडवर

Himachal Pradesh Landslide: हिमाचलमध्ये भीषण अपघात! चालत्या सुमोवर कोसळली दरड; 13 प्रवाशांचा दुर्दैवी मृत्यू

Israel Crime: इस्त्रायलमध्ये भारतीय नागरिकाची निर्घृण हत्या, रक्ताच्या थारोळ्यात आढळला मृतदेह; 31 वर्षीय संशयिताला अटक

SCROLL FOR NEXT