Ravi Naik: नागरिकांनी बदलत्या काळाशी जुळवून घ्यावे

Ravi Naik: बोरी पुलाला विरोध करू नये
Ravi Naik
Ravi NaikDainik Gomantak
Published on
Updated on

Ravi Naik: जुना बोरी पुल पुष्कळ जुना झाला आहे. मडगाव फोंडा मार्गावरील वाहतूक वाढली आहे. अशा स्थितीत नव्या बोरी पुलाची गरज भासत आहे. रस्त्याच्या रुंदीकरणासाठी जर जागा हवी असेल, तर लोकांनी त्यास विरोध करू नये.

Ravi Naik
Passport Issue: पासपोर्टचा विषय केंद्राकडे; सदानंद तानावडे

बदलत्या काळानुसार नागरिकांनी जुळवून घेणे आवश्यक असल्याचे कृषिमंत्री रवी नाईक यांनी मडगावात पत्रकारांशी संवाद साधताना सांगितले. काही लोक कोळसा वाहतुकीसाठी बोरी पुलाची बांधणी व रस्ता रुंदीकरण चालू असल्याचे बोलतात हे त्यांच्या लक्षात आणून दिल्यावर त्यांनी सांगितले की ही लोकशाही आहे.

लोकांना त्यांच्या मनात जे आहे ते बोलण्याची मुभा आहे, पण कोळसा वाहतुकीसाठी बोरी पूल व रस्त्याचे रुंदीकरण हे लोकांनी आपल्या डोक्यांतून काढून टाकावे. लोकांच्या हितासाठीच सरकार योग्य दिशेने पावले टाकत आहे.

चौफेर विचारानंतरच कृषी धोरणाचा मसुदा

कृषी धोरणाबद्दल रवी नाईक यांनी सांगितले, की राज्याचे कृषी धोरण हे लोकांची मते, सूचना लक्षात घेऊनच आखण्यात येत आहे. राज्याचा चौफेर बाजूंनी विचार करूनच या धोरणाचा मसुदा तयार करण्यात येत आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories


Suhana Naik Arrest news
Goa Traffic Diversion NH66
Borim Bridge
Ponda Election
Goa News in Marathi - Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com