Ravi Naik condolence meet Dainik Gomantak
गोवा

Ravi Naik: 'रवी नाईक' यांचे कार्य त्यांच्या मुलांनी पुढे न्यावे! फोंड्यातील शोकसभेला तुडुंब गर्दी; गोमंत विभूषण पुरस्कार देण्याची मागणी

Ravi Naik condolence meet: रवी नाईक यांचे कार्य त्यांच्या मुलांनी पुढे न्यावे, असे सांगताना आम्ही तुमच्यासोबत आहोत, अशी ग्वाही राजकीय नेत्यांनी फोंड्यातील रवी नाईक यांच्या शोकसभेवेळी दिली.

गोमन्तक डिजिटल टीम

फोंडा: रवी नाईक यांचे राजकीय, सामाजिक कार्य त्यांच्या मुलांनी पुढे न्यावे, असे सांगताना आम्ही तुमच्यासोबत आहोत, अशी ग्वाही राजकीय नेत्यांनी फोंड्यातील रवी नाईक यांच्या शोकसभेवेळी दिली. त्यामुळे अप्रत्यक्षरीत्या रितेश नाईक यांनाच या सर्वांचा राजकीय पाठिंबा असल्याचे दिसून आले. भंडारी आणि बहुजन समाजाबरोबरच राजकीय नेतेही रवींच्या राजकीय वारसाबद्दल गंभीर असल्याचे स्पष्ट झाले.

बेतोडा-फोंड्यातील सनग्रेस गार्डनमध्ये रविवारी तुडुंब भरलेल्या सभागृहात अनेक मान्यवरांनी दिवंगत रवी नाईक यांना श्रद्धांजली अर्पण केली. यावेळी राजकीय, सामाजिक, शैक्षणिक, आरोग्य तसेच कला संस्कृती क्षेत्रातील मान्यवर मंडळी उपस्थित होती. तीन तास चाललेल्या या शोकसभेत कुणीही जागचे हलले नाही, हे विशेष.

या शोकसभेत केंद्रीय मंत्री श्रीपाद नाईक, सहकारमंत्री सुभाष शिरोडकर, वीजमंत्री सुदिन ढवळीकर, भाजप प्रदेशाध्यक्ष दामू नाईक, प्रियोळचे आमदार गोविंद गावडे, आमदार वीरेश बोरकर, आमदार नीलेश काब्राल, माजी मंत्री प्रकाश वेळीप, माजी मंत्री महादेव नाईक, ॲड. नरेंद्र सावईकर, नगराध्यक्ष आनंद नाईक, ॲड. नेल्सन सुवारिस, डॉ. संतोष उसगावकर,

मनोहर भिंगी, ॲड. महेंद्र रायकर, रूद्रेश्‍वर देवस्थानचे अध्यक्ष यशवंत माडकर, महेंद्र खांडेपारकर, मिलिंद म्हाडगुत, सलीम काझी, डॉ. मधु घोडकिरेकर, माजी पोलिस अधिकारी चंद्रकांत साळगावकर, विकास पिसुर्लेकर, गोकुळदास कुडाळकर, ॲड. यतीश नाईक, पत्रकार नरेंद्र तारी आदींनी विचार व्यक्त करून श्रद्धांजली अर्पण केली. सूत्रसंचालन अक्षता भट यांनी तर रितेश नाईक यांनी आभार मानले.

रितेश ओक्साबोक्शी रडले...!

आभारासाठी उभे राहिलेल्या फोंड्याचे माजी नगराध्यक्ष तथा विद्यमान नगरसेवक रितेश नाईक यांना पितृशोक अनावर झाला. आभाराचे भाषण करताना त्याना दुःख अनावर झाल्याने ते ओक्साबोक्शी रडले. यावेळी त्यांच्या मागे उभे असलेले त्यांचे कनिष्ठ बंधू नगरसेवक रॉय नाईक यांनी आपल्या भावाच्या पाठीवर यावेळी हात ठेवून सांत्वन केले.

काँग्रेसला रवींचे विस्मरण

ज्या काँग्रेसला मोठे करण्यासाठी रवी नाईक वावरले, त्या रवींचे विस्मरण काँग्रेसला झाल्याचा आरोप भाजपचे प्रदेशाध्यक्ष दामू नाईक यांनी केला. रवींच्या निधनानंतर भाजपच्या अनेक नेत्यांनी समाज माध्यमांवर आपल्या प्रतिक्रिया व्यक्त केल्या, पण काँग्रेसच्या नेत्यांनी हु का चू केले नाही, असे दामू नाईक म्हणाले.

मरणोत्तर गौरव व्हावा : म्‍हाडगूत

रवी नाईक यांनी बहुजन समाजासाठी केलेले कार्य उल्लेखनीय असे असून त्यांना पद्मश्री किंवा पद्मविभूषण पुरस्कार देताना गोव्याचा प्रतिष्ठेचा गोमंत विभूषण पुरस्कार देऊन त्यांचा मरणोत्तर गौरव व्हावा, अशी मनिषा मिलिंद म्हाडगूत यांनी व्यक्त केली. अन्य वक्त्यांनीही रवी नाईक यांना राष्ट्रीय पुरस्कार देऊन त्यांचा सन्मान करावा, फोंड्यातील प्रकल्पांना रवी नाईक यांचे नाव द्यावे अशीही मागणी केली.

रवी नाईक यांच्यामुळे आम्हाला आमच्या व्यवसायात दिशा सापडली. एक खूप चांगला राजकारणी गोव्याने गमावला असून त्यांचे आणि माझे वैयक्तिक मतभेद असले तरी मनभेद मात्र कधीच झाला नाही; त्यांचे कार्य त्यांच्या मुलांना आता पुढे न्यावे. आम्ही तुमच्या सोबत राहू.
सुदिन ढवळीकर, वीजमंत्री
निराशेच्या खोल गर्तेत सापडलेल्या, ज्यांचा आवाज बंद झाला आहे, अशा सर्वसामान्य माणसाला रवी नाईक यांनी हात दिला. अशा लोकांचा आवाज हा रवी नाईक यांच्यामुळेच बुलंद झाला. रवींचे हे कार्य उल्लेखनीय असे असून त्यांचे राजकीय, सामाजिक कार्य त्यांच्या मुलांनी पुढे न्यावे, आम्ही तुमच्यासोबत असू.
गोविंद गावडे (माजी मंत्री, आमदार प्रियोळ)
रवी नाईक यांनी बहुजन समाजासाठी कार्य करताना सर्वांना सोबत घेऊन जाण्याची किमया साधली. आपल्या राजकीय कारकिर्दीत त्यांनी घेतलेले धोरणात्मक निर्णय खूप महत्त्वाचे ठरले. त्यात कुळ मुंडकार हा विषय त्यांनी हाताळला हे विशेष.
सुभाष शिरोडकर, सहकारमंत्री
बहुजन समाजाने आजही जागे होण्याची आवश्‍यकता आहे. ज्या समाजाच्या उत्कर्षासाठी रवी नाईक यांनी कार्य केले, त्याचे विस्मरण कधीच होणार नाही. रवींचे हे कार्य असेच पुढे न्यायला हवे.
विरेश बोरकर (आमदार, सांतआंद्रे)
रवी नाईक यांनी केलेल्या कार्याला तोड नाही. सर्वसामान्य माणसाला हात देऊन वर काढण्याचे काम करताना त्यांनी धोरणात्मक निर्णय घेतले. त्यांना भाजपच्या सर्व पदाधिकाऱ्यानी आदरांजली अर्पण केली; पण काँग्रेसला ज्या माणसाने उभारी दिली, त्याला मात्र काँग्रेसवाले विसरले.
दामू नाईक (भाजप, प्रदेशाध्यक्ष)
रवी नाईक यांचा वारसा पुढे चालवण्यासाठी त्यांच्या मुलांनी पुढे यावे, आमचा त्‍यांना पूर्ण पाठिंबा आहे. रवी नाईक यांनी सामाजिक, शैक्षणिक आणि राजकीय क्षेत्रात केलेले कार्य अतुलनीय आहे.
श्रीपाद नाईक, केंद्रीय पर्यटन राज्यमंत्री

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Rohini Kalam: क्रीडा विश्वात खळबळ! आंतरराष्ट्रीय खेळाडूनं संपवलं जीवन, घरात लटकलेल्या अवस्थेत आढळला मृतदेह

Shashi Tharoor: आर्यन खानची वेब सीरीज बघून शशी थरूर यांनी केले ट्विट, शाहरुखला म्हणाले, "एक बाप म्हणून तुला... "

टक्सीवाल्यांनी ब्लॅकमेल केलं, त्रास दिला; पर्यटक संतापला म्हणाला, पुढच्यावेळी गोवा की फुकेत? याचा विचार करावा लागेल

Morjim: 'परवाना एका नावाने, रेस्टॉरंट भलत्याच नावाने'! मोरजीतील धक्कादायक प्रकार; पंचायतीची कारणे दाखवा नोटीस

Serendipity Festival: 15 नाट्यप्रयोग, 17 मैफिली, कार्यशाळा! सेरेंडीपिटीचा गाजवाजा सुरू

SCROLL FOR NEXT