Ration card  Dainik Gomantak
गोवा

Ration Card KYC : ‘केवायसी’ साठी रेशनकार्डधारकांची धावपळ

कार्ड रद्दची भीती : डिचोलीत स्वस्त धान्य दुकानांसमोर गर्दी

गोमन्तक डिजिटल टीम

Bicholim : रेशनकार्डधारकांना ‘केवायसी’ बंधनकारक केल्याने ही प्रक्रिया करण्यासाठी डिचोलीत रेशनकार्डधारकांची सध्या धावपळ सुरू असल्याचे दिसून येत आहे. ‘केवायसी’ प्रक्रियेसाठी डिचोली शहरासह विविध ठिकाणच्या स्वस्त धान्य दुकानांतून ग्राहक गर्दी करीत आहेत.

आज (सोमवारी) तर शहरातील मुस्लिमवाडा आणि आतीलपेठ येथील स्वस्त धान्य दुकानांसमोर मोठ्या रांगा लागल्या होत्या. सायंकाळपर्यंत गर्दी होती.

रेशनकार्डवर नावे असलेल्या सर्व ग्राहकांची ‘केवायसी’ करण्याची मोहीम भारत सरकारच्या ग्राहक व्यवहार तसेच अन्न आणि सार्वजनिक वितरण मंत्रालयाने हाती घेतली आहे. तसे आदेशही नागरी पुरवठा खात्याला देण्यात आले आहे. ही मोहीम यशस्वी करावी, असे आवाहनही मंत्रालयाने केले आहे.

रेशनवरील धान्याचा काळाबाजार रोखण्यासाठी ‘केवायसी’ बंधनकारक केल्याचे समजते. या मोहिमेंतर्गत रेशनकार्डवर नाव असलेल्या आणि आधारकार्ड असलेल्या प्रत्येक ग्राहकाच्या बोटांचे नमुने घेण्यात येतात.

ज्येष्ठ नागरिकांचे हाल

‘केवायसी’केली नाही, तर रेशनकार्ड रद्द होणार, अशी भीती अनेकांना आहे. त्यामुळे ‘केवायसी’ प्रक्रियेसाठी नागरिक स्वस्त धान्य दुकानांकडे धाव घेत आहेत. परिणामी गर्दी उसळत आहे. शिवाय नागरिकांना उन्हाचे चटके सोसत ताटकळत उभे रहावे लागते.

तर दुसऱ्याबाजूने अधूनमधून बरसणाऱ्या पावसाचाही उपद्रव सहन करावा लागत आहे. ‘केवायसी’ प्रक्रियेत ज्येष्ठ नागरिकांसाठी विशेष सुविधा केलेली नाही. काही स्वस्त धान्य दुकानदारही बेफिकीरपणे वागत आहेत,अशी ज्येष्ठ नागरिकांची तक्रार आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Village Tourism: "आम्हाला प्रकल्प हवाच!" सुर्ला ग्रामस्थांकडून इको-टुरिझमचे स्वागत; शासनाच्या प्रकल्पाला ग्रामसभेचा पाठिंबा

TCS Layoff: मोठी बातमी! टीसीएस देणार 12,000 जणांना नारळ; सीईओ म्हणाले, 'भविष्यासाठी गरजेच...'

Goa Live News: नागपंचमीसाठी नागोबा सज्ज

Bison In Sawantwadi: एक, दोन नव्हे… थेट 15 गवारेड्यांचा धुमाकूळ! लोकांना फुटला घाम, पाहा थरकाप उडवणारा VIDEO

तुम्हालाही विनाकारण राग येतोय? सावधान! असू शकते रक्तातील साखरेच्या बदलांचे लक्षण, 'या' गोष्टी ठेवा लक्षात

SCROLL FOR NEXT