Rat loins found in bread Dainik Gomantak
गोवा

ब्रेडमध्‍ये आढळल्‍या चक्क उंदराच्‍या लेंड्या; गोवा कॅन संस्थेने नोंदवली तक्रार

सांकवाळच्‍या आरिश बेकरीला ‘एफडीए’ची नोटीस

Kavya Powar

सांकवाळ येथील आरिश बेकरीमध्ये तयार केल्‍या जाणाऱ्या ‘जेसिया सॅन्‍डविच ब्रेड’ या पॅक केलेल्‍या उत्‍पादनात लोटली येथील एका ग्राहकाला चक्‍क उंदराच्‍या लेंड्या आढळल्‍याने खळबळ उडाली आहे.

याप्रकरणी तक्रार केल्‍यानंतर ‘एफडीए’चे दक्षिण गोव्‍याचे अधिकारी रिचर्ड नोरोन्‍हा यांनी त्‍वरित कारवाई करताना या कारखान्‍याला नोटीस बजावून उंदरांवर नियंत्रण आणण्‍यासाठी पेस्‍ट कंट्रोल करण्‍याचा आदेश दिला.

न्याहारी बनवताना प्रकार उघडकीस

शुक्रवारी सकाळी हा किळसवाणा प्रकार उघडकीस आला. शाळेत जाणाऱ्या मुलासाठी ब्रेकफास्‍ट तयार करण्‍यासाठी एका महिलेने हे ब्रेड आणले होते. हे ब्रेड उघडले असता त्‍याच्‍या तीन स्‍लाईसमध्‍ये उंदराच्‍या लेंड्या आढळून आल्‍या.

यासंबंधी त्‍या महिलेने ‘गोवा कॅन’ संस्थेशी संपर्क साधल्‍यानंतर ‘गाेवा कॅन’ने एफडीएच्‍या दक्षिण गोवा कार्यालयात तक्रार केली. ‘एफडीए’च्या अधिकाऱ्यांनी बेकरीत जाऊन तपासणी केली आणि रितसर चौकशी सुरू केली.

बेकरी तीन दिवसांसाठी बंद : कुठ्ठाळी : ब्रेडमध्ये उंदराच्या लेंड्या सापडल्याने ‘एफडीए’ने या बेकरीत पेस्ट कंट्रोल करण्याचा आदेश देऊन कारखाना तीन दिवस बंद ठेवण्याचा आदेश दिल्याचे समजले. याबाबत ‘गोमन्तक’च्या प्रतिनिधीने प्रत्यक्ष बेकरीला भेट देऊन चौकशी केली असता, बेकरीचे मालक आरिष कादर भेटू शकले नाहीत.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Android युजर्ससाठी खूशखबर! WhatsApp चा लूक पूर्णपणे बदलणार; आता तुमच्या फोनमध्येही दिसणार iPhone सारखा स्टायलिश 'फ्लोटिंग बार'!

Goa Postmen: गोव्यातील पोस्टमन 'आऊटसाईडर', 15 वर्षांपासून रोजंदारीवर; कायमस्वरूपी नोकरीसाठी आमदार आमोणकरांना साकडे

Pakistan Minister Video: ''अशी परत जाऊ नकोस''! पाकिस्तानी मंत्र्याचा महिला पत्रकाराची खिल्ली उडवणारा व्हिडिओ व्हायरल; यूजर्सनी घेतलं फैलावर

VIDEO: 'मुंबईचा राजा रोहित शर्मा...' मैदानात चाहत्यांची जोरदार घोषणाबाजी; हिटमॅनची 'ती' खास रिअ‍ॅक्शन कॅमेऱ्यात कैद, व्हिडिओ व्हायरल!

आखाड्यात अनियमित पाणीपुरवठ्याने नागरिक त्रस्त, महिलांची पाण्यासाठी धावपळ; विहिरींचे पाणीही पिण्यायोग्य नसल्यानं नाराजी

SCROLL FOR NEXT