Rashola Goa Boats Dainik Gomantak
गोवा

Rashola: नदीत आणून ठेवल्या 70 ते 80 बेकायदेशीर बोटी! राशोल गावात भीतीचे वातावरण; लवकरच होणार कारवाई

Rashola Illegal Boat Parking: मासेमारी बंदी असल्याने अनेक मासेमारी बोटमालकांनी राशोल येथील नदीत बेकायदेशीरपणे आपल्या बोटी आणून ठेवल्या आहेत. या बोटींमुळे व त्यावरील मजुरांमुळे राशोल गावात भीतीचे वातावरण आहे.

Sameer Panditrao

सासष्टी: सध्या मासेमारी बंदी असल्याने अनेक मासेमारी बोटमालकांनी राशोल येथील नदीत बेकायदेशीरपणे आपल्या बोटी आणून ठेवल्या आहेत. या ७० ते ८० बोटींमुळे व त्यावरील मजुरांमुळे राशोल गावात भीतीचे वातावरण आहे.

शुक्रवारी (ता.१८) गोवा किनारी क्षेत्र व्यवस्थापन प्रशासनाच्या (जीसीझेडएमए) अधिकाऱ्यांनी येथे पाहणी केली व या बोटमालकांवर कारवाई करण्याचे आश्वासन दिले आहे. येथे बोटी ठेवण्यास त्यांच्याकडे कोणतीही परवानगी नाही.

हे सीआरझेड नियमांचे उल्लंघन आहे. स्थानिक पंचायतीकडूनही परवानगी दिलेली नाही. बोटमालकांना नोटीस पाठवली जाईल व चौकशी केली जाईल, असे ‘सीआरझेड’ अधिकाऱ्यांनी आश्वासन दिल्याचे राशोल पंचायतीचे सरपंच जोसेफ वाझ यांनी पत्रकारांना सांगितले.

अनेक समस्यांमुळे हैराण!

आम्ही या बेकायदेशीरपणे ठेवलेल्या बोटींसंदर्भात कॅप्टन ऑफ पोर्ट, सीआरझेड, मत्स्यव्यवसाय खाते, आरोग्य खात्याकडे तक्रारी केल्या. जिथे बोटी ठेवलेल्या आहेत तेथे ओहोटीच्या वेळी माती येऊन एकवटते व ही माती नंतर शेतजमिनीत जाते. आम्ही दर आठ दिवसांनी मजुरांकरवी ही माती काढताे.

या नदीच्या काठावर असलेल्या फुटबॉल मैदानाचीही त्यामुळे वाट लागलेली आहे. मजुरांसाठी येणारे ट्रक मैदानावर ठेवले जातात. शिवाय या मजुरांमुळे डेंग्यू, मलेरिया किंवा इतर रोगांचा प्रदुर्भाव होण्याची शक्यता असल्याने स्थानिक या परिसरात येत नाहीत, असेही सरपंच वाझ यांनी सांगितले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

India President: राष्ट्रपती द्रौपदी मुर्मूंनी 'राफेल'मधून घेतली भरारी, पाकड्यांच्या दाव्याचीही पोलखोल; म्हणाल्या, 'हा माझ्यासाठी अविस्मरणीय अनुभव...' VIDEO

Horoscope: अडीच वर्षांनी शनिदेव सोडणार जागा, 2026 करणार मोठा न्याय! 'या' 3 राशी होणार मालामाल; करिअरमध्ये भरारी निश्चित

Drug Trafficking: गोळीबारात 64 हून अधिक ठार, 81 संशयितांना अटक, 42 रायफल्स जप्त; अंमली पदार्थ तस्करांविरुद्ध पोलिसांची मोठी कारवाई!

Goa Sand Mafia Raj: गोव्यातील गोळीबाराची देशात चर्चा; 'एक्स'वर वाळू माफिया राज हॅशटॅग ट्रेन्डिंग

'तूफ़ान समुंदर के न दरिया के भँवर देख'! 19 तास, 94 किलोमीटर अंतर! प्रतिकूल हवामानात 'आर्यन'ने पार केला गोव्याचा समुद्र

SCROLL FOR NEXT