Vijay Marine shipyard blast Dainik Gomantak
गोवा

Shipyard Blast: 'नुकसान भरपाई द्या, मगच मृतदेह ताब्यात घेऊ'; शिपयार्ड स्फोटातील मृतांच्या कुटुंबीयांचा आक्रोश, Video

Vijay Marine shipyard blast: कंपनीने आपला अहवाल सात दिवसांच्या आत पाठवावा. अन्यथा कायदेशीर कारवाई करू, असा इशारा दिला आहे.

गोमन्तक डिजिटल टीम

मडगाव: रासई येथील  विजय मरीन शिपयार्डमध्ये झालेल्या स्फोटात मरण पावलेल्या तीन कामगारांच्या कुटुंबीयांनी कंपनीच्या हलगर्जीपणामुळेच आम्ही आमच्या आप्तांना मुकलो असल्याचे सांगत नुकसान भरपाई दिल्यानंतरच आम्ही मृतदेह स्वीकारणार, अशी भूमिका घेतली आहे.

कारखाने  आणि बाष्पक खात्याला  या यार्डमध्ये सुरक्षेच्या दृष्टीने कोणतीही उपाययोजना केली नसल्याचे  तपासात आढळून आले आहे. कंपनीने आपला अहवाल सात दिवसांच्या आत पाठवावा. अन्यथा कायदेशीर कारवाई करू, असा इशारा दिला आहे.

दरम्यान, यार्डाचे कामकाज पूर्ण बंद आहे.  या शिपायार्ड मधील सुरक्षा अधिकारी राजू बोरा याला पोलिसांनी अटक केली असून सध्या त्याची चौकशी सुरू आहे.

शुक्रवारी (दि.१७) जहाज बांधणीच्या कामादरम्यान अचानक आग लागून मोठा स्फोट झाला होता, यात जागेवरच दोघांचा दुर्दैवी मृत्यू झाला, तर पाच कामगार गंभीर जखमी झाले होते. जखमींवर जीएमसीमध्ये उपचार सुरू होते. उपचारादरम्यान आणखी एका कामगाराचा मृत्यू झाल्यामुळे आता तीन कामगार मृत्यूमुखी पडले आहेत, तर उर्वरित तीन कामगार अजूनही जीएमसीमध्ये मृत्यूशी झुंज देत आहेत.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Politics: "हे 33 नरकासुर गोवा जाळतील", श्रीकृष्ण विजयोत्सवात विरोधी पक्षांची वज्रमुठ; सत्ताधारी पक्षासमोर मोठे आव्हान?

Quelossim: समुद्र किनाऱ्यावर भरला ‘दिवाळी बाजार’! केळशी पंचायतीचा अभिनव उपक्रम; स्थानिकांसह पर्यटकांनीही घेतला लाभ

Mandrem Accident: भरधाव ट्रकची स्कुटरला धडक, अपघातात महिलेचा मृत्यू; पुराव्यांअभावी चालकाची निर्दोष सुटका

Goa Live News: कारने धडक दिल्याने एका 8 वर्षांच्या मुलीचा मृत्यू

Anjuna Assault: धारदार शस्त्राने डोक्यावर केला वार, 1 महिन्यानंतर पीडित व्हेंटिलेटरवरच; संशयिताचा जामीन फेटाळला

SCROLL FOR NEXT