Goa Shipyard Blast: लोटली स्फोटातील मृतांची संख्या वाढली; शिपयार्ड सील, सुरक्षा अधिकाऱ्याला अटक!

Vijay Marine Lotulim Explosion: दुर्घटनेत होरपळून जखमी झालेल्या आणखी एका कामगाराचा गोवा वैद्यकीय महाविद्यालयात उपचारादरम्यान मृत्यू झाल्याने, अपघातातील मृतांची एकूण संख्या तीनवर पोहोचली
goa shipyard explosion
goa shipyard explosionDainik Gomantak
Published on
Updated on

लोटली: रासई-लोटली येथील विजय मरीन शिपयार्डमध्ये जहाज बांधणीचे काम सुरू असताना झालेल्या भीषण स्फोट आणि आगीच्या घटनेने गंभीर वळण घेतले आहे. या दुर्घटनेत होरपळून जखमी झालेल्या आणखी एका कामगाराचा गोवा वैद्यकीय महाविद्यालय (GMC) रुग्णालयात उपचारादरम्यान मृत्यू झाल्याने, अपघातातील मृतांची एकूण संख्या तीनवर पोहोचलीये आणि दुर्घटनेनंतर परिसरामध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे.

शुक्रवारी (दि.१७) जहाज बांधणीच्या कामादरम्यान अचानक आग लागून मोठा स्फोट झाला होता, यात जागेवरच दोघांचा दुर्दैवी मृत्यू झाला, तर पाच कामगार गंभीर जखमी झाले होते. जखमींवर जीएमसीमध्ये उपचार सुरू होते. उपचारादरम्यान आणखी एका कामगाराचा मृत्यू झाल्यामुळे आता तीन कामगार मृत्यूमुखी पडले आहेत, तर उर्वरित तीन कामगार अजूनही जीएमसीमध्ये मृत्यूशी झुंज देत आहेत.

goa shipyard explosion
Goa Shipyard Blast: लोटली येथे शिपयार्डमध्ये आगीमुळे मोठा स्फोट; 2 कामगारांचा होरपळून मृत्यू; 4 जखमी

दक्षिण गोवा जिल्हाधिकाऱ्यांनी दिले सीलिंगचे आदेश

या गंभीर दुर्घटनेची दखल घेत दक्षिण गोवा जिल्हाधिकाऱ्यांनी तातडीने लोटली येथील विजय मरीन शिपयार्ड सील करण्याचे आदेश दिले आहेत. तसेच, जिल्हाधिकाऱ्यांनी या संपूर्ण घटनेचा सविस्तर अहवाल मागवला आहे.

सुरक्षा अधिकाऱ्याला अटक

दरम्यान, मायणा-कुडतरी पोलिसांनी या स्फोटाप्रकरणी तातडीने कारवाई सुरू केली आहे. विजय मरीन शिपयार्डचा सुरक्षा अधिकारी राजू बोरो याला पोलिसांनी अटक केली आहे. कंपनीतील सुरक्षा मानकांचे उल्लंघन आणि निष्काळजीपणामुळे हा अपघात झाला असण्याची शक्यता आहे. पोलिसांनी स्फोटाच्या कारणांचा आणि जबाबदार व्यक्तींचा कसून तपास सुरू केला आहे. या अपघातात २ व्यक्तींचा मृत्यू तर ४ जणांना दुखापत झाली होती.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com