Goa: दुर्मिळ पुस्तकांचे होणार संवर्धन Dainik Gomantak
गोवा

Goa: दुर्मिळ पुस्तकांचे होणार संवर्धन

विद्यापीठ शिक्षकांच्‍या पथकाकडून पाहणी : सूचविल्‍या 13 शिफारशी

दैनिक गोमन्तक

मडगाव: मडगाव नगरपालिकेतील दुर्मिळ अशा पोर्तुगीजकालीन पुस्तकांचे जतन करण्यासाठी गोवा विद्यापीठ शिक्षकांच्या पथकाने तब्बल 13 शिफारशी केल्या आहेत. मडगाव नगरपालिकेच्या विनंतीवरून विद्यापीठांतील ग्रंथालय विभाग प्रमुख कार्लोस फर्नांडिस यांच्या नेतृत्वाखालील पथकाने गेल्या जुलै महिन्यात मडगावात येऊन या ग्रंथालयाची पाहणी केली होती. येथील ग्रंथालयात पुस्तके दुर्मिळ व महत्त्‍वाची आहेत व म्हणूनच त्यांच्या जतनासाठी दीर्घकालीन पावले उचलावीत, हॅण्डलॅमिनेशन पद्धतीचा अवलंब करावा, तसेच पुस्‍तकांची ऑनलाईन यादी करावी, 5 संगणक उपलब्ध करून हायस्पीड इंटरनेट सुविधा वाचकांसाठी उपलब्ध करावी. त्यासाठी नॅशनल डिजिटल लायब्ररी इंडिया व अन्य राष्ट्रीय पोर्टलची मदत घ्यावी, असेही अहवालात नमूद केले आहे.

अर्थसाहाय्‍य कुठून?

राजा राममोहन रॉय लायब्ररी फाऊंडेशन कोलकाताकडून या सर्व उपक्रमांसाठी आर्थिक मदत घेता येते, असे स्पष्ट करतानाच ग्रंथालय कर्मचाऱ्यांना ग्रंथालय विज्ञान पात्रता आवश्यक असण्यासाठी पावले उचलणे व त्यासाठी त्यांना प्रशिक्षण, परिसंवाद व परिषदांना पाठवून आवश्यक गुणवत्ता मिळविण्याची गरज प्रतिपादली आहे.

काय म्‍हटले अहवालात?

सदर पुस्तके जतन करण्यासाठी त्या पुस्‍तकांवरील धूळ झटकून ती स्वच्छ करणे गरजेचे आहे, असे अहवाल नमूद केले आहे. पालिका ग्रंथालय विभागात अशी सुमारे 1500 पुस्तके आहेत. ग्रंथालयाच्या ज्या खोलीत ती ठेवली आहेत, तेथे काही प्रमाणात ओलसरपणा आहे. त्‍यामुळे तेथील पुस्‍तके खेळती हवा व पुरेसा सूर्यप्रकाश आहे, तेथे हलवण्‍यात यावी. ती रॅकवर न ठेवता काचेचे दरवाजे असलेल्या कपाटात ठेवावीत. सर्व पुस्तके ‘स्कॅन’ करून त्याच्या छापील प्रती वाचकांना द्याव्यात. ई ग्रंथालय सॉफ्टवेअरचा वापर करावा, असेही अहवालात म्‍हटले आहे.ग्रंथालयातील पुस्‍तके संवर्धनासंदर्भात विद्यापीठाच्‍या पथकाच्या सर्व शिफारसी स्वीकारण्यात येतील व अंमलबजावणीसाठी पावले उचलली जातील. पालिकेकडे त्यासाठी पुरेसा निधी असून ग्रंथालय समितीची त्यासाठी मान्यता घेतली जाईल.

आग्‍नेल फर्नांडिस, मडगाव पालिका मुख्‍याधिकारी.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Yemen Saudi Arabia Missile Attack: यमनचा सौदीवर मोठा हल्ला! हवाई अड्डे उद्ध्वस्त, रिफायनरीतून आगीचे लोट; कोट्यवधींचे नुकसान

Talha Saeed Anti India Speech: ''दिल्ली कुणाची होती विसरलात का?" हाफिज सईदच्या लेकानं भारताविरोधात ओकली गरळ; तल्हा सईदच्या रॅलीनं वादंग VIDEO

Goa Ashtami Fair: 'अष्टमी'च्या फेरीने मांडवी किनारा गजबजला! कार्यालये सुटताच गर्दीला उधाण; कपड्यांच्या खरेदीला सर्वाधिक पसंती

India Defence Deal: चीन-पाकिस्तानचा थरकाप उडणार! भारतीय सैन्याची ताकद अनेक पटींनी वाढणार; 1.10 लाख कोटींच्या संरक्षण कराराला मोदी सरकारची मंजुरी

Collared Kingfisher Research: गोव्याच्या किनारी परिसंस्थेसाठी 'कॉलर्ड किंगफिशर'चा अभ्यास! MFG- GBCNचा संयुक्त संशोधन प्रकल्प; पक्ष्याबाबत मिळविणार माहिती

SCROLL FOR NEXT