गोवा प्रदेश काँग्रेस अध्यक्षपदी गिरीश चोडणकर कायम

अखिल भारतीय कॉंग्रेस समितीतर्फे (All India Congress Committee) आज जारी केलेल्या पत्रकानुसार या नियुक्‍त्या करण्यात आलेल्या आहेत. यात कार्याध्यक्षपदी आलेक्स सिक्वेरा, आलेक्स रेजिनाल्ड प्रचार समितीचे अध्यक्ष म्हणून नियुक्ती करण्यात आलीआहे.
गोवा प्रदेश काँग्रेस (Goa Pradesh Congress) अध्यक्षपदी विद्यमान प्रभारी अध्यक्ष गिरीश चोडणकर (Chairman in charge Girish Chodankar) यांना कायम ठेवण्यात आले आहे.
गोवा प्रदेश काँग्रेस (Goa Pradesh Congress) अध्यक्षपदी विद्यमान प्रभारी अध्यक्ष गिरीश चोडणकर (Chairman in charge Girish Chodankar) यांना कायम ठेवण्यात आले आहे.Dainik Gomantak
Published on
Updated on

पणजी: गोवा प्रदेश काँग्रेस (Goa Pradesh Congress) अध्यक्षपदी विद्यमान प्रभारी अध्यक्ष गिरीश चोडणकर (Chairman in charge Girish Chodankar) यांना कायम ठेवण्यात आले आहे. तर कार्याध्यक्षपदी माजी मंत्री आलेक्स सिक्वेरा (Former Minister Alex Sequeira as acting chairman) यांची नियुक्ती करण्यात आली आहे. दिगंबर कामत (Digambar Kamat) हे विधिमंडळ नेतेपदी कायम राहणार असून येत्या निवडणुकीसाठी प्रचार समितीच्या अध्यक्षपदी आमदार आलेक्स रेजिनाल्ड लॉरेन्स (Alex Reginald Lawrence) यांची नियुक्ती करण्यात आलेली आहे.

गोवा प्रदेश काँग्रेस (Goa Pradesh Congress) अध्यक्षपदी विद्यमान प्रभारी अध्यक्ष गिरीश चोडणकर (Chairman in charge Girish Chodankar) यांना कायम ठेवण्यात आले आहे.
Goa: पेडणे मतदार संघात काँग्रेसचा उमेदवार निवडून आणूया : गिरीश चोडणकर

अखिल भारतीय कॉंग्रेस समितीतर्फे आज जारी केलेल्या पत्रकानुसार या नियुक्‍त्या करण्यात आलेल्या आहेत. त्यामुळे गोवा प्रदेश काँग्रेसचे अध्यक्ष गिरीश चोडणकर यांची उचलबांगडी होईल . किंवा त्यांना बदलले जाईल. अशा ज्या काही अफवा होत्या त्यांना आता पूर्णविराम मिळाला असून कॉंग्रेसच्या केंद्रीय नेतृत्वाने चोडणकर यांच्यावर विश्वास व्यक्त केला आहे. त्यामुळे येत्या निवडणुकीतही गोव्यात काँग्रेसचे अध्यक्षपद गिरीश चोडणकर यांच्याकडेच कायम राहणार आहे. हे स्पष्ट झाले आहे.

आज केंद्रीय ज्येष्ठ नेते वेणुगोपाल यांनी जारी केलेल्या पत्रकानुसार गिरीश चोडणकर हे अध्यक्षपदी कायम राहणार असून कार्याध्यक्ष म्हणून माजी मंत्री आलेक्स सिक्वेरा यांची नियुक्ती करण्यात आलेली आहे. विरोधी पक्षनेते दिगंबर कामत हे काँग्रेस पक्षाच्या विधिमंडळ नेतेपदी कायम राहणार आहेत.

निवडणूक समन्वय समितीच्या अध्यक्षपदी आमदार व माजी मुख्यमंत्री लुईझीन फालेरो यांची अध्यक्षपदी तर एम के शेख यांची निमंत्रक पदी नियुक्ती करण्यात आलेली आहे. प्रचार समितीच्या अध्यक्षपदी आमदार आलेक्स रेजिनाल्ड लॉरेन्स त्यांची अध्यक्षपदी व माजी मंत्री संगीता परब यांची सह अध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आलेली आहे.

आर्थिक समितीच्या अध्यक्षपदी दक्षिण गोव्याचे खासदार फ्रान्सिस सार्दिन यांची अध्यक्षपदी तर महिला काँग्रेसच्या माजी अध्यक्ष डॉ. प्रमोद साळगावकर यांची सह अध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आलेली आहे. निवडणुक जाहीरनामा समितीच्या अध्यक्षपदी माजी केंद्रीय मंत्री एडवोकेट रमाकांत खलप अध्यक्षपदी तर नुकतेच काँग्रेसमध्ये दाखल झालेले एल्विस गोम्स यांची सह अध्यक्ष म्हणून नियुक्ती करण्यात आलेले आहे. प्रचार समितीच्या अध्यक्षपदी माजी मंत्री चंद्रकांत चोडणकर हे अध्यक्ष असतील तर मार्था साल्ढाणा या सह अध्यक्ष असणार आहेत.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com