गोवा

Goa: बलात्कार प्रकरणातील संशयितला उत्तरप्रदेशहून अटक

मडगाव (Margao) पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, हा प्रकार 2018 ते 18 जून 2021 या कालावधीत मडगाव पोलीस स्थानकाच्या हद्दीत घडला होता.

दैनिक गोमन्तक

सासष्टी: लग्नाचे आमिष दाखवून अल्पवयीन मुलीवर बलात्कार करुन फरार होणारा संशयित आरोपी रहीम खान याला मुरादाबाद उत्तरप्रदेश (Uttar Pradesh) येथून अटक करण्यात आली तर पीडित युवतीला गर्भपात करण्यास भाग पाडलेल्या पीडितेच्या आईला अमरोहा उत्तरप्रदेश येथून अटक (Arrest) करण्यात आली. मडगाव पोलिसांच्या (Margao Police) पथकाने दोघानांही आज ताब्यात घेतले असून उद्या त्यांना गोव्यात आणण्यात येणार आहे. (Rape suspect and victim's mother arrested from Uttar Pradesh By Goa Police)

मडगाव पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, हा प्रकार 2018 ते 18 जून 2021 या कालावधीत मडगाव पोलीस स्थानकाच्या हद्दीत घडला होता. संशयित रहीम खान व पीडितेच्या आईने अटक होण्याचा भीतीने गोव्यातून पळ काढली होती. गेल्या महिन्यापासून मडगाव पोलिस त्यांचा शोध घेत होते. मडगाव पोलिसांनी शेजारील राज्यातील पोलिसांनाही यासंबंधी सूचित केले होते. संशयित व पीडितेची आई हे दोघेही गावी पळू जाऊ शकतात, असा संशय व्यक्त करुन रविवारी मडगाव पोलिसांचे पथक उत्तरप्रदेशला रवाना झाले. उत्तरप्रदेशाला शोध घेतल्यावर दोघेही फरार संशयित पोलिसांच्या हाती लागले.

संशयित रहीम खान याने अगोदर पीडित मुलीच्या 14 वर्षीय बहिणीकडे लग्न करून तिच्यावर बलात्कार केल्याप्रकरणी कुंकळ्ळी पोलीस स्थानकात तक्रार नोंद करण्यात आली असून संशयिताचे संशयिताचे पीडित मुलीच्या आईकडे संबंध असल्याचे स्पष्ट झाले आहे. संशयिताने पीडित मुलीला आपण तिच्या लहान बहिणीकडे लग्न झाल्यावर नंतर तिच्याकडे लग्न होणार असल्याचे सांगितले होते. पण, नंतर पीडित मुलीने केलेला फोन न घेतल्याने पीडित मुलीने रागाचा भरात रॅटोल घेतले.

रॅटोल घेतल्याने तिच्यावर गोमेकॉ इस्पितळात उपचार सुरू असल्याची माहिती मिळाल्यावर संशयिताने रॅटोल घेऊन स्वतःला संपविण्याचा प्रयत्न केला. रॅटोल घेतल्याने या संशयितावर इस्पितळात उपचार सुरू होते. पण, संशयिताला याप्रकरणी त्याच्यावर तक्रार नोंद केल्याची माहिती मिळाल्यावर तो डिस्चार्ज देताच पीडितेच्या आईला घेऊन गावी फरार झाला. पीडित मुलगी जेव्हा चार महिन्याची गरोदर झाली होती. तेव्हा संशयित व पीडित मुलीच्या आईने मुलीची मारहाण करून तिला गर्भपात करण्यास भाग पाडले. यात तिच्या आई विरुध्दही तक्रार दाखल करण्यात आलेली होती.पोलिसांनी संशयित रहीम खान याच्याविरुद्ध भादंसंच्या 376, 306, 323, 109, बाल कायदा आणि पोक्सो कायद्याखाली गुन्हा नोंद केला आहे. याप्रकरणी पोलिस पुढील तपास करीत आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa News Live: 54 जुन्या कदंब बस भंगारात; नव्या EV बसेस घेणार जागा

Operation Sindoor: 'भारत पाकिस्तानसोबत चीनशीही लढत होता...' ऑपरेशन सिंदूरबाबत भारतीय उप सेनाप्रमुखांचे मोठे वक्तव्य

BJP: इतिहासात पहिल्यांदाच भाजपच्या राष्ट्रीय अध्यक्षपदाची सूत्रे महिलेकडे जाणार? RSS चा ग्रीन सिग्नल; 'ही' तीन नावे चर्चेत

Goa Athletics: गोव्यात रंगणार 'मनोहर पर्रीकर स्मृती ॲथलेटिक्स स्पर्धा'; तारखा, ठिकाण जाणून घ्या..

Pakistani Team: 'पाकिस्तान' टीम खेळणार भारतात! क्रीडा मंत्रालयाकडून ग्रीन सिग्नल; 2 करंडकांमध्ये घेणार भाग

SCROLL FOR NEXT