रणदुंदुभी नाटकातील एक प्रसंग Dainik Gomantak
गोवा

फोंडा कलामंदिर महिला संगीत नाट्यस्पर्धेत ‘रणदुंदुभी’ प्रथम

गोव्यात महिला संगीत नाट्यस्पर्धेत ‘रणदुंदुभी’ प्रथम

दैनिक गोमन्तक

फोंडा: फोंड्यातील (Ponda) राजीव गांधी कला मंदिर आयोजित किशोरीताई हळदणकर स्मृती राज्यस्तरीय महिला नाट्यस्पर्धेत स्वरसत्तरी होंडा येथील ‘रणदुंदुभी’ या नाटकाला प्रथम, अभिनव कला थिएटर मांद्रे ‘संशयकल्लोळ’ या नाटकाला (Drama) द्वितीय तर विजया दुर्गा सांस्कृतिक मंडळ केरी फोंडा यांच्या ‘कट्यार काळजात घुसली’ला तृतीय बक्षीस मिळाले

उत्तेजनार्थ पहिले बक्षीस सांत आंद्रे मंडूर महिला संघाच्या गोरा कुंभार, दुसरे बांदोडा फोंडा (Ponda) येथील ओम कला सृष्टीचे सुवर्णतुला, तिसरे मडकई वूमन्स असोसिएशनचे शिववरदान या नाटकाला देण्यात आले. उत्कृष्ट दिग्दर्शकाचा पुरस्कार (Award) शिवनाथ नाईक (रणदुंदुभी), द्वितीय प्रशांत मांद्रेकर (संशय कल्लोळ), तृतीय कमलाक्ष खेडेकर (कट्यार काळजात घुसली) यांना जाहीर झाला. उतकृष्ट रंगभूषा पहिले एकनाथ नाईक व अमिता नाईक, दुसरे निळकंठ खलप, उत्कृष्ट अभिनय मनिषा परब, द्वितीय कनक कोनाडकर, तृतीय स्वाती सिरसाट यांना मिळाला. उतकृष्ट नेपथ्य प्रथम सौमित्र बखले व शुभम च्यारी, द्वितीय राजदत्त नाईक, उकृष्ट प्रकाश योजना प्रथम विजय रेमजे, द्वितीय रजत कारबोटकर, उत्कृष्ट गायन स्त्री भूमिका पहिली नियती गावस, दुसरी अनुष्का साळगावकर थळी, प्रशस्तीपत्र वंदिता नाईक व चिन्मयी कामत यांना मिळाला.

इतर बक्षिसे अशी.. : उत्कृष्ट संवादिनी वादक या गटात प्रथम पुरस्कार प्रदीप शिलकर, द्वितीय शिवानंद दाभोलकर यांना मिळाला. उत्कृष्ट तबलावादक शशांक उपाध्ये, द्वितीय दयानंद कांदोळकर. उत्कृष्ट पार्श्वसंगीत प्रथम दीपक गावस, द्वितीय गौतम दामले, उतकृष्ट वेशभूषा प्रथम आनंद घाडी, द्वितीय राजलक्ष्मी कोनाडकर. उत्कृष्ट गायन पुरुष भूमिका प्रथम मुग्धा गावकर, द्वितीय उषा च्यारी. प्रशंसापत्र इशा घाटे, श्रीजा फडते व गंधीशा गावडे, उत्कृष्ट बाल कलाकार प्रथम शाल्मली अवंतकर, द्वितीय उर्वी देसाई, प्रशस्तीपत्र आकृती नाईक, प्रशस्तीपत्र अभिनय कल्पना देशपांडे व रोशन शेट तसेच सोनम गोडकर व देवयानी नाईक.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

दोनवेळा घर कोसळले, मदत नाही फक्त आश्वासनं मिळाली; कोलवाळमधील 65 वर्षीय महिलेचा एकाकी संघर्ष

Disneyland In India: भारतात होणार ‘डिस्नेलँड’, 500 एकर परिसरातल्या थीम पार्कला ‘या’ राज्याने दिली मंजुरी

Crocodiles Viral Video: हा कसला वेडेपणा! चक्क मगरीला दुचाकीवर घेऊन प्रवास, व्हिडिओ पाहून म्हणाल, खतरनाक...

Viral Video: भर मैदानात घुसला 'बिनतिकीट' पाहुणा! कुत्र्याच्या एंट्रीनं खेळाडूंमध्ये घबराट, पाहा VIDEO

Goa News Live Updates: पर्ये सुरी हल्ला प्रकरण; आरोपीला ५ दिवसांची पोलिस कोठडी

SCROLL FOR NEXT