Ramesh Tawadkar Dainik Gomantak
गोवा

Goa Politics: '5 वर्षे सभापतिपदावर राहून सभापती पदाची शान वाढवायची होती'! तवडकरांची भावुक प्रतिक्रिया

Ramesh Tawadkar: सभापती रमेश तवडकर हे दिगंबर कामत यांच्‍यासह गुरुवारीच शपथ घेणार, हे आधीच निश्‍चित झाले होते. त्‍यानुसार तवडकर यांनी विधानसभेत जाऊन आपल्‍या पदाचा राजीनामा सादर केला.

Sameer Panditrao

पणजी: पूर्ण पाच वर्षांचा कार्यकाळ सभापतीपदावर राहून या पदाची शान मला आणखी वाढवायची होती. पण, पक्षाच्‍या आदेशामुळे जड मनाने या पदाचा राजीनामा देत आहे, अशी भावुक प्रतिक्रिया रमेश तवडकर यांनी राजीनामा दिल्‍यानंतर पत्रकारांशी बोलताना दिली.

सभापती रमेश तवडकर हे दिगंबर कामत यांच्‍यासह गुरुवारीच शपथ घेणार, हे आधीच निश्‍चित झाले होते. त्‍यानुसार तवडकर यांनी गुरुवारी सकाळी विधानसभेत जाऊन सचिव नम्रता उल्‍मन यांच्‍याकडे आपल्‍या पदाचा राजीनामा सादर केला. त्‍यानंतर पत्रकारांशी बोलताना ते म्‍हणाले, २९ मार्च २०२२ रोजी आपण सभापतिपदाची

शपथ घेतली. तेव्‍हाच या पदाला पूर्णपणे न्‍याय देण्‍याचे आपण ठरवले होते आणि गेल्‍या साडेतीन वर्षांत ते करून दाखवले. या काळात सत्ताधारी-विरोधी आमदारांसह विधानसभेतील सर्व कर्मचारी माझ्‍या कुटुंबाचा भाग बनले होते.

त्‍यांच्‍यासह गोमंतकीय जनतेनेही आपल्‍याला विधानसभा आणि विधानसभेबाहेरही सन्‍मान दिला, याचा आपल्‍याला गर्व वाटतो.

नव्या जबाबदारीला न्‍याय देईन!

पूर्ण पाच वर्षे सभापतिपदावर राहून या पदाची शान आपल्‍याला आणखी वाढवायची होती. पण, पक्षाचे पुढील काळातील भवितव्‍य तसेच आगामी विधानसभा निवडणूक डोळ्यांसमोर ठेवून पक्ष नेतृत्‍वाने आपल्‍याकडे मंत्रिपदाची जबाबदारी सोपवली. त्‍यामुळे जड मनाने या पदाचा राजीनामा द्यावा लागत आहे. पुढील काळात पक्षाने दिलेल्‍या मंत्रिपदाच्‍या जबाबदारीलाही आपण पूर्णपणे न्‍याय देईन, असा ठाम विश्‍‍वासही तवडकर यांनी व्‍यक्त केला.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Drug Trafficking: ड्रग्ज माफियांचा नवा ट्रेंड? QR कोडद्वारे ड्रग्जची जाहिरात? पणजी पोलीस ठाण्याजवळ आढळला बारकोड

India Forex Reserves: भारताची आर्थिक ताकद वाढली, परकीय चलन साठ्याने गाठली नवीन उंची; पाकड्यांची कंगाली पुन्हा आली जगासमोर!

Weekly Lucky Horoscope: ऑगस्टचा शेवटचा आठवडा ठरणार सुवर्णकाळ! 'या' 3 राशींना नोकरी-व्यवसायात मोठं यश मिळणार

Goa Taxi Issue: गोव्यात ओला - उबरला थारा नाहीच; 10 सप्टेंबरला जाहीर होणार टॅक्सीच्या नव्या धोरणाचा मसुदा

AUS vs SA: कांगारुंविरुद्ध लुंगी एन्गिडीचा मोठा धमाका, ऑस्ट्रेलियाविरुद्ध अशी कामगिरी करणारा ठरला जगातील चौथा गोलंदाज!

SCROLL FOR NEXT