Rama Kankonkar Dainik Gomantak
गोवा

Rama Kankonkar: 'चुकीच्या बातम्यांमुळे मानसिक त्रास'! काणकोणकरांच्या पत्नीचा आरोप; खटला कमकुवत करण्याचा प्रयत्न असल्याचा केला दावा

Rama Kankonkar wife statement: पणजीत घेतलेल्या पत्रकार परिषदेत रती बोलत होत्‍या. यावेळी त्‍यांच्‍यासमवेत सामाजिक कार्यकर्ते शंकर पोळजी, तनोज अडवलपालकर व इतर उपस्‍थित होते.

गोमन्तक डिजिटल टीम

पणजी: रामा काणकोणकर हल्ला प्रकरणात तीन वृत्तवाहिन्‍यांनी चुकीचे वृत्त प्रसिद्ध केले आहे. रामा काणकोणकर यांनी गुरुवारी सायंकाळी पोलिसांकडे जबाब नोंदवला त्‍यावेळी मी तेथे प्रत्‍यक्षात उपस्‍थित होते, असा आरोप रामा यांच्‍या पत्‍नी रती काणकोणकर यांनी केला आहे.

या वृत्त वाहिन्‍या रामा काणकोणकरांवरील हल्ल्‍याचा खटला कमकुवत करण्‍याचा प्रयत्‍न करीत आहेत, असेही त्या म्हणाल्या. पणजीत घेतलेल्या पत्रकार परिषदेत रती बोलत होत्‍या. यावेळी त्‍यांच्‍यासमवेत सामाजिक कार्यकर्ते शंकर पोळजी, तनोज अडवलपालकर व इतर उपस्‍थित होते.

त्या म्हणाल्या की, प्रकृती तसेच मानसिक स्‍थिती ठीक नसल्‍यामुळे रामा काणकोणकर यांनी पोलिसांकडे काही दिवस जबाब नोंदवलेला नव्‍हता. तरीही या वृत्तवाहिन्‍यांनी रामा यांची प्रकृती चांगली असूनही ते जबाब देत नसल्‍याचे वृत्त प्रसारित केले.

त्‍यानंतर रामा काणकोणकर यांनी आपल्‍यावर झालेला हल्ला वैयक्तिक कारणातून झाल्‍याचा जबाब दिल्‍याचेही चुकीचे वृत्त या वृत्तवाहिन्‍यांनी दाखवले. यावरूनच या वृत्तवाहिन्‍या हा खटला कमकुवत करण्‍याच्‍या प्रयत्‍नात असल्‍याचे दिसून येते.

रामा काणकोणकर समाजासाठी चांगले काम करीत होते. गोव्‍यातील जमिनी राखून ठेवण्‍यासाठी धडपडत होते. त्‍यावेळी या वृत्तवाहिन्‍यांनी त्‍यांची दखल घेतली नाही. आता त्‍यांच्‍यावर प्राणघातक हल्ला झालेला असतानाही हल्ला झाल्‍याच्‍या पहिल्‍या दिवसापासून या वृत्तवाहिन्‍या चुकीच्‍या बातम्‍या दाखवून आम्‍हाला मानसिक त्रास देत आहेत, असेही त्‍यांनी नमूद केले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

"हे देवा बायगिणकारा!" युनिटी मॉल आणि प्रशासन स्तंभ नकोच; कदंब पठारावरील ग्रामस्थांचे गाऱ्हाणे

Gaur: वाघालासुद्धा हताश करून पळवून लावणारा, गोव्याचा राज्यप्राणी 'गवा'

Goa IIT Project: गोव्यात 'आयआयटी'ची खरोखरच गरज आहे काय?

Anjuna: बनावट कागदपत्रांद्वारे लाखो चौ.मी. लाटली जमीन! हणजूण कोमुनिदाद अध्यक्षांचा आरोप; SIT, ED कडे तक्रारी

Video: पूरामध्ये पूल गेला वाहून, खांद्यावर रिक्षा उचलून गावकऱ्यांनी नदी केली पार; उधमपूरमधील जीवघेणा व्हिडिओ व्हायरल

SCROLL FOR NEXT