Rama Kankonkar: काणकोणकर प्रकरणी नवे ट्विस्ट! हल्ल्यापूर्वी रामा यांचे काढले होते फोटो; तपासाची दिशा बदलण्याची शक्यता

Rama Kankonkar Attack: हे फुटेज सोशल माध्यमांवर व्हायरल झाले असून फोटो काढणारा व्यक्ती कुटुंबासह रेस्टॉरंटमध्ये आला होता. त्याच्यासोबत एक लहान मूलदेखील होते.
Rama Kankonkar
Rama Kankonkar Dainik Gomantak
Published on
Updated on

पणजी : करंझाळे येथे रामा काणकोणकर यांच्यावर झालेल्या हल्ल्याच्या तपासाला आता एक नवे वळण मिळाले आहे. हल्ल्याच्या काही मिनिटांपूर्वी रेस्टॉरंटमध्ये बसलेल्या एका व्यक्तीने काणकोणकर यांचा आपल्या मोबाईलने फोटो काढल्याचे सीसीटीव्ही फुटेज समोर आले आहे.

हे फुटेज सोशल माध्यमांवर व्हायरल झाले असून फोटो काढणारा व्यक्ती कुटुंबासह रेस्टॉरंटमध्ये आला होता. त्याच्यासोबत एक लहान मूलदेखील होते. हे फुटेज सध्या सोशल मीडियावर व्हायरल झाले असून यामुळे या प्रकरणाच्या तपासाची दिशा बदलण्याची शक्यता आहे.

या प्रकरणातील सर्व आठही संशयित आरोपींना मेरशी येथील जेएमएफसी न्यायालयाने १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली आहे. आरोपींना आता १० ऑक्टोबर रोजी पुन्हा न्यायालयात हजर करण्यात येणार आहे. न्यायालयाने नमूद केले की, चौकशीत पोलिसांना नवीन पुरावे मिळाल्यास ते नवीन कायद्यानुसार पुन्हा पोलिस कोठडी मागू शकतात.

पणजी पोलिसांनी सुरुवातीला पाच जणांना अटक केल्यानंतर त्यांना पोलिस कोठडी देण्यात आली होती. नंतर आणखी दोघांना अटक झाली, तर कबुली जबाबानंतर जेनिटो कार्दोज यालाही अटक करण्यात आली होती. त्यानंतर बुधवारी न्यायालयाने दोन दिवसांची पोलिस कोठडी दिल्यानंतर शुक्रवारी पोलिसांनी पुन्हा तीन दिवसांची कोठडी मागितली. मात्र, न्यायालयाने ती नाकारून आरोपींना न्यायालयीन कोठडीत पाठवले.

हल्ल्यानंतर आरोपींनी घटनास्थळावरून मडगाव येथे जाण्यासाठी दोन वाहने वापरल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. त्यानुसार सांताक्रूझ ते नुवेपर्यंत वापरलेले वाहन पोलिसांनी जप्त केले आहे. मात्र, मडगावकडे जाण्यासाठी वापरलेले दुसरे वाहन अद्याप सापडलेले नाही. तसेच हल्ल्यावेळी वापरलेला चाकूदेखील पोलिसांना मिळालेला नाही. या घटनेनंतर संशयितांनी डिलीट केलेले व्हॉट्स ॲप मेसेजेस पुनर्प्राप्त करण्याचे काम सुरू आहे.

Rama Kankonkar
Rama Kankonkar: लोक घराबाहेर पडून 'गोवा बंद' करू लागले तरी आश्चर्य वाटायला नको! रामा काणकोणकर हल्ला प्रकरण

पोलिसांसमोर नवे आव्हान

या नव्या सीसीटीव्ही फुटेजमुळे या प्रकरणाच्या तपासाला वेग येण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. हल्ल्याच्या अगोदर काणकोणकर यांचा फोटो काढणाऱ्या व्यक्तीची ओळख पटविणे आणि त्याचा या हल्ल्याशी संबंध तपासणे, हे आता पोलिसांसमोर मोठे आव्हान उभे ठाकले आहे.

Rama Kankonkar
Rama Kankonkar: सरकार पक्ष अपयशी! काणकोणकर हल्ला प्रकरणातील संशयितांना पोलिस कोठडी नाकारली

११ दिवसांनंतरही रामाचा जबाब नाही

या घटनेला तब्बल ११ दिवस उलटून गेले आहेत. मात्र, रामाची प्रकृती पूर्णत: बरी नसल्याचे कारण सांगत अद्याप पोलिसांनी त्याचा जबाब नोंदविलेला नाही. कारण त्याच्या जबाबावर तपासाच्या अनेक गोष्टी अवलंबून आहेत. एरवी रामा यांना काही लोक गोमेकॉत भेटून आल्याची छायाचित्रे प्रसिद्ध झाली आहेत. मग ते पोलिसांना जबाब का नोंदवत नाहीत, असा प्रश्‍न विचारला जात आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com