Rama Kankonkar Dainik Gomantak
गोवा

Rama Kankonkar: "मी माहिती दिली, आता त्या 2 राजकारण्यांची चौकशी करा!", हल्ला प्रकरणी रामा काणकोणकर यांची पोलिसांकडे थेट मागणी

Rama Kankonkar assault case: 'जात प्रमाणपत्रा'ची पडताळणी करण्यासाठी पोलिसांनी पुढील तपासासाठी मुदतवाढ मागितली आहे

Akshata Chhatre

Rama Kankonkar assault case: करंजाळे येथील सामाजिक कार्यकर्ते रमा काणकोणकर यांच्यावरील हल्ला प्रकरणाच्या तपासात आता 'जात पडताळणी' हा महत्त्वाचा मुद्दा बनला आहे. या प्रकरणात पणजी पोलिसांनी मेरशी येथील सत्र न्यायालयात आरोपपत्र सादर केले आहे, मात्र 'जात प्रमाणपत्रा'ची पडताळणी करण्यासाठी पोलिसांनी पुढील तपासासाठी मुदतवाढ मागितली आहे.

'राजकारण्यांचीही चौकशी करा!'

या सर्व घडामोडींच्या पार्श्वभूमीवर रमा काणकोणकर यांनी स्वतः महत्त्वपूर्ण विधान केले आहे. त्यांनी सांगितले की, त्यांच्यावर अत्याचार प्रतिबंधक कलम तेव्हाच जोडले गेले, जेव्हा त्यांची जात पडताळणी दोन महिन्यांपूर्वी पूर्ण झाली.

काणकोणकर म्हणाले की, "प्रत्येक टप्प्यावर, प्रत्येक प्रश्नावर आणि कागदपत्रांच्या बाबतीत मी पूर्ण सहकार्य केले." आणि असे म्हणत त्यांनी मागणी केली की, "माझ्यावरील हल्ल्यात ज्या दोन राजकारण्यांवर मी संशय व्यक्त केला आहे, त्यांचीही पडताळणी आणि चौकशी तेवढ्याच गांभीर्याने करावी." या मागणीमुळे या प्रकरणाला आता पुन्हा एकदा राजकीय वळण लागण्याची शक्यता असून, पोलीस तपास आणि न्यायालयाच्या पुढील निर्णयाकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

'अत्याचार प्रतिबंधक कलम' जोडण्यासाठी पडताळणी आवश्यक

पोलिसांनी न्यायालयाला सांगितले की, या हल्ल्यात जातिवाचक उल्लेख केल्याचा आरोप असल्याने, 'अनुसूचित जाती/जमाती अत्याचार प्रतिबंधक कायदा' (SC/ST Act) अंतर्गत कलम लागू होणार की नाही, हे निश्चित करण्यासाठी पीडित रमा काणकोणकर यांनी सादर केलेल्या जात प्रमाणपत्राची चाचपणी करणे अत्यंत आवश्यक आहे.दरम्यान, हल्ल्यातील आरोपी जेनिटो कार्दोज याच्या जामीन अर्जावरील सुनावणी २६ नोव्हेंबर रोजी ठेवण्यात आली आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa FDA Raid: पर्यटकांना बनवलं बनावट ग्राहक! कळंगुट-म्हापशात निकृष्ट दर्जाचे काजू, चॉकलेट जप्त; एफडीएची मोठी कारवाई

Papmochani Ekadashi 2026: नशिबाची साथ अन् श्रीहरीचा आशीर्वाद! पापमोचनी एकादशीला उजळणार 'या' 5 राशींचं भाग्य; नोकरीत बढतीसह धनलाभाचा योग

Crime News: क्रूरतेचा कळस! दहावीच्या विद्यार्थिनीवर 5 नराधमांचा सामूहिक अत्याचार; आई लेकीला वाचवण्यासाठी धावली, पण...

मस्करीची झाली कुस्करी! बॉसला एका शब्दासाठी मोजावे लागले 29 लाख, महिला कर्मचाऱ्याला चिडवणं पडलं महागात; काय नेमकं प्रकरण?

Goa Drugs Case: अंमली पदार्थांविरोधात फातोर्डा पोलिसांचा 'ॲक्शन मोड'! 'इतक्या' हजारांच्या गांजा जप्त; 25 वर्षीय तरुणाच्या आवळल्या मुसक्या

SCROLL FOR NEXT