Khapreshwar Temple Goa Issue Dainik Gomantak
गोवा

Rama Kankonkar: रामा काणकोणकर पुन्हा अडचणीत, आणखी एक गुन्हा दाखल; धार्मिक भावना दुखावल्याचा आरोप

Bramheshnand Swami Kundai: संतप्त झालेल्या ब्रह्मेशानंद स्वामी महाराज यांच्या अनुयायांनी कणकोणकर यांच्या अटकेची मागणी केली

Akshata Chhatre

पणजी: ब्रह्मेशानंदआचार्य स्वामी महाराज यांच्याविरोधात समाज माध्यमांवर व्हिडिओ प्रसारित करून धार्मिक भावना दुखावल्याच्या आरोपावरून समाजसेवक रामा कणकोणकर याच्याविरोधात पोलिसांनी गुन्हा नोंदवला आहे. या घटनेमुळे संतप्त झालेल्या ब्रह्मेशानंद स्वामी महाराज यांच्या अनुयायांनी बुधवारी (दि. १२ मार्च) रात्री उशिरा पणजी पोलीस ठाण्याबाहेर जमा होऊन कणकोणकर यांच्या अटकेची मागणी केली.

कणकोणकरच्या विधानांमुळे समाजात धार्मिक तेढ?

अनुयायांनी कणकोणकर याच्याविरोधात तक्रार दाखल केली असून, त्यांनी काणकोणकर याच्यावर आक्षेपार्ह विधाने केल्याचा आरोप केला आहे. तक्रारीनुसार, कणकोणकर याने पर्वरीतील देव खापरेश्वर मंदिराच्या मुद्द्यावरून स्वामींना या विनाकारण वादात ओढले, ज्यामुळे धार्मिक भावना दुखावल्या गेल्यात. ब्रह्मेशानंद स्वामी महाराजांच्या अनुयायांनी पोलिसांना निवेदन दिले असून, कणकोणकर याच्यावर तातडीने कठोर कारवाई करण्याची मागणी केली आहे. त्यांच्या मते, कणकोणकरच्या विधानांमुळे समाजात धार्मिक तेढ निर्माण होऊ शकतो.

काय म्हणतोय कणकोणकर?

काह दिवसांपूर्वी ब्रह्मेशानंदआचार्य यांनी पर्वरीतील खापरेश्वर मंदिरवादावर एक मोठं वक्तव्य केलं होतं. खापरेश्वर मंदिराच्या जागेबद्दल प्रश्न विचारताच त्यांनी या जागेची सीमा देखील वाढवली जाऊ शकते असं विधान केल्याचं रामा कणकोणकर याने सांगितलं. या विधानावर आक्रमक भूमिका घेत रामा कणकोणकर याने थेट ब्रह्मेशानंदआचार्य यांना आरोपीच्या पिंजऱ्यात उभं केलं.

राखणदाराबद्दल किंवा राखणदाराच्या जागेबद्दल बोलणारे तुम्ही कोण? असा प्रश्न त्याने उपस्थित केला. ब्रह्मेशानंदआचार्य हे धर्माचे गुरु कमी आणि राजकारणी अधिक असल्याचं देखील तो म्हणालाय. ब्रह्मेशानंदआचार्य स्वामींना त्यांनी खोटं आणि फसवं म्हटलंय आणि अशी लोकं धर्मगुरू असूच शकत नाही असं विधान केलं आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Colvale Jail: ड्रग्ज, दरोड्यांचे कट अन् कारागृहातील मृत्यू; कोलवाळच्या भिंतीआड दडलंय काय? धक्कादायक वास्तवानं खळबळ

Goa Congress: वरवरची मलमपट्टी नको, मुळावर उपचार हवा! खर्गे आले, एकीचा संदेश दिला; पण काँग्रेसची अंतर्गत गटबाजी संपणार कधी?

Goa Politics: 'भाजपला हरवण्याआधी काँग्रेसने स्वतः एकवटावे', खर्गेंच्या आवाहनावर सरदेसाईंचा पलटवार; पक्षांतराची भीती

Goa Assembly Election 2027:'एकत्र लढू, एकत्र जिंकू'; गोवा विधानसभा निवडणुकीआधी खर्गेंचा काँग्रेस नेत्यांना विजयमंत्र

World Record: 1383 ध्वजांनी रचला इतिहास, न्यू जर्सीत गिनीज वर्ल्ड रेकॉर्ड! FIA कडून जागतिक विक्रमाची नोंद

SCROLL FOR NEXT