Khapreshwar Temple: नको सरकारी मदत! लोकवर्गणीतून उभारणार श्री देव खाप्रेश्वराचे देवस्थान, 9 मे रोजी नव्या मूर्तीची प्रतिष्ठापना

Shri Dev Khapreshwar Temple: वडाकडे परिसरातच श्री देव खाप्रेश्वराचे देवस्थान लोकवर्गणीतून उभारण्याचे ठरवण्यात आले आहे.
Khapreshwar Temple
Khapreshwar TempleDainik Gomantak
Published on
Updated on

पणजी: वडाकडे परिसरातच श्री देव खाप्रेश्वराचे देवस्थान लोकवर्गणीतून उभारण्याचे ठरवण्यात आले आहे. सरकारने घुमटी उभारण्यासाठी देऊ केलेल्या मदतीची गरज नाही, असेही आता सांगण्यात येऊ लागले आहे. या देवस्थानात नव्या मूर्तीची ९ मे रोजी प्रतिष्ठापना करण्यात येणार आहे.

देवस्थान समितीचे अध्यक्ष कार्तिक कुडणेकर यांच्या म्हणण्यानुसार मुळगाव येथील श्री देव वेताळ मंदिरात घेतलेल्या ८ रोजी घेतलेल्या प्रसादानुसार खाप्रेश्वराचे स्थान त्या परिसरातच आहे. दहा पावले मागे पुढे होऊ शकतात. इतर देवतांप्रमाणे स्थळ देवतांचे स्थलांतर करता येत नाही. ब्राह्मणदेव त्याच ठिकाणी आहे असे प्रसादात सांगितले आहे.

काल आम्ही बैठक घेतली कारण मूर्ती प्रतिष्ठापनेविषयी प्रसाद घ्यायचा होता. एप्रिल व मे मधील दोन मुहूर्त होते. त्यातील योग्य कोणता हे प्रसाद लावून विचारायचे ठरवले.

Khapreshwar Temple
Goa Corruption Case: "मडकईकरांना चौकशीसाठी बोलावून शहानिशा करा", तक्रारदारांची ACBकडे मागणी

मुळगाव श्री देव वेताळाचा प्रसाद घेतला. ९ मे रोजी मूर्ती प्रतिष्ठापना करण्यास प्रसाद झाला आहे. गावची समिती, गावचे भाविक हे एकत्र येऊन त्याच जागेवर देवस्थान उभे केले जाईल. गावाला सोबत घेऊन हे काम केले जाईल, त्यासाठी निधी जमा केला जाईल. सरकारची मदत घेऊ नये असेही ठरवण्यात आले कारण हे कार्य करण्यासाठी गाव समर्थ आहे.

Khapreshwar Temple
Goa Education: नव्या शैक्षणिक वर्षासाठी 2 दोन कायद्यांमध्‍ये होणार बदल, सरकार लवकरच वटहुकूम जारी करणार

राखणदेव त्याच ठिकाणी हवा!

राखणदेव त्याच ठिकाणी हवा, क्षेत्रपाल देवाचे स्थलांतर करता येत नाही, अशी त्यांची भावना आहे. यातून कोणी राजकारण करू नये, असेही गावाचे म्हणणे आहे. असे सांगून कार्तिक कुडणेकर म्हणाले,की नवी मूर्ती करण्यासाठी मूर्तिकारासोबत बोलणी झाली आहेत.

रातोरात देवस्थान हटवण्यासाठी घाई का केली, हे अनाकलनीय आहे. देवस्थान हटवल्याने अनेक भक्त दुखावले गेले आहेत. समितीने देवस्थान उभारण्याचे ठरवले आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com