Rama Kankonkar Dainik Gomantak
गोवा

'मिंगेल आरावजो माझा पाठलाग करत होता', हल्ल्यानंतर 15 व्या दिवशी रामा काणकोणकर बोलले, पोलिसांनी नोंदवला जबाब

Rama Kankonkar Assault Case: रामा काणकोणकर हल्ला प्रकरणी पोलिसांनी आत्तापर्यंत आठ संशयितांना अटक केली असून सर्व संशयित सध्या कोलवाळ कारागृहात न्यायालयीन कोठडीत आहेत.

गोमंतक ऑनलाईन टीम

पणजी: करंझाळे येथे झालेल्या प्राणघातक हल्ल्यानंतर उपचार घेत असलेल्या रामा काणकोणकर यांचा जबाब पोलिसांनी काल रात्री (१५ व्या दिवशी) नोंदविला. आपल्या जबानीत काणकोणकर यांनी "मिंगेल आरावजो माझा पाठलाग करत होता. तसेच मारहाण करताना हल्लेखोरांनी मला 'गावडा' व 'राखणदार' असे संबोधले,' असे त्यांनी सांगितल्याची माहिती मिळाली आहे.

वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांनी माहिती देताना सांगितले की, काणकोणकर यांच्या जबानीत नोंदविलेल्या तथ्यांची सध्या पडताळणी सुरू असून तपास प्रलंबित असल्याने त्यातील अधिक तपशील सध्या उघड करणे उचित नाही.

या प्रकरणी पोलिसांनी आत्तापर्यंत आठ संशयितांना अटक केली असून सर्व संशयित सध्या कोलवाळ कारागृहात न्यायालयीन कोठडीत आहेत. त्यांना १० ऑक्टोबर रोजी सत्र न्यायालयात हजर करण्यात येणार आहे

रामाच्या उपचारासाठी विशेष समिती

राणे आरोग्यमंत्री विश्वजीत राणे यांनी आज गोवा वैद्यकीय महाविद्यालयात विभाग प्रमुख, अधिष्ठाता आणि अधीक्षकांची बैठक घेऊन काणकोणकर यांच्या उपचारांची माहिती घेतली. त्यांनी रुग्णालयात जाऊन रामा काणकोणकर यांचीही भेट घेतली.

रामाच्या उपचारासाठी विशेष समिती स्थापन केली असून सरकार त्यांना सर्वोत्तम वैद्यकीय सेवा मिळावी यासाठी कटिबद्ध आहे, असे राणे यांनी सांगितले

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Railway Diwali Bonus 2026: मोदी सरकारची रेल्वे कर्मचाऱ्यांना दिवाळी भेट, 10 लाखांहून अधिक कर्मचाऱ्यांना मिळणार बंपर बोनस; अखेर कॅबिनेटचा शिक्कामोर्तब

नाशिकच्या पाण्यत आढळले कर्करोगास कारणीभूत ठरणारे जीवघेणे रसायन; पर्यावरण संस्थेच्या अहवालात मोठा खुलासा

Farmers Drought Financial Relief: पावसाने हुलकावणी दिली पण सरकार धावून आले! दिवाळीपूर्वीच शेतकऱ्यांना 'इतक्या' हजारांची मदत जाहीर; वाचा ताजी अपडेट

Unlucky Zodiac Signs: पैशांची घ्या काळजी! शुक्र अस्तामुळे 'या' 4 राशींना बसू शकतो मोठा आर्थिक फटका; पुढील 14 दिवस अत्यंत कसोटीचे

Goa Under 23 Cricket: गोव्याच्या युवा क्रिकेटपटूंचा बडोद्यावर दबदबा! 158 धावांची आघाडी, मोठ्या आघाडीची संधी

SCROLL FOR NEXT