Khari Kujbuj Political Satire Dainik Gomantak
गोवा

Goa Politics: खरी कुजबुज; शामच्‍या मदतीला धावला राम

Khari Kujbuj Political Satire: गोव्‍यात सध्‍या रामराज्‍य चालू आहे, अशा प्रकारची जाहिरात भाजपचे कार्यकर्ते करत असले तरी गोव्‍यातील वाढलेली गुन्‍हेगारी पहाता गोव्‍यात रावणराज्‍य चालू तर नसावे ना?

Sameer Panditrao

शामच्‍या मदतीला धावला राम!

दवर्ली-दिकरपाल पंचायतीत राम-शामची जोडी पूर्वी भलतीच चर्चेत असायची. मध्‍यंतरी या राम आणि शामचे एकमेकांशी काहीतरी वाजले आणि ही जोडी फुटली. पण जोडी फुटल्‍याने दोघांचेही नुकसान होते, हे लक्षात आल्‍यावर ही जोडी आता एकत्र येऊन सक्रिय झाली आहे. काल दवर्ली-दिकरपाल पंचायत क्षेत्रात एक बेकायदेशीर टाईल्‍स कटींगचा अड्डा चालतो, यासाठी पंचायतीतर्फे इन्‍स्‍पेक्‍शन ठेवण्‍यात आले होते. हे इन्‍स्‍पेक्‍शन करण्‍यासाठी रामने पुढाकार घेतला होता. यामागचे कारण असे की, या अड्डा चालकाने यापूर्वी शामवर म्‍हणे दगडफेक केली होती. त्‍याचा बदला घेण्‍यासाठी काल ही कारवाई करण्‍यात आली. आता हा राम आणि शाम कोण? हा तुम्‍हाला प्रश्‍न पडलेला असेलच! याचे उत्तर जाणून घेण्‍यासाठी तुम्हांला दवर्लीलाच जावे लागेल. ∙∙∙

‘रामा’लाही येथे सोडत नाहीत!

गोव्‍यात सध्‍या रामराज्‍य चालू आहे, अशा प्रकारची जाहिरात भाजपचे कार्यकर्ते करत असले तरी गोव्‍यातील वाढलेली गुन्‍हेगारी पहाता गोव्‍यात रावणराज्‍य चालू तर नसावे ना? असे कुणाला वाटावे. काल रामा काणकोणकर या सामाजिक कार्यकर्त्यावर जीवघेणा हल्‍ला झाल्‍यानंतर समाज माध्‍यमावर भाजपच्‍या या राज्‍यात आता ‘रामा’लाही सोडले जात नाही, अशा प्रकारचे पोस्‍ट येऊ लागले आहेत. ज्‍या राज्‍यात रामाला अभय नाही, तिथे बाकीच्‍याचे काय? कालपासून समाज माध्‍यमांवर हाच प्रश्‍न विचारला जात आहे. ∙∙∙

रोहन गावस देसाईंची सरशी

बीबीसीआयच्या मतदार यादीत स्थान मिळवल्याने रोहन गावस देसाई यांना जीसीए हातातून निसटल्याचा दुःख विसरण्यासाठी कारण मिळाले आहे. जीसीएशी सलग्न क्लबांवर काही जणांची पकड आहे. त्यांनी ही बाब खुद्द मुख्यमंत्र्यांच्या लक्षात आणून दिली होती. गावस देसाई यांनी बीसीसीआयवर जावे, त्या बदल्यात जीसीएच्या निवडणुकीत त्यांनी आपले पॅनल उतरवू नये, अशी अट त्यांनी पुढे केली होती. ती गावस देसाई यांनी मान्य केली नाही. अखेर निवडणुकीत निकाल सपशेलपणे त्यांच्या विरोधात गेला. त्यानंतर बीसीसीआयच्या मतदार यादीत त्यांचे नाव समाविष्ट करण्यास आक्षेप घेण्यात आला. आता जीसीए हातातून निसटली तरी बीबीसीआयवरील पद तरी हाती राहिल एवढाच दिलासा त्यांना मिळाला आहे. ∙∙∙

रवी पात्रांव सक्रिय!

रवी पात्रावने पंचाहत्तरी केव्हाच ओलांडली आहे, मात्र राजकारणातील जोश काही कमी झालेला नाही. काल पात्रावांनी वाढदिन दणक्यात साजरा झाला. काय तोबा गर्दी उडाली. प्रचंड गर्दीत पात्रावचा वाढदिवस साजरा झाला ही गर्दी पाहून रवी विरोधकांचे धाबेच दणाणले असतील. कारण आगामी निवडणुकीत नवी समीकरणे निर्माण होणार असली तरी रवी पात्रांवही रिंगणात राहाण्याची शक्यता अधिक आहे. त्यामुळे विरोधक धास्तावलेत ∙∙∙

निषेधाचा काळा पेहराव!

आमदार विजय सरदेसाई यांनी निषेध आंदोलनाची हाक दिल्यानंतर पणजीत सर्व पक्षीय नेते सहभागी झाले. त्यामुळे हे आंदोलन केवळ एका पक्षाचे राहिले नाही, उलट सर्व विरोधी पक्षाचे नेते एकत्रित दिसले. यात सर्वात महत्त्वाची बाब म्हणजे विरोधकांकडून विधानसभेचे कामकाज असो की आंदोलन असो काळा पेहराव घालून निषेध करण्याचा नवा पायंडा पडला आहे. त्यानुसार आजच्या आंदोलनात आमदार विजय सरदेसाई, विरोधी पक्षनेते युरी आलेमाव, आमदार वीरेश बोरकर, आमदार व्हेन्झी व्हिएगस, काँग्रेस प्रदेशाध्यक्ष अमित पाटकर, गोवा फॉरवर्डचे दुर्गादास कामत यांच्यासह आपच्या काही नेत्यांनी काळ्या रंगाचा पेहराव केला होता. त्यामुळे आंदोलनात काळ्या रंगाचा पेहराव करणारे ठळकपणे लक्ष वेधून घेत होते. ∙∙∙

भाजपकडून आक्रमकता

रामा काणकोणकर मारहाण प्रकरणाचा सरकारला जाब विचारण्यासाठी शुक्रवारी पणजीत आंदोलन झाले. त्याच्याशी संबंधित व्हिडिओ जारी करत सत्ताधारी भाजपने आंदोलकांना कोंडीत पकडण्याचा प्रयत्न सुरु केला आहे. आधी भाजपची सदस्य संख्या सांगत घाबरवण्याचा प्रयत्न केल्यावर त्यांनी आंदोलकांनी सर्वसामान्यांना वेठीस धरले, पोलिसांवर हात उगारला असे आरोप पुराव्यानिशी केले आहेत. सरकारविरोधात आणलेला मोर्चा भाजप कार्यालयावरही नेण्यात आला होता. त्यामुळे की काय भाजपच्या समाज माध्यम विभागाने आंदोलनाविरोधात मोहीम उघडल्याचे दिसले. ∙∙∙

...विरोधकांची एकजूट!

शुक्रवारच्या आंदोलनामुळे विरोधी पक्षांची खरी ताकद आणि एकजूट काहीशी दिसली पण आता ती सोमवारी दिसून येईल का? असा प्रश्न अनेकांना पडला आहे. आत्तापर्यंत विरोधी पक्षांनी केवळ सरकारच्या धोरणांवर टीका केली आहे, पण आता त्यांच्याकडे प्रत्यक्ष कृती करण्याची संधी आहे. जर या आंदोलनात सर्व विरोधी पक्ष खऱ्या अर्थाने एकवटले आणि ते यशस्वी झाले, तर तो सरकारसाठी एक मोठा धक्का असेल. यातून केवळ विरोधकांची ताकदच नाही, तर त्यांची भविष्यातील रणनीतीही स्पष्ट होईल. याउलट, जर हे आंदोलन कमकुवत ठरले, तर विरोधकांचे नेतृत्व आणि त्यांच्यातील एकीवर प्रश्नचिन्ह निर्माण होईल. त्यामुळे, सोमवारचा दिवस राज्याच्या राजकारणासाठी खूपच महत्त्वाचा ठरणार आहे. ∙∙∙

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Hamlet: इटलीत पोचला गोमंतकीय अभिनेता, शेक्सपियरचे 'हॅम्लेट' साकारतोय केतन; थिएटर हाऊसतर्फे प्रयोग केला सादर

Colva: कोलव्यातील दुकानदारांचे तात्पुरते स्थलांतर! पर्यटनमंत्री खंवटेंचे आश्वासन; पहिल्या टप्प्यात विविध सुविधांचा समावेश

First AI Minister: जगातील पहिली एआय मंत्री, संसदेत केले भाषण; भ्रष्टाचाराला चाप बसविण्यासाठी अल्बानियात टेक प्रयोग Watch Video

11 गायी ठार; काणकोण - कारवार महामार्गावर पहाटेच्या सुमारास झाला भीषण अपघात

भोपाळ ते गोवा जाणाऱ्या बसमध्ये सुरु होता अजब प्रकार; RTO अधिकाऱ्यांनी प्रवासी बनवून केला भांडाफोड

SCROLL FOR NEXT