म्हापसा: समाज कार्यकर्ते रामा काणकोणकरांवर झालेला हल्ला हा दुर्दैवी व निषेधार्ह आहे. या हल्ल्यामागे नेमका सूत्रधार कोण आहे, त्याचा शोध घ्यावा व त्याला बेड्या ठोकून त्याला दुचाकीला बांधून फरफटत पोलिस स्थानकात आणावे. असे झाल्यास राज्यातील कायदा-सुव्यवस्था पूर्ववत होईल, असे धाडसी विधान माजी मंत्री दिलीप परुळेकर यांनी एका सोशल मीडिया चॅनेलला दिलेल्या मुलाखतीवेळी केले.
परुळेकर म्हणाले की, स्व. मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर यांच्या मुख्यमंत्रीच्या कार्यकाळात अशाप्रकारचे हल्ले घडत नव्हते, किंबहुना ते घडू द्यायचे नाहीत. मुळात मनोहर पर्रीकरांचा प्रशासनावर वचक होता. जर कोणीही प्राणघातक हल्ले किंवा कोणाला मारहाण करीत असल्यास संशयितांच्या पायावर गोळ्या झाडून त्याला कामयचे जायबंदी केले पाहिजे.
पोलिसांना हा अधिकार नाही का? काणकोणकरवरील हल्ल्यामागे कोणीही असो, तपास यंत्रणांनी हाता-पायाला बेड्या ठोकून त्याला दुचाकीने फरफटत पोलिस स्थानकापर्यंत आणावे.
सरकारच्या विरोधात जो कोण बोलतो, त्यांना टार्गेट करण्यापेक्षा या सरकारने महागाई कमी करण्यासाठी आणि बेरोजगार युवकांना रोजगार उपलब्ध करून देण्यासाठी प्रयत्न करावेत, अशी मागणी करून काणकोणकर यांच्यावर जो हल्ला झाला त्या हल्ल्यामागील मास्टरमाईंड कोण हे पुढे येईपर्यंत लोकांचे निषेध मोर्चे थांबणार नाहीत, असा इशारा देण्यात आला.
काणकोणकर यांच्यावरील हल्ल्याचा निषेध करण्यासाठी आज मशाल मोर्चा काढण्यात आला होता. या मोर्चात ‘आप’चे नेते मोठ्या प्रमाणावर सामील झाले होते. यावेळी बोलताना आमदार वेंन्झी व्हिएगस यांनी या हल्ल्यातील खरा सूत्रधार अजून मोकळाच आहे. सरकारने लोकांची सहनशक्तीची परीक्षा घेऊ नये. अन्यथा आंदोलनाची व्याप्ती वाढेल, असा इशारा दिला.
रामा काणकोणकर यांना जीवघेणी मारहाण झाल्यानंतर गोवा फॉरवर्ड पक्ष आक्रमक झाला आहे. काल सर्वपक्षीय बैठकीत ‘रामा काणकोणकर यांना न्याय न मिळाल्यास मडगाव-कारवार हमरस्ता रोखून धरू’, असा इशारा दिला आहे. फॉरवर्डच्या नेत्यांनी भाजपातील एसटी नेत्यांवरही टीका केली आहे.
गोवा फॉरवर्डच्या वतीने रामा काणकोणकर यांच्यावर झालेल्या हल्ल्याचा पोलिसांकडून योग्य पद्धतीने तपास झाला पाहिजे,अशी मागणीही करण्यात आली. काणकोणकर यांना कोणत्याही स्थितीत न्याय मिळायलाच हवा, असेही या सर्वपक्षीय बैठकीत सांगण्यात आले.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.