Ravichandran Ashwin BBL: रविचंद्रन अश्विन 'बिग बॅश लीग'मध्ये खेळणार, 'या' संघाकडून मैदानात उतरणार; 'अशी' कामगिरी करणारा तो पहिलाच भारतीय

Ashwin Sydney Thunder: माजी भारतीय क्रिकेटपटू रविचंद्रन अश्विनने बिग बॅश लीगमध्ये सिडनी थंडर संघाशी करार केला आहे.
Ravichandran Ashwin In BBL
Ravichandran Ashwin In BBLDainik Gomantak
Published on
Updated on

रविचंद्रन अश्विन हा जगातील महान फिरकीपटूंमध्ये गणला जातो. भारतासाठी आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये आपली छाप उमटवल्यानंतर आणि अलीकडेच आंतरराष्ट्रीय तसेच आयपीएल क्रिकेटमधून निवृत्ती जाहीर केल्यानंतर आता तो जगभरातील टी२० लीगमध्ये आपली जादू दाखवणार आहे. याच पार्श्वभूमीवर, ऑस्ट्रेलियातील प्रतिष्ठित बिग बॅश लीगच्या (BBL) आगामी हंगामासाठी त्याने सिडनी थंडर संघाशी करार केला असून, या स्पर्धेत सहभागी होणारा पहिला भारतीय क्रिकेटपटू ठरला आहे.

अश्विन १४ डिसेंबर ते २५ जानेवारी दरम्यान होणाऱ्या बीबीएल हंगामाच्या दुसऱ्या सहामाहीसाठी उपलब्ध असेल. या करारानंतर अश्विन म्हणाला, “सिडनी थंडरशी माझी खूप चांगली चर्चा झाली असून संघातील माझ्या भूमिकेबाबत ते पूर्णपणे सहमत आहेत. मला डेव्हिड वॉर्नरचा खेळ खूप आवडतो. या संघासाठी कामगिरी करण्याची मी आतुरतेने वाट पाहतो आहे.”

सिडनी थंडरचे जनरल मॅनेजर ट्रेंट कोपलँड यांनी या कराराला बीबीएलच्या इतिहासातील “सर्वात मोठा करार” म्हटले. कोपलँड यांनी सांगितले, “अश्विन हा खेळाचा आयकॉन आहे. त्याचा अनुभव आणि स्पर्धात्मक वृत्ती संघासाठी मोठी ताकद ठरेल.”

Ravichandran Ashwin In BBL
Goa Revenue: महसुली शिलकीत अव्वल राज्‍यांत गोव्‍याचाही समावेश! 2399 कोटींची रक्कम; ‘कॅग’ 23 अहवालातून माहिती समोर

याआधी बीबीएलमध्ये भारतीय मूळ असलेले उन्मुक्त चंद आणि निखिल चौधरी यांनी खेळले होते, पण ते परदेशात स्थलांतरित झाल्यानंतरच. मात्र, भारतातून थेट खेळण्यासाठी सामील होणारा अश्विन हा पहिला खेळाडू आहे. बीसीसीआयच्या नियमांनुसार राष्ट्रीय संघाशी किंवा आयपीएलशी संबंधित खेळाडूंना परदेशी लीगमध्ये खेळण्याची परवानगी नसते. परंतु आता अश्विन निवृत्त झाल्याने त्याला जागतिक लीगमध्ये खेळण्याची मुभा मिळाली आहे.

Ravichandran Ashwin In BBL
Goa AAP: काँग्रेसने पाठीत खंजीर खुपसला, दिल्लीत धोका दिला, यापुढे सहकार्य नाही; गोव्यातील आप आमदारांनी स्पष्ट केली भूमिका

अश्विनने आपल्या तेजस्वी कारकिर्दीत भारतीय संघासाठी तिन्ही फॉरमॅटमध्ये उल्लेखनीय कामगिरी केली आहे.

  • कसोटी क्रिकेट : १०६ सामने, ५३७ विकेट्स

  • एकदिवसीय सामने : ११६ सामने, १५६ विकेट्स

  • टी२० आंतरराष्ट्रीय सामने : ७२ विकेट्स

५०० हून अधिक कसोटी विकेट्स मिळवणाऱ्या अश्विनने आपल्या कौशल्याने जगभरात लौकिक मिळवला आहे. आता बीबीएलमध्ये त्याची फिरकीची जादू पाहायला क्रिकेटप्रेमी उत्सुक आहेत.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com