Rama Kankonkar: 'जेनिटो घटनास्थळी नव्हताच'! काणकोणकर हल्लाप्रकरणी वकिलांचा दावा; पोलिसांच्या घाईवर प्रश्नचिन्ह

Zenito Kardozo: जेनिटोला अटक केल्याचे कारण देताना पोलिसांनी सांगितले कि, जेनिटोला प्रथम चौकशीसाठी आणले होते. मात्र, त्याने चौकशीदरम्यान सहकार्य केले नसल्याने त्याला अटक करण्यात आली.
Rama Kankonkar Assault
Rama Kankonkar AssaultDainik Gomantak
Published on
Updated on

पणजी: रामा काणकोणकर हल्लाप्रकरणी आज न्यायालयात झालेल्या युक्तिवादाच्या पार्श्वभूमीवर न्यायाधीशांनी पोलिसांच्या घाई गडबडीबाबत प्रश्न उपस्थित केला. ‘संबंधित व्यक्तीला अटक का झाली, हे त्यालाच माहीत नसल्याने तो संभ्रमात पडणार नाही का?’ असे निरीक्षण न्यायालयाने नोंदवले.

रामा काणकोणकर हल्ला प्रकरणातील आठ संशयितांना मेरशी येथील जेएमएफसी न्यायालयात हजर करण्यात आले. यावेळी पोलिसांनी जेनिटोसाठी सात दिवसांच्या पोलिस कोठडीचा रिमांड मागितला होता. मात्र, न्यायाधीश अंकिता नागवेकर यांनी फक्त दोन दिवसांचीच पोलिस कोठडी मंजूर केली असून, शुक्रवारी पुन्हा संशयितांना न्यायालयात हजर करण्याचे आदेश दिले आहेत.

जेनिटोला अटक केल्याचे कारण देताना पोलिसांनी सांगितले कि, जेनिटोला प्रथम चौकशीसाठी आणले होते. मात्र, त्याने चौकशीदरम्यान सहकार्य केले नसल्याने त्याला अटक करण्यात आली.पोलिसांनी न्यायालयात सांगितले की, या प्रकरणात संशयितांनी वापरलेली वाहने आणि चालकांचा शोध घेणे सुरू आहे.

अद्याप रामाचा जबाबच नाही

रामा काणकोणकर हे अजूनही गोमेकॉत उपचार घेत आहेत. आम्ही दररोज चौकशीसाठी गोमेकॉत जातो आणि त्यांची जबानी घेण्याचा प्रयत्न करत आहोत; पण ते जबानी देण्याच्या मन:स्थितीत नाहीत. त्यामुळे त्यांचा जबाब नोंदवलेला नाही. तसेच साक्षीदारांचेही जबाब अद्याप घेतलेले नाहीत, असे पोलिसांनी न्यायालयात सांगितले.

जेनिटोच्या वकिलांना उत्तर मिळेना

जेनिटोला कुठल्या आधारे अटक केली, हे अद्याप पोलिसांनी सांगितलेले नाही. त्याला अटक केल्याचे कारण आणि माहिती त्याच्या कुटुंबाला देणे बंधनकारक आहे; परंतु अद्याप ती दिलेली नाही. त्याला बेकायदेशीररित्या अटक केली आहे. जेनिटोला अटक करण्याचे कारण काय, हा एकच प्रश्न वकिलांनी लावून धरला होता. मात्र, त्यांना उत्तर मिळालेच नाही.

जेनिटोची अटक बेकायदा : बचाव पक्ष

संशयितांनी दिलेल्या कबुली जबाबात ‘जेनिटो कार्दोझ याच्या सांगण्यावरून आम्ही रामा काणकोणकर याला मारहाण केली’, असे म्हटले होते. यावरूनच जेनिटोला अटक करण्यात आली. मात्र, बचाव पक्षाने ही अटकच बेकायदेशीर असल्याचे सांगत सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयांचा दाखला सादर केला.

Rama Kankonkar Assault
Rama Kankonkar: डोळ्यांतून रक्त, कमरेखाली त्राण नाही, शरीरावर मारहाणीच्या खुणा; 7 दिवसानंतर कशी आहे काणकोणकरांची प्रकृती?

रामाची प्रकृती गंभीरच

१. रामाची शारीरिक स्थिती अद्याप नाजूकच असून त्याला उजव्या डोळ्याने काहीसे दिसत नाही. त्याला मुकामार लागल्याने अजून तो स्वस्थ झालेला नाही.

२. लघवीचा रंग बदलल्याने रक्त पडत असल्याची भीती रामाला वाटू लागली आहे. तसेच तो वारंवार बोललेले विसरून जातो. परंतु डॉक्टर त्याला डिस्चार्ज घेण्यासाठी दबाव आणल्याची माहिती सूत्रांनी दिली.

Rama Kankonkar Assault
Rama Kankonkar Assault: 'त्या मंत्र्याचे नाव जाहीर करा, कोड्यात काय बोलता...' रामा काणकोणकर हल्ला प्रकरणात सुदिन यांचं प्रतिआव्हान

घटनास्थळी हजर नव्हता जेनिटो

जेनिटो कार्दोझ याच्या वकिलांनी प्रतिवाद करताना म्हटले की, जेनिटोला अटकेची कारणे लिखित स्वरूपात दिली गेली नाहीत. अटक मेमोवरही सही नाही. त्यामुळे ही अटक बेकायदेशीर असून त्यानंतरची कोठडीही बेकायदेशीर ठरते. तसेच या प्रकरणात जेनिटोची भूमिका काय? तो घटनास्थळी हजरही नव्हता, असा दावाही त्याच्या वकिलांनी न्यायालयात केला.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com