Rajinikanth Dainik Gomantak
गोवा

सुपरस्टार रजनीकांत यांचा 'फर्स्ट क्लास' ऑरा; 'जेलर 2' च्या शूटिंगसाठी गोव्याला रवाना, सोशल मीडियावर व्हिडिओ तुफान व्हायरल Watch Video

Rajinikanth Viral Video: तमिळ सुपरस्टार रजनीकांत (Rajinikanth) सध्या दिग्दर्शक नेल्सन दिलीपकुमार यांच्या आगामी 'जेलर 2' (Jailer 2) चित्रपटाच्या शूटिंगमध्ये व्यस्त आहेत.

Manish Jadhav

तमिळ सुपरस्टार रजनीकांत (Rajinikanth) सध्या दिग्दर्शक नेल्सन दिलीपकुमार यांच्या आगामी 'जेलर 2' (Jailer 2) चित्रपटाच्या शूटिंगमध्ये व्यस्त आहेत. याच शूटिंगसाठी गोव्याला जात असतानाचा त्यांचा एक व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाला आहे. यात रजनीकांत 'इकॉनॉमी क्लास' (Economy Class) मधून प्रवास करत असताना विमानात उपस्थित असलेल्या चाहत्यांना अभिवादन करताना दिसत आहेत.

चाहत्यांना अभिवादन करताना रजनीकांत

सोशल मीडियावर (Social Media) शेअर झालेल्या या व्हिडिओमध्ये रजनीकांत विमानात पुढच्या सीटवर बसलेले दिसत आहेत. विमानातील अनेक प्रवासी त्यांचे फोन काढून 'थलायवा'ला बघण्यासाठी आणि त्यांचा फोटो काढण्यासाठी उत्सुक झालेले दिसले. चाहत्यांचा उत्साह पाहून रजनीकांत लगेच उभे राहिले आणि त्यांनी चाहत्यांना हात हलवून थोडक्यात अभिवादन केले आणि पुन्हा सीटवर बसले. प्रवाशांचा उत्साह इतका होता की, काही चाहत्यांनी त्यांच्यासाठी टाळ्याही वाजवल्या. विमानातील कर्मचारीही त्यांच्याकडे बघून हसताना दिसले. सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे, एक सुपरस्टार असूनही रजनीकांत 'बिझनेस क्लास'ऐवजी सर्वसामान्य प्रवाशांसारखे इकॉनॉमी क्लासमध्ये बसलेले होते.

यूजर्सच्या प्रतिक्रिया

हा व्हिडिओ 'एक्स' वर शेअर करताना एका चाहत्याने लिहिले, "सुपरस्टार रजनीकांत यांनी त्यांच्या आकर्षणाने एका विमानाला मिनी थिएटरमध्ये बदलून टाकले! ते 'जेलर 2' च्या पुढील शेड्यूलसाठी गोव्याला जात आहेत." दुसऱ्या एका युजरने लिहिले, "फार नशीबवान (Lucky) चाहते आहेत." एका उत्साहित चाहत्याने कमेंट केली, "इकॉनॉमी सीटमध्ये रजनीकांत — तरीही त्यांच्या आजूबाजूला 'फर्स्ट क्लास'चे वातावरण जाणवते आहे." अनेक चाहत्यांनी रजनीकांत यांना भेटलेल्या या प्रवाशांचे कौतुक केले.

रजनीकांतचे आगामी चित्रपट

2024 मध्ये रजनीकांत त्यांच्या मुलगी ऐश्वर्या रजनीकांतच्या 'लाल सलाम' आणि टीजे ज्ञानवेल यांच्या 'वेट्टैयन' या चित्रपटांमध्ये दिसले. तसेच, लोकेश कनगराज दिग्दर्शित 'कूली' चित्रपटाने जगभरात 518 कोटी रुपयांचे कलेक्शन केले.

आता ते 2023 मध्ये आलेल्या त्यांच्या हिट चित्रपट 'जेलर'च्या सिक्वेल (Jailer 2) साठी शूटिंग करत आहेत, ज्यात ते 'टायगर' मुथुवेल पांडियन ही भूमिका साकारणार आहेत. या चित्रपटात रम्या कृष्णन त्यांच्या भूमिकेत परतणार आहेत, तर शिवा राजकुमार यांनीही कॅमिओसाठी (Cameo) येणार असल्याची पुष्टी केली आहे. तसेच, दाक्षिणात्य सुपरस्टार बालकृष्ण यांचीही या चित्रपटात महत्त्वाची भूमिका असणार आहे.

या व्यतिरिक्त, रजनीकांत लवकरच कमल हासन यांच्यासोबत एका चित्रपटात (Moive) दिसणार असल्याची चर्चा आहे. हा चित्रपट कमल हासन निर्मित असणार आहे. या चित्रपटाबद्दल आणि त्याच्या दिग्दर्शकांबद्दल अधिकृत घोषणा व्हायची बाकी असली तरी, दोन्ही कलाकारांनी अनेकदा या प्रोजेक्टला दुजोरा दिला आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Politics: 'माझे घर'ला 'खो' घालण्याचा यत्न, विरोधी आमदारांना धडा शिकवा; CM प्रमोद सावंतांचे जनतेला आवाहन

Bihar Elections: "मंचावर येऊन नाचायला सांगा ते नाचतील..." विरोधी पक्ष नेते राहुल गांधींचा पंतप्रधान मोदींना टोला

Goa Firing Case: जैतीर-उगवेत रेती उपसा करणाऱ्या कामगारांवर गोळीबार, स्थानिक बंदूकधारकांची पोलिसांकडून चाैकशी, 50 मजुरांची झडती

Goa Rain: ऐन ऑक्टोबरमध्ये राज्य 'ओलेचिंब'! महिन्यात आतापर्यंत 11.82 इंच नोंद; अनेक ठिकाणी पडझड, रस्त्यांवर पाणी

Danish Chikna Arrested: 'चिकना'चा खेळ संपला! अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिमच्या खास माणसाला गोव्यातून उचललं, पत्नीलाही ताब्यात घेतलं

SCROLL FOR NEXT