First Look of Rajinikanth In Lal Salam: लाल सलाम चित्रपटातला रजनीकांत यांचा फर्स्ट लूक एकदा बघाच, थलैवा दिसणार या भूमीकेत....

अभिनेता रजनीकांत अर्थात थलैवा लाल सलाम या आगामी चित्रपटात या भूमीकेत दिसणार आहेत
Rajnikanth In Lal Salam
Rajnikanth In Lal SalamDainik Gomantak

First Look of Rajinikanth In Lal Salam: रजनीकांत यांची मुलगी ऐश्वर्या जवळपास 5 वर्षांनंतर दिग्दर्शनात परतली आहे. रविवारी रात्री ऐश्वर्याने आगामी 'लाल सलाम' या चित्रपटातील रजनकांतच्या व्यक्तिरेखेचा फर्स्ट लूक शेअर केला. या चित्रपटात रजनीकांत मोईदीन भाईची भूमिका साकारत आहेत.

फर्स्ट लूक पोस्टरमध्ये तो तपकिरी पारंपारिक सूट, लाल टोपी आणि काळा चष्मा परिधान केलेल्या स्टायलिश अवतारात दिसत आहे. 

पोस्टरच्या बॅकग्राऊंडला गेटवे ऑफ इंडिया आणि धगधगता बाजार दिसत आहे."#मोदीनभाई ...स्वागत आहे ...#लाल सलाम जेव्हा तुमचे हृदय धडधडत असेल तेव्हा कॅप्शन देऊ शकत नाही," ऐश्वर्याने चित्रपटातील तिच्या वडिलांचा फर्स्ट लुक शेअर करताना लिहिले. या चित्रपटात रजनीकांत एका छोट्या भूमिकेत दिसणार असल्याचे वृत्त आहे. 

रिपोर्ट्सनुसार, ऐश्वर्या गेल्या काही महिन्यांपासून तमिळनाडू आणि आसपासच्या भागात या चित्रपटासाठी शूटिंग करत आहे. लायका प्रॉडक्शनने पोस्टर इंग्रजी आणि तमिळमध्ये शेअर केले आणि रजनीकांत यांना 'प्रत्येकाचा आवडता भाई' असे संबोधले.

ऐश्वर्या रजनीकांत 'लाल सलाम' द्वारे दिग्दर्शिका म्हणून परतली आहे. चित्रपटात विष्णू विशाल आणि विक्रांत मुख्य भूमिकेत आहेत, रजनीकांतच्या विस्तारित कॅमिओसह.

लायका प्रॉडक्शन निर्मित या चित्रपटाला ए आर रहमान यांचे संगीत आहे. सिनेमॅटोग्राफर विष्णू रंगासामी आणि एडिटर म्हणून प्रवीण बास्कर ही मोठी नावं चित्रपटाचा भाग आहेत.

रजनीकांत मोईदीन भाईची भूमिका साकारत आहेत. फर्स्ट लूक पोस्टरमध्ये ते तपकिरी पारंपारिक सूट, लाल टोपी आणि काळा चष्मा परिधान केलेल्या स्टायलिश अवतारात दिसत आहे. पार्श्वभूमीत गेटवे ऑफ इंडिया आणि धगधगता बाजार दिसत आहे."#मोदीनभाई ...स्वागत आहे

Rajnikanth In Lal Salam
Amir Khans's Ghajini Sequel: पुन्हा एकदा हाय व्होल्टेज ड्रामा घेऊन संजय सिंघानिया परततोय?... ..गजनीच्या सिक्वलच्या चर्चेला उधाण

दरम्यान, रजनीकांत यांनी अलीकडेच त्याच्या आगामी 'जेलर' चित्रपटाच्या प्रदर्शनाच्या तारखेचे अनावरण केले. 

रजनीकांत यांची प्रमुख भूमिका असलेला हा बहुप्रतिक्षित तमिळ चित्रपट भारतीय चित्रपटसृष्टीतील तीन सुपरस्टार, रजनी, जॅकी श्रॉफ आणि मोहनलाल यांना एकत्र आणतो, तर 'जेलर'मध्ये, तमन्ना भाटिया, 'बाहुबली' स्टार रम्या कृष्णन, योगी बाबू यांच्या भूमिका आहेत. 

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com