Ponda Municipal Market Dainik Gomantak
गोवा

Ponda Municipal Market: बाजार प्रकल्पाची 'वर्क ऑर्डर' का अडली? काँग्रेस कार्यकर्त्यांकडून फोंडा बाजारातील अनागोंदीबद्दल नाराजी

Rajesh Verenkar Ponda market work order: फोंडा येथील पालिका बाजार उभारण्यासाठी दहा कोटींची निविदा काढण्यात आली आहे.

गोमंतक ऑनलाईन टीम

फोंडा: येथील पालिका बाजार उभारण्यासाठी दहा कोटींची निविदा काढण्यात आली आहे. मात्र सहा महिने उलटूनही संबंधित कंत्राटदाराला अजून ‘वर्क ऑर्डर’ का दिली जात नाही, असा प्रश्न काँग्रेसचे सरचिटणीस तथा फोंड्यातील नेते राजेश वेरेकर यांनी उपस्थित केला आहे.

मासळी मार्केटमधील अस्वच्छता, दुर्गंधी आणि ठिकठिकाणी पसरलेली गलिच्छता, अनागोंदी यामुळे ग्राहक आणि विक्रेत्यांना गंभीर स्वरूपाचे आजार होण्याचा धोका असल्याची भीती त्यांनी व्यक्त केली. फोंड्यातील या मासळी मार्केटची पाहणी करून विक्रेते आणि ग्राहकांशी संवाद साधला असता सर्वांनी पालिकेच्या दुर्लक्षाकडे बोट दाखवले.

बुधवारी सकाळी काँग्रेसचे नेते राजेश वेरेकर तसेच मनीषा उसगावकर, विलियम आगियार, जॉन मास्कारेन्हस व इतर पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी मासळी मार्केटला भेट देऊन तेथील अनागोंदीची पाहणी केली. यावेळी पत्रकारांशी बोलताना वेरेकर यांनी पालिका आणि सरकारच्या कारभारावर तीव्र नाराजी व्यक्त केली.

वेरेकर म्हणाले की, नवीन पालिका बाजार उभारण्यासाठी जुन्या इमारतीतील व्यापाऱ्यांना स्थलांतरित करण्यात आले; मात्र पार्किंगसाठी असलेल्या जागेत मासळी विक्रेत्यांना बसवण्यात आले. ही तात्पुरती व्यवस्था योग्य असली तरी, मार्केटमधील अनागोंदी, दुर्गंधी आणि अस्वच्छतेमुळे ग्राहकांच्या आरोग्याला धोका निर्माण झाला आहे. त्यामुळे नवीन पालिका बाजार उभारण्यासाठी पालिकेने तातडीने कार्यवाही करावी, अशी मागणी त्यांनी केली.

मनीषा उसगावकर म्हणाल्या की, भाजप सरकारने केवळ मतांसाठी पोटनिवडणुकीच्या वेळी फोंड्यात ठाण मांडले होते. आता निवडणूक रद्द झाल्यानंतर सर्वजण निघून गेले आहेत. फोंडावासीयांना माहिती आहे की भाजप सरकारने मतांसाठी केवळ आश्वासने दिली होती. यावेळी काँग्रेस कार्यकर्त्यांनी संपूर्ण मासळी मार्केटची पाहणी केली.

आश्वासने पूर्ण करा

फोंडा पोटनिवडणुकीच्या प्रचारादरम्यान सरकारने दिलेली सर्व आश्वासने पूर्ण करण्यासाठी तातडीने कार्यवाही करावी, असे वेरेकर यांनी यावेळी सांगितले. केवळ आश्वासने देऊन मुख्यमंत्री, मंत्री आणि आमदारांनी मतदारांची बोळवण केली असून, पुढील आठ महिन्यांत फोंड्यातील विकासकामांना गती देण्यात यावी, अशी मागणीही त्यांनी केली.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

UP Pension Hike: 1.21 कोटी पेन्शनधारकांसाठी खूशखबर! पेन्शनमध्ये होणार घसघशीत वाढ; 'या' राज्य सरकारचं मोठं गिफ्ट

Budh Gochar 2026: करिअर आणि संपत्तीत मोठी झेप! बुध गोचरचा महाचमत्कार; 'या' 5 राशींच्या आयुष्यात येणार सोन्याचे दिवस

Shreyas Iyer Record: धावांचा पाऊस आणि विक्रमी विजय! श्रेयस अय्यरने मोडला धोनीचा रेकॉर्ड; बनला नंबर-1 टी-20 कर्णधार

Telangana ATM Robbery VIDEO: मध्यरात्री 'नाईटी'वाल्या चोरांचा धुमाकूळ! वेल्डिंगने चक्क ATM मशीन फोडली, लाखोंची कॅश घेऊन रातोरात पसार; व्हिडिओ व्हायरल

Virat Kohli Test Retirement News: अजित आगरकरांमुळे विराट कोहलीने कसोटी क्रिकेटमधून घेतली निवृत्ती? वसीम जाफर यांच्या विधानाने क्रिकेटविश्वात चर्चेला उधाण

SCROLL FOR NEXT